रायफलमधून गोळी सुटल्याने एसआरपीएफचा हवालदार जखमी
आजारामुळे आलेल्या नैराश्यातून आत्महत्येचा प्रयत्न केल्याचा संशय
मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
१८ फेब्रुवारी २०२४
मुंबई, – रायफलमधून गोळी राज्य राखीव पोलीस दलाचा एक हवालादार जखमी झाला. व्यकंट पडळवार असे या हवालदाराचे नाव असून त्याच्या हाताला लागलेली गोळी आरपार निघून गेली आहे. जखमी झालेल्या व्यकंटवर कांदिवलीतील शताब्दी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आहे. गेल्या तीन वर्षांपासून त्याला मानसिक आजार होता, त्यातून आलेल्या नैराश्यातून त्याने आत्महत्येचा प्रयत्न केल्याचे बोलले जाते. यासदर्ंभात वरिष्ठ पोलीस निरीक्षक रविंद्र आडाणे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी तपास सुरु असल्याने काहीही माहिती देण्यास नकार दिला.
ही घटना सोमवारी सायंकाळी मालाड येथील स्टेशनजवळील द मॉल शॉपिंग सेंटरजवळ घडली. व्यकंट पडळवार हा मूळचा संभाजीनगरचा रहिवाशी आहे. तिथेच त्याची पत्नी आणि दोन मुले तिथे राहतात. तो सध्या राज्य राखीव पोलीस दलात हवालदार म्हणून कार्यरत होता. मालाड येथील द मॉलजवळ राज्य राखीव दलाची एक तुकडी तैनात करण्यात आली असून तिथे तो कर्तव्यावर होता. सोमवारी सायंकाळी त्याच्या एसएलआर रायफलमधून एक गोळी सुटली होती. ही गोळी त्याच्या हाताला लागून आरपार गेली. त्यात तो गंभीररीत्या जखमी झाला होता.
हा प्रकार तिथे उपस्थित इतर पोलिसांच्या निदर्शनास येताच त्यांनी त्याला तातडीने कांदिवलीतील शताब्दी हॉस्पिटलमध्ये दाखल केले. त्याच्यावर उपचार सुरु असून त्याची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात आले. गोळीबाराची माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस निरीक्षक रविंद्र आडाणे यांनी त्यांच्या पथकासह घटनास्थळी धाव घेतली होती. प्राथमिक तपासात तपासात व्यकंटला सिजोफेनियाचा आजार होता. त्यामुळे त्याच्या मनात नकारत्मक गोष्ठी येत होत्या. त्यावर त्यांचे औषधोपचार सुरु होते. मात्र या उपचारातून त्याना काहीच प्रतिसाद मिळत नव्हता. त्यातच गेल्या काही दिवसांपासून तो प्रचंड मानसिक तणावात होते. त्यातून आलेल्या नैराश्यातून त्याने आत्महत्येचा प्रयत्न केला होता. मात्र गोळी हाताला लागून तो जखमी झाला.
तपासात आलेली ही माहिती नंतर वरिष्ठ पोलीस निरीक्षक रविंद्र आडाणे यांनी त्यांच्या वरिष्ठांना दिली होती. याप्रकरणी लवकरच व्यकंटची पोलिसांकडून जबानी नोंदविण्यात येणार आहे. या जबानीनंतर पुढील कारवाईची दिशा ठरविली जाईल असे पोलिसांकडून सांगण्यात आले. व्यकंट गोळीबारात जखमी झाल्याची माहिती त्यांच्या कुटुंबियांसोबत नातेवाईकांना देण्यात आली आहे. दुसरीकडे सोमवारी घडलेल्या या गोळीबाराच्या घटनेने परिसरात प्रचंड तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.