कस्टम अधिकारी असल्याची बतावणी करुन तिघांकडून फसवणुक

प्रवाशांकडून पैशांसह महागडे वस्तूचा अपहार केल्याचा आरोप

0

मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
7 ऑक्टोंबर 2025
मुंबई, – आंतरराष्ट्रीय विमानतळावर हवाई गुप्तचर विभागाचे अधिकारी असल्याची बतावणी करुन फसवणुक होत असल्याचे उघडकीस आले आहे. सामानाच्या तपासणीच्या बहाण्याने तीनजणांच्या टोळीने प्रवाशांकडून मोठ्या प्रमाणात पैसे उकाळून त्यांच्याकडील महागड्या वस्तूचा अपहार केला. या तिन्ही तोतया कस्टम अधिकार्‍यांनी खर्‍या कस्टम अधिकार्‍यांनी अटक केली आहे. अशा प्रकारे फसवणुक करणारी ही टोळी असून या टोळीतील इतर आरोपींच्या अटकेसाठी या अधिकार्‍यांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे.

छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर एमआयएलएल कर्मचारी ते स्वत हवाई गुप्तचर विभागाचे (एआययू) अधिकारी असल्याची बतावणी करुन काही प्रवाशांना थांबवून त्यांच्या सामानाची तपासणी करतात. त्यांच्याविरुद्ध कारवाईची धमकी देऊन त्यांच्याकडून पैसे घेतात, त्यांच्याकडील महागड्या वस्तूचा अपहार करतात. गेल्या काही महिन्यांत या तोतया कस्टम अधिकार्‍यांनी अशाच प्रकारे अनेक प्रवाशांची कस्टम अधिकारी असल्याची बतावणी करुन फसवणुक केली होती,

याबाबत काही तक्रारी आंतरराष्ट्रीय विमानतळावरील हवाई गुप्तचर विभागाला मिळाली होती. या माहितीनंतर या अधिकार्‍यांनी तिथे साध्या वेशात पाळत ठेवून तीन संशयितांना चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. चौकशीत त्यांनी ते तिघेही कस्टम अधिकारी असल्याचे सांगून प्रवाशांना अडवून त्यांच्या सामानाची तपासणी करण्याचा बहाणा करुन पैसे उकाळून महागडे वस्तू घेत असल्याची कबुली दिली. त्यांच्याविरुद्ध फसवणुकीसह खंडणी आणि अन्य कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याच गुन्ह्यांत नंतर तिन्ही तोतया कस्टम अधिकार्‍यांना खर्‍या कस्टम अधिकार्‍यांनी अटक केली. या तिघांची या अधिकार्‍यांकडून कसून चौकशी सुरु आहे. या चौकशीतून अशा प्रकारे फसवणुक करणारी ही एक टोळी असून या टोळीत त्यांचे इतर काही साथीदार आहेत. त्यांच्या अटकेसाठी आता या अधिकार्‍यांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page