मैत्रिणीचे अश्‍लील फोटो-व्हिडीओ व्हायरल करुन बदनामी

हरियाणाच्या दोन बंधूंविरुद्ध गुन्हा दाखल

0

मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
१० जानेवारी २०२४
मुंबई, – सोशल मिडीयावर २१ वर्षांच्या तरुणीची तिच्याच मित्रासह भावाने अश्‍लील फोटोसह व्हिडीओ व्हायरल करुन तिची बदनामी केल्याचा धक्कादायक प्रकार विलेपार्ले परिसरात उघडकीस आला आहे. याप्रकरणी या तरुणीच्या तक्रारीवरुन आर्यनकुमार आणि अजयकुमार या दोन बंधूंविरुद्ध जुहू पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. ते दोघेही हरियाणाचे रहिवाशी असून त्यांच्या अटकेसाठी जुहू पोलिसांची एक टिम तिथे जाणार असल्याचे सांगण्यात आले. अश्‍लील फोटोसह व्हिडीओ व्हायरल झाल्याने या तरुणीसह तिच्या कुटुंबियांना प्रचंड मानसिक धक्का बसला आहे.

२१ वर्षांची तक्रारदार तरुणी ही विलेपार्ले येथे तिच्या कुटुंबियांसोबत राहते. वांद्रे येथील एका नामांकित कॉलेजमध्ये ती बीएसच्या हॉटेल मॅनेजमेंटच्या तिसर्‍या वर्षांत शिकते. तिचे इंटाग्रामवर एक अकाऊंट असून सप्टेंबर २०२४ रोजी तिला आर्यनकुमार नावाच्या एका तरुणाकडून फे्रंड रिक्वेस्ट आली होती. तिने त्याची फें्रड रिक्वेस्ट स्विकारली होती. त्यानंतर ते दोघेही चॅटवरुन एकमेकांच्या संपर्कात होते. अनेकदा ते व्हिडीओ कॉल करुन तासनतास गप्पा मारत होते. या संभाषणादरम्यान आर्यन तिच्याशी अश्‍लील संभाषण करत होता, मात्र तिने त्याला अश्‍लील संभाषण करण्यास स्पष्टपणे नकार दिला होता. त्याचा राग आल्याने त्याने तिच्या घरच्यांना त्यांच्या मैत्रीबाबत माहिती शेअर करण्याची धमकी दिली होती. ही धमकी देऊन तो तिला ब्लॅकमेल करत होता. तिला अंगावरील काढण्यास प्रवृत्त करत होता. दोेन महिन्यांत त्यांच्यात संभाषण सुरु होते.

कॉलेजमध्ये परिक्षा असल्याने तिने तिचा इंटाग्राम अकाऊंट बंद केला होता. ७ जानेवारी २०२५ रोजी तिने पुन्हा इंटाग्राम ऍप डाऊनलोड केला होता. याच दरम्यान आर्यनकुमारने कॉल केला होता. त्याने तिला तिचे अकाऊंट बंद करण्याची धमकी दिली होती. तिने अकाऊंट बंद केला नाहीतर तिची बदनामी करु असे सांगितले होते. रात्री आठ वाजता आर्यनकुमारचा भाऊ अजयकुमारने तिला फोन करुन त्यांच्यातील वाद मिटविण्याचा सल्ला दिला. नाहीतर तो तिचे अश्‍लील फोटो आणि व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल करुन तिची बदनामी करणार असल्याची धमकी दिली होती. मात्र तिने त्याकडे दुर्लक्ष केले होते. दुसर्‍या दिवशी तिला आर्यनकुमार आणि त्याचा भाऊ अजयकुमारने वेगवेगळ्या अकाऊंटवरुन तिचे अश्‍लील फोटो आणि व्हिडीओ व्हायरल करुन तिची बदनामी केली होती.

हा प्रकार तिच्यासह तिच्या मित्र-मैत्रिणीच्या निदर्शनास येताच त्यांनी तिला फोनवरुन ही माहिती सांगितली होती. तिने तिचे अकाऊंट ओपन केले असता त्यात तिचे अश्‍लील फोटो आणि व्हिडीओ व्हायरल झाल्याचे दिसून आले. त्यामागे आर्यनकुमार आणि अजयकुमार हे दोघेच जबाबदार असल्याने तिने या दोघांविरुद्ध जुहू पोलिसांत तक्रार केली होती. या तक्रारीची पोलिसांनी गंभीर दखल घेत तिच्या तक्रारीवरुन आर्यनकुमार आणि अजयकुमार या दोन्ही बंधूंविरुद्ध सोशल मिडीयावर अश्‍लील फोटो आणि व्हिडीओ व्हायरल करुन तरुणीची बदनामी केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. दोन्ही आरोपी बंधू हरियाणाच्या सेक्टर क्रमांक तेरा, अंबाला मानव चौकचे रहिवाशी आहे. त्यांच्या अटकेसाठी जुहू पोलिसांची एक टिम लवकरच हरियाणा येथे जाणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page