दहा ते सतरा वर्षांच्या पाच अल्पवयीन मुलीचा विनयभंग

खाजगी क्लिनिकच्या डॉक्टरसह पाचही आरोपींना अटक

0

मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
१ सप्टेंबर २०२४
मुंबई, – दहा ते सतरा वर्षांच्या पाच अल्पवयीन मुलीच्या विनयभंगाची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी समतानगर, आरसीएफ, भांडुप, सांताक्रुज आणि विलेपार्ले पोलिसांनी पाच स्वतंत्र विनयभंगासह पोक्सो कलमांतर्गत गुन्हे दाखल करुन पाचही आरोपींना अटक केली. त्यात एका खाजगी क्लिनिकच्या डॉक्टरचा समावेश असून या सर्वांना विशेष पोक्सो कोर्टात हजर करण्यात आले होते.

३९ वर्षांची तक्रारदार महिला तिच्या कुटुंबियांसोबत राहत असून तिला अकरा वर्षांची मुलगी आहे. ही मुलगी शाळेत आणि ट्यूशनला जाताना सोसायटीचा सुरक्षारक्षक विशाल हा तिचा पाठलाग करत होता. काहीही कारण नसताना तिच्याशी बोलण्याचा प्रयत्न करुन जवळीक साधण्याचा प्रयत्न करत होता. २८ ऑगस्टला सकाळी साडेसहा वाजता ही मुलगी शाळेत जात होती. यावेळी विशाल तिच्याकडे आला आणि त्याने तिच्याशी अश्‍लील संभाषन करुन तिचा विनयभंग केला होता. हा प्रकार तिच्या आईला समजताच तिने समतानगर पोलिसात विशालविरुद्ध तक्रार केली होती. याप्रकरणी विनयभंगासह पोक्सो कलमांतर्गत गुन्हा दाखल होताच आरोपी सुरक्षारक्षकाला पोलिसांनी अटक केली.

दुसरी घटना चेंबूर परिसरात राहते. १० वर्षांची बळीत मुलगी तिच्या पालकांसोबत चेंबूर परिसरात राहते. २७ ऑगस्ट ते २९ ऑगस्ट २०२४ या कालावधीत ती तिच्या घरी झोपली होती. यावेळी २६ वर्षांचा योगेश नावाच्या तरुणाने घरात प्रवेश करुन तिच्याशी अश्‍लील चाळे करुन तिचा विनयभंग केला होता. झोपेतून जाग आल्यानंतर तिने आरडाओरड सुरु केल्यानंतर तो पळून गेला. या घटनेनंतर मुलीच्या आईने आरसीएफ पोलिसांना घडलेला प्रकार सांगून आरोपीविरुद्ध तक्रार केली होती. याप्रकरणी विनयभंगासह पोक्सो कलमांतर्गत गुन्हा दाखल होताच पळून गेलेल्या योगेशला पोलिसांनी अटक केली. योगेश हा रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्याच्याविरुद्ध घरफोडीसह बलात्काराच्या गुन्ह्यांची नोंद आहे.

तिसर्‍या घटनेत एका डॉक्टरविरुद्ध भांडुप पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. सतरा वर्षांची बळीत मुलगी भांडुप येथे राहते. शुक्रवारी रात्री ती जवळच्या क्लिनिकमध्ये औषधोपचारासाठी गेली होती. यावेळी डॉक्टरने तिला तपासण्याचा बहाणा करुन तिच्या शरीरावर नकोसा स्पर्श करुन तिचा विनयभंग केला होता. तिचा ड्रेस वर करुन कपड्याच्या आत हात घालून तिच्याश छातीला अश्‍लील स्पर्श केला होता. घडलेला प्रकार तिने भांडुप पोलिसांना सांगितला. त्यानंतर डॉक्टरविरुद्ध पोलिसांनी विनयभंगासह पोक्सो कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. याच गुन्ह्यांत नंतर आरोपी डॉक्टरला पोलिसांनी अटक केली.

सांताक्रुज येथे चौदा वर्षांच्या मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी सावत्र पित्याला पोलिसांनी अटक केली. बळीत मुलगी ही सांताक्रुज येथे राहत असून तिचा आरोपी सावत्र पिता आहे. दोन दिवसांपूर्वी त्याने घरातच तिच्या मुलीशी अश्‍लील वर्तन करुन तिचा विनयभंग केला होता. याप्रकरणी गुन्हा दाखल होताच आरोपीस सांताक्रुज पोलिसांनी अटक केली.

अन्य एका घटनेत सात वर्षांनी एका आरोपीविरुद्ध विलेपार्ले पोलिसांनी विनयभंगासह पोक्सो कलमांतर्गत गुन्हा दाखल केला. तक्रारदार महिला विलेपार्ले येथे राहत असून सात वर्षांपूर्वी तिची मुलगी सात वर्षांची असताना याच परिसरात राहणार्‍या मयुर नावाच्या एका आरोपीने तिच्याशी अश्‍लील वर्तन करुन तिचा विनयभंग केला होता. जुलै ते ऑगस्ट २०१७ या कालावधीत ही घटना घडली. हा प्रकार अलीकडेच मुलीकडून तिच्या आईला समजला होता. त्यानंतर तिने मयुरविरुद्ध विलेपार्ले पोलिसांत तक्रार केली होती. मयुरविरुद्ध २०१८ साली विनयभंगासह बलात्कार, धमकी देणे आणि आयटी कलमांतर्गत एका गुन्ह्यांची नोंद झाली होती. याच गुन्ह्यांत तो सध्या जामिनावर असल्याचे बोलले जाते. आरोपी आणि बळीत मुलगी एकाच परिसरात राहत असून एकमेकांच्या परिचित आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page