खरेदी केलेल्या फ्लॅटची दुसर्‍या व्यक्तीला विक्री करुन फसवणुक

फसवणुकीच्या गुन्ह्यांत आरोपी पिता-पूत्राला अटक व कोठडी

0

मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
25 डिसेंबर 2025
मुंबई, – बोरिवलीतील एका पुर्नविकास इमारतीमध्ये खरेदी केलेल्या फ्लॅटची परस्पर दुसर्‍या व्यक्तीला विक्री करुन एका कापड व्यापार्‍याची सुमारे 60 लाखांची फसवणुक केल्याप्रकरणी आरोपी पिता-पूत्राला बोरिवली पोलिसांनी अटक् केली. मिहीर अशोक जेठवा आणि अशोक अरविंदभाई जेठवा अशी या दोघांची नावे असून फसवणुकीच्या याच गुन्ह्यांत ते दोघेही सध्या पोलीस कोठडीत आहे. जेठवा पिता-पूत्राविरुद्ध अशाच प्रकारे दहाहून अधिक गुन्ह्यांची नोंद आहे. गुन्हा दाखल होताच ते दोघेही पळून गेले होते. अखेर दिड ते दोन वर्षांनी त्यांना या गुन्ह्यांत पोलिसांनी अटक केली आहे. कस्तुरबा मार्ग पोलिसांनंतर आता त्यांचा बोरिवली पोलिसांनी घेतल्याचे पोलिसांनी सांगितले.

57 वर्षांचे तक्रारदार कापड व्यापारी असून ते बोरिवली परिसरात राहतात. ते त्यांच्या कुटुंबियांसोंबत एका फ्लॅटच्या शोधात होते. याच दरम्यान त्यांना बोरिवलीतील फॅक्टरी लेन, राजदानगर, शिंपोली रोडवरील रोमा सदन या इमारतीच्या पुर्नविकास इमारतीची माहिती दिली. या इमारतीचे बांधकाम त्रिवेणी डेव्हलपर्सच्या वतीने सुरु होते. कंपनीचे मिहीर जेठवा आणि अशोक जेठवा हे संचालक होते. त्यामुळे त्यांनी त्यांच्या बोरिवलीतील कार्यालयात भेट घेऊन रोमा सदन इमारतीमधील फ्लॅटची चौकशी केली होती. यावेळी कंपनीचे मॅनेजर विकास कामदार यांना त्यांच्या फ्लॅटसह इमारतीच्या प्रोजेक्टची माहिती दिली.

याच दरम्यान त्याने त्यांनी कंपनीचे मालक असलेल्या दोन्ही संचालकाशी भेट घडवून आणली होती. यावेळी या दोघांनी त्यांना 682 स्क्वेअर फिटचा फ्लॅट देण्याचे आश्वासन देत फ्लॅटची किंमत 1 कोटी 53 लाख रुपये सांगितली होती. सविस्तर चर्चेनंतर त्यांनी तिथे एक फ्लॅट घेण्याचा निर्णय घेतला. ठरल्याप्रमाणे त्यांनी त्यांना फ्लॅटसाठी टप्याटप्याने साठ लाख रुपयांचे पेमेंट केले होते. या पेमेंटनतर त्यांच्यासोबत कंपनीने एक करार केला होता. या करारात त्यांना बाराव्या मजल्यावरील 1201 फ्लॅट देण्याचे नमूद करण्यात आले होते.

मात्र वारंवार विचारणा करुनही त्यांनी त्यांच्यासोबत फ्लॅटचे रजिस्ट्रेशन केले नाही. ते दोघेही त्यांना टाळण्याचा प्रयत्न करत होते. याच दरम्यान त्यांना मिहीर आणि अशोक जेठवा यांनी त्यांच्या फ्लॅटची परस्पर दुसर्‍या व्यक्तीला विक्री केल्याचे समजले होते. हा प्रकार समजताच त्यांनी त्यांच्याकडे फ्लॅटसाठी दिलेल्या साठ लाखांची मागणी केली होती. मात्र त्यांनी पैसे परत केले नाही. फसवणुकीचा हा प्रकार लक्षात येताच त्यांनी दोन्ही आरोपी पिता-पूत्राविरुद्ध बोरिवली पोलिसांत तक्रार केली होती.

या तक्रारीनंतर मिहीर आणि अशोक जेठवा यांच्याविरुद्ध पोलिसांनी अपहारासह फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. अशाच एका गुन्ह्यांत ते दोघेही कस्तुरबा मार्ग पोलिसांच्या ताब्यात घेतले होते. त्यानंतर त्यांच्याकडून या पिता-पूत्राला बोरिवली पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. याच गुन्ह्यांत दोघांनाही शनिवारी पोलिसांनी अटक केली होती. अटकेनंतर त्यांना दुसर्‍या दिवशी बोरिवलीतील स्थानिक न्यायालयात हजर करण्यात आले होते. यावेळी न्यायालयाने त्यांना पोलीस कोठडी सुनावली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page