मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
१ सप्टेंबर २०२४
मुंबई, – गेल्या ४८ तासांत वेगवेगळ्या पाच घटनेत अकरा ते सतरा वयोगटातील पाच अल्पवयीन मुलीवर त्यांच्याच परिचित आरोपींनी लैगिंक अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी स्थानिक पोलिसांनी पाच स्वतंत्र लैगिंक अत्याचारासह पोक्सो कलमांतर्गत गुन्हा नोंदवून पाच आरोपींना अटक केली आहे. अटकेनंतर या सर्वांना विशेष पोक्सो कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे.
१४ वर्षांची पिडीत मुलगी अंधेरी येथे राहते. ३५ वर्षांचा युनूस हा तिच्या परिचित असून तो याच परिसरात राहतो. जानेवारी २०२३ ते ऑगस्ट २०२४ या कालावधीत युनूसने पिडीत अल्पवयीन असल्याचे माहित असताना तिला घरी बोलावून तिच्याावर अनेकदा लैगिंक अत्याचार केला होता. त्यातून ही मुलगी गरोदर राहिली होती. दोन दिवसांपूर्वी तिने हा प्रकार डी. एन नगर पोलिसांना सांगून आरोपीविरुद्ध तक्रार केली होती. या तक्रारीनंतर पोलिसांनी युनूसविरुद्ध ६४ (२), (एम) भारतीय न्याय सहिता सहकलम ४, ६, ८, १२ पोक्सो कलमांतर्गत गुन्हा दाखल केला होता. याच गुन्ह्यांत युनूसला शुक्रवारी पोलिसांनी अटक केली. अटकेनंतर त्याला दिडोंशीतील पोक्सो कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे. बळीत मुलीला उपचारासाठी कूपर हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले असून तिची प्रकृती स्थिर असल्याचे पोलिसांनी सांगितले.
दुसर्या घटनेत एका सतरा वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर लग्नाचे आमिष दाखवून तिच्याच मित्राने लैगिंक अत्याचार केल्याची घटना दहिसर परिसरात उघडकीस आली आहे. ही मुलगी गरोदर राहिल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला होता. याप्रकरणी मुलीच्या आईच्या तक्रारीवरुन एमएचबी पोलिसांनी आशिष नावाच्या आरोपी मित्राविरुद्ध लैगिंक अत्याचारासह पोक्सोच्या विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल करुन आरोपीस अटक केली. पिडीत आणि आरोपी एकाच परिसरात राहत असून त्यांच्यात प्रेमसंबंध होते.
तिसर्या घटनेत अभ्यास करण्याचा बहाणा करुन घरी आलेल्या एका सतरा वर्षांच्या मुलाने सोळा वर्षांच्या मुलीवर लैगिंक अत्याचार केला. ही मुलगी आठ आठवड्याची गरोदर असून हा प्रकार तिच्या आईच्या अलीकडेच लक्षात आला होता. त्यानंतर तिने मालाड पोलिसांत आरोपीविरुद्ध तक्रार केली होती. याप्रकरणी लैगिंक अत्याचारासह पोक्सो कलमांतर्गत गुन्हा दाखल होताच आरोपी मुलाला पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. त्याला नंतर डोंगरीतील बालसुधारगृहात पाठविण्यात आले होते. तक्रारदार महिला ही ट्यूशन टिचर असून कांदिवली परिसरात राहते. पिडीत आणि आरोपी मित्र असून तो तिच्या घरी अभ्यास करण्यासाठी येत होता. यावेळी त्याने तिच्याशी जवळीक साधू तिच्यासोबत दोन ते तीन वेळा लैगिंक अत्याचार केला होता. हा गुन्हा नंतर कांदिवली पोलिसाकडे वर्ग करण्यात आला.
कांदिवली येथे रुमसह नोकरीच्या आमिषाने एका सतरा वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर तिच्याच मित्राने लैगिंक अत्याचार केला. याप्रकरणी लैगिंक अत्याचारासह पोक्सो कलमांतर्गत गुन्हा दाखल होताच मकबूल मोहसीन मल्ली या २२ वर्षांच्या आरोपीस चारकोप पोलिसांनी अटक केली. पिडीत मुलगी उत्तरप्रदेशची रहिवाशी असून तिची सोशल मिडीयावर मकबुलशी मैत्री झाली होती. त्याने तिला रुमसह नोकरी देतो असे सांगून मुंबईत आणले. कांदिवली येथे राहत असताना त्याने तिच्याशी जबदस्तीने शारीरिक संबंध ठेवले होते. खोटे आश्वासन देऊन त्याने तिच्यावर लैगिंक अत्याचार केला होता. त्यामुळे तिने घडलेला प्रकार चारकोप पोलिसांना सांगितला होता. याप्रकरणी गुन्हा दाखल होताच आरोपीस पोलिसांनी अटक केली. याच गुन्ह्यांत तो सध्या पोलीस कोठडीत आहे.
धारावीत एका अकरा वर्षांच्या मुलीवर तिच्याच परिचित २५ वर्षांच्या तरुणाने लैगिंक अत्याचार केला. याप्रकरणी गुन्हा दाखल होताच अल्ताफ या तरुणाला धारावी पोलिसांनी अटक केली. त्याच्याविरुद्ध लैगिंक अत्याचारासह पोक्सो कलमांतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला आहे. तक्रारदार महिला ही तिच्या पती आणि अकरा व चार वर्षांच्या दोन मुलीसोबत धारावीत राहते. पती-पत्नी कामावर गेल्यानंतर घरात कोणी नसताना २९ ऑगस्टला सायंकाळी सहा वाजता अल्ताफ हा त्यांच्या घरी आला आणि त्याने अकरा वर्षांच्या मुलीशी अश्लील चाळे करुन तिचा विनयभंग आणि नंतर तिच्यावर लैगिंक अत्याचार केला होता. हा प्रकार मुलीकडून समजताच तक्रारदार महिलेने आरोपीविरुद्ध पोलिसात तक्रार केली होती.