फॉरेक्स ट्रेडिंगच्या माध्यमातून अनेकांना ऑनलाईन गंडा

जोगेश्‍वरीतील कॉल सेंटरचा पर्दाफाश; दुकलीस अटक

0

मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
२१ मार्च २०२४
मुंबई, – अंधेरीतील एका कॉल सेंटरच्या माध्यमातून फॉरेक्स ट्रेडिंगमध्ये गुंतवणुकीचे आमिष दाखवून चांगला परतावा देतो असे सांगून ऑनलाईन फसवणुकीचा प्रकार गुन्हे शाखेच्या अधिकार्‍यांनी उघडकीस आणला आहे. याप्रकरणी एका दुकलीस पोलिसांनी अटक केली तर या कटाचा एक मुख्य आरोपी फरार असल्याचे पोलिसांनी सांगितले. मोहम्मद अरबाज मोहम्मद रफिक शेख आणि आशिष शेखर नाडर अशी अटक आरोपींची नावे आहेत. अटकेनंतर या दोघांनाही किल्ला कोर्टाने चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. या टोळीने आतापर्यंत अनेकांची २५ ते ३० लाखांची फसवणुक केल्याचे तपासात उघडकीस आले आहे.

जोगेश्‍वरीतील पाटलीपूत्र, बेहराम बांग रोड, जेएमएस बिझनेस सेंटरमध्ये फस्ट कॅपिटल नावाच्या कंपनीचे एक कॉल सेंटर आहे. या कॉल सेंटरच्या माध्यमातून अनेकांना फॉरेक्स ट्रेडिंगमध्ये गुंतवणुक करण्यास प्रवृत्त केले जाते. मात्र गुंतवणुकीवर कुठलाही परवाता न देता त्यांची फसवणुक होत असल्याची तक्रार गुन्हे शाखेच्या युनिट आठच्या अधिकार्‍यांना मिळाली होती. या माहितीची शहानिशा करण्यासाठी सहाय्यक पोलीस आयुक्त महेश देसाई, प्रभारी पोलीस निरीक्षक लक्ष्मीकांत साळुंखे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक पाटील, प्रजापती, धुतराज, प्रभू, पोलीस उपनिरीक्षक विकास मोरे, पोलीस हवालदार काकडे, सावंत, रहेरे, सटाले, गायकवाड, बिडवे, महिला पोलीस शिपाई भिताडे यांनी तिथे छापा टाकला होता. या कारवाईत पोलिसांनी मोहम्मद अरबाज शेख आणि आशिष नाडर या दोघांना चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. या कंपनीतून काही मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. या दोघांच्या चौकशीतून तिथे फॉरेक्स ट्रेडिंगमध्ये गुंतवणुक करण्यास प्रवृत्त करुन ग्राहकांची फसवणुक होत असल्याचे उघडकीस आले होते.

रजिस्ट्रेशन फॉर्मवर ग्राहकांना त्यांचे नाव आणि मोबाईल टाकून रजिस्टर केले जात होते. त्यानंतर त्यांना कंपनीतून कॉल जात होता. कंपनीतून बोलणारा व्यक्ती त्यांना फॉरेक्स ट्रेडिंगची माहिती देऊन त्यांना कंपनीचे स्वॉफ्टवेअर वापरण्याची माहिती देत होते. अशा प्रकारे ग्राहकांना विविध करन्सी ट्रेडिंगबाबत मोठ्या फायद्याचे आमिष दाखवून त्यांना दोन विविध ऍप्लीकेशन मोबाईन फोन आणि लॅपटॉपमध्ये डाऊनलोन करण्यास सांगितले जात होते. या सॉफ्टवेअरवर शंभर ते एक हजार युएस डॉलर विक्री करण्यास प्रवृत्त केले जात होते. ग्राहकांनी करन्सी ट्रेडिंग केल्यानंतर त्यांना या व्यवहारात तोटा झाल्याचे सॉफ्टवेअरच्या माध्यमातून दाखविले जात होते. त्यांना कुठलाही आर्थिक नफा किंवा परतावा न देता त्यांची फसवणुक केली जात होती. अशा प्रकारे या कंपनीने आतापर्यत अनेकांना २५ ते ३० लाख रुपये गुंतवणुक करण्यास प्रवृत्त करुन त्यांची फसवणुक केली होती. हा प्रकार उघडकीस येताच या दोन्ही आरोपींना पोलिसांनी अटक केली होती. अटकेनंतर या दोघांनाही किल्ला कोर्टात हजर करण्यात आले होते. या गुन्ह्यांत आमान अस्लम पटेल हा मुख्य आरोपी फरार असून त्याच्या अटकेसाठी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page