तरुणाला खोट्या गुन्ह्यांची धमकी देऊन खंडणीची मागणी

खंडणीसाठी धमकी दिल्याप्रकरणी तीन तृतीयपंथींना अटक

0

मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
26 मे 2025
मुंबई, – खोट्या गुन्ह्यांत अडकाविण्याची धमकी देऊन एका तरुणाकडे खंडणीची मागणी करण्यात आल्याचा प्रकार खार परिसरात उघडकीस आला आहे. याप्रकरणी खंडणीसाठी धमकी दिल्याप्रकरणी तीन तृतीयपंथींना खार पोलिसांनी अटक केली असून ते तिघेही ते तिघेही खारदांडाचे रहिवाशी असल्याचे पोलिसांनी सांगितले. अटकेनंतर या तिघांनाही रविवारी वांद्रे येथील लोकल कोर्टात हजर करण्यात आल होते. यावेळी त्यांची जामिनावर सुटका करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.

29 वर्षांचा तक्रारदार सांताक्रुज येथे राहत असून खाजगी कंपनीत कामाला आहे. शनिवारी रात्री नऊ वाजता तो वांद्रे येथील कार्टर रोड, टायटॉनिक जहाजाच्या प्रतिकृतीजवळून जात होता. यावेळी तिथे आलेल्या तिन्ही आरोपी तृतीयपंथीने त्याच्याकडे पैशांची मागणी केली होती. त्याने त्यांना पाचशे रुपये दिले, मात्र त्यांनी त्याच्याकडे आणखीन पैशांची मागणी केली होती. पैसे दिले नाहीतर त्याच्याविरुद्ध खोट्या छेडछाडीच्या गुन्ह्यांत अडकाविण्याची धमकी दिली होती. या घटनेनंतर तक्रारदार तरुण प्रचंड घाबरला होता.

घडलेला प्रकार त्याने तिथे गस्त घालणार्‍या पोलिसांना सांगून तिन्ही तृतीयपंथीविरुद्ध तक्रार केली होती. त्याच्या तक्रारीनंतर पोलिसांनी खंडणीची मागणी करुन खोट्या गुन्ह्यांत अडकाविण्याची धमकी दिल्याप्रकरणी तिन्ही आरोपी तृतीयपंथीविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. गुन्हा दाखल होताच या तिघांनाही पोलिसांनी अटक केली. अटकेनंतर तिघांनाही रविवारी दुपारी वांद्रे येथील लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी त्यांची चौदा दिवसांच्या न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली. त्यानंतर त्यांच्या वतीने त्यांच्या वकिलांनी जामिनासाठी अर्ज केला होता. या अर्जावर सुनावणी होऊन तिन्ही आरोपींची जामिनावर सुटका करण्यात आली.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page