मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
१७ ऑक्टोंबर २०२४
मुंबई, – कुठलीही वैद्यकीय शैक्षणिक प्रमाणपत्र नसताना सोशल मिडीयावर वैद्यकीय सेवा देणे एका महिलेला चांगलेच महागात पडले आहे. स्वतला डॉक्टर म्हणविणार्या या महिलेविरुद्ध समतानगर पोलिसांनी फसवणुकीसह अन्य कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. सची अजीत दळवी असे या महिलेचे नाव असून तिची लवकरच पोलिसांकडून चौकशी होणार आहे. या चौकशीनंतर तिच्यावर योग्य ती कायदेशीर कारवाई केली जाईल असे पोलिसांनी सांगितले.
योगिता मोहन गरासिया या डॉक्टर असून बोरिवली परिसरात राहतात. सध्या त्या महानगरपालिकेच्या कांदिवलीतील एम. जी क्रॉस रोड, सरदार वल्लभभाई पटेल जलतरण तलावाजवळील आर/दक्षिण आरोग्य विभागात वैद्यकीय अधिकारी म्हणून काम करतात. गेल्या वर्षी ऑक्टोंेबर महिन्यांत स्वप्निल महाले यांनी सचि दळवी हिच्याविरोधात आरोग्य विभागात तक्रार केली होती. सचिकडे कुठलीही वैद्यकीय शैक्षणिक प्रमाणपत्र नाही. तरीही त्यांनी महानगरपालिकेच्या कार्यक्षेत्रात वैद्यकीय अधिकारी म्हणून काम केले आहे. सध्या ती तिच्या कांदिवलीतील राहत्या घरातून सोशल मिडीयावर वैद्यकीय सेवा तसेच सल्ले देण्याचे काम करते. तिचे सोशल मिडीयावर अनेक व्हिडीओ व्हायरल झाले आहेत. त्यामुळे तिच्या वैद्यकीय सेवेची चौकशी करण्याची विनंती केली होती. या तक्रारीची आरोग्य विभागाने गंभीर दखल घेत तिची चौकशी सुरु केली होती. या अर्जासोबत सचि दळवीच्या इंडियन बोर्ड ऑफ अल्टरनेव्टिव्ह मेडिसीन्सतर्फे देण्यात आलेल्या डाक्टरेट ऑफ फिलॉसॉफी इर अल्टरनेव्टिव्ह मेडीसीन ही पदवी होती. या पदवीबाबत महाराष्ट्र कौन्सिल ऑफ इंडियन मेडीसीन यांच्याकडे पत्रव्यवहार करण्यात आला होता. त्यात त्यांनी अशा पदवीधारक व्यक्तीने महाराष्ट्र राज्यात कुठल्याही वैद्यकीय व्यवसाय करु शकत नसल्याचा रिपोर्ट दिला होता.
तसेच सचि दळवीकडे असलेली पदवी ज्या संस्थेतून प्राप्त केली होती. त्या संस्थेला महाराष्ट्रात मान्यता नव्हती. तसेच पदवी प्रमाणपत्राच्या आधारे त्या समपुदेशन करु शकत नाही असे नमूद केले होते. हा रिपोर्ट प्राप्त होताच आरोग्य विभागाकडून योगिता गरासिया यांनी समतानगर पोलिसांत सचि दळवी यांच्याविरुद्ध तक्रार केली होती. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर ३१८ (४), ३१९ (२) भारतीय न्याय सहिता सहकलम ३३, ३६ वैद्यकीय व्यवसाय अधिनियम कायदा कलमांतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला आहे. या गुन्ह्यांचा तपास सुरु असून तिची लवकरच पोलिसांकडून चौकशी करुन जबानी नोंदविण्यात आला आहे.