प्लास्टिक प्लेटच्या मागणी करुन तोतया लष्कर अधिकार्याकडून फसवणुक
गुजरातच्या खाजगी कंपनीच्या तक्रारीवरुन गुन्हा दाखल
मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
21 मार्च 2025
मुंबई, – प्लास्टिक प्लेटची मागणी करुन कंपनीला पेमेंट करण्याचा बहाणा करुन तोतया लष्कारातील दोन अधिकार्यांनी कंपनीच्या कर्मचार्याला भ्रमित करुन कंपनीच्या बँक खात्यातून विविध बँक खात्यात 10 लाख 85 हजाराचे पेमेंट ट्रान्स्फर करुन फसवणुक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी गुजरातच्या निलकमल लिमिटेड कंपनीच्या अधिकार्याच्या तक्रारीवरुन सायबर सेल पोलिसांनी कुलदिप सिंग व राजीव रंजन नाव सांगणार्या दोन्ही तोतया लष्कारातील अधिकार्याविरुद्ध फसवणुकीसह आयटी कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. या दोघांचा पोलिसांकडून शोध सुरु आहे.
पुलिन आश्विनभाई शेठ हे गुजरातच्या अहमदाबादचे रहिवाशी असून निलकमल लिमिटेड या नामांकित कंपनीत सहाय्यक व्यवस्थापक म्हणून काम करतात. गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यांत ते त्यांच्या अहमदाबादच्या कार्यालयात होते. यावेळी त्यांना त्यांच्या कर्मचार्याकडून लष्कराच्या अधिकार्याला सत्तर प्लास्टिक प्लेटची मागणी करण्यात आल्याची माहिती समजली होती. त्यामुळे त्यांनी राजीव रंजन या लष्करी अधिकार्याला संपर्क साधून प्लास्टिक प्लेटसाठी 2 लाख 61 हजार 842 रुपयांचे पेमेंट करण्यास सांगितले. यावेळी त्याने एक लाखांचे पेमेंट करतो असे सांगून उर्वरित पेमेंट डिलीव्हरी करण्याचे आश्वासन दिले होते. त्यासाठी त्याने त्याचा लष्करातील कॅण्टीन स्मार्ट पाठविले होते.
बँक खात्याच्या शहानिशा करण्यासाठी त्याने त्यांना काही रक्कम ट्रान्स्फर करण्यास सांगितले. कारण ही रक्कम भारतीय सैन्य दलाच्या अकाऊंटमधून पाठविली जाणार आहे. त्यामुळे शहानिशा केल्याशिवाय ही रक्कम पाठविता येणार नाही असे सांगितले होते. त्यामुळे त्यांनी संबंधित बँक खात्यात पाच रुपये पाठविले होते. मात्र ही रक्कम मिळाली नसल्याचे सांगून ती रक्कम पुन्हा पाठविण्यास सांगितले. याच दरम्यान त्याने त्यांना भ्रमित करुन 3 लाख 61 हजार 837 रुपये तीन वेळा संबंधित बँक खात्यात पाठविण्यास प्रवृत्त केले होते. त्यामुळे त्यांच्याकडून संबंधित खात्यात 10 लाख 85 हजार 511 रुपये ट्रान्स्फर करण्यात आले होते. त्यांच्या कंपनीतून जास्त पेमेंट ट्रान्स्फर झाल्याने त्यांनी कुलदीप सिंगला संपर्क साधण्याचा प्रयत्न केला,
मात्र त्याचा संपर्क होऊ शकला नाही. वास्तविक कुलदीप सिंग आणि राजीव रंजन यांना त्यांच्य कंपनीला पेमेंट करणे गरजेचे होते, मात्र या दोघांनी लष्काराचे अधिकारी असल्याची बतावणी करुन प्लास्टिक पॅलेटची मागणी करुन त्यांनाच भ्रमित करुन त्यांच्या बँक खात्यात पेमेंट करण्यास प्रवृत्त केले आणि त्यांच्या कंपनीची फसवणुक केली होती. त्यामुळे त्यांनी अहमदाबादच्या सायबर सेल पोलिसांसह एनसीसीआर पोर्टलवर तक्रार केली होती. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर कुलदिप सिंग व राजीव रंजन नाव सांगणार्या सायबर ठगाविरुद्ध पोलिसांनी कट रचून पैशांचा अपहार करुन फसवणुक करणे तसेच आयटीच्या विविध कलमातर्गत गुन्हा दाखल केला होता. या गुन्ह्यांचा तपास मुंबई पोलिसांच्या सायबर सेलकडे वर्ग करण्यात आला आहे.