मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
12 जून 2025
मुंबई, – शहरात चार वेगवेगळ्या घटनेत चार अल्पवयीन मुलीच्या विनयभंगाच्या घटनेने स्थानिक रहिवाशांमध्ये प्रचंड संतापाची लाट उसळली होती. याप्रकरणी एका डॉक्टरसह चौघांविरुद्ध स्थानिक पोलिसांनी विनयभंगासह पोक्सो कलमांतर्गत गुन्हा दाखल केलाद आहे. या चारही घटना गोवंडी, मालाड आणि मालवणी परिसरात घडल्याचे पोलिसांनी सांगितले. यातील एका गुन्ह्यांतील आरोपीस पोलिसांनी अटक केली तर तिघांचा पोलिसांकडून शोध सुरु आहे.
पहिल्या गुन्ह्यांतील बळीत मुलगी गोवंडीतील बैंगनवाडीत राहते. याच पसिरात आरोपी डॉक्टरचा एक खाजगी नर्सिंग होम दवाखाना आहे. मंगळवारी 10 जूनला सायंकाळी पावणेसहा वाजता ही मुलगी आजारी असल्याने नर्सिंग होममध्ये आली होती. यावेळी आरोपी डॉक्टरने तिला तपासण्याच्या बहाण्याने अश्लील चाळे करुन तिचा विनयभंग केला होता. सुरुवातीला तिने त्याकडे दुर्लक्ष केले होते. मात्र नंतर त्याने तिच्या छातीला नकोसा स्पर्श करुन तिचा विनयभंग केला होता. तेच काही प्रकार कोणालाही सांगू नकोस असे सांगितले होते. या प्रकाराने ती प्रचंड घाबरली आणि तिने घडलेला प्रकार तिच्या आईला सांगितला. त्यानंतर त्यांनी शिवाजीनगर पोलिसांना घडलेला प्रकार सांगून तिथे आरोपी डॉक्टरविरुद्ध तक्रार केली होती. या तक्रारीची पोलिसांनी गंभीर दखल घेत बळीत मुलीच्या तक्रारीवरुन डॉक्टरविरुद्ध विनयभंगासह पोक्सो कलमांतर्गत गुन्हा दाखल केला होता. याच गुन्ह्यांत त्याची पोलिसाकडून चौकशी सुरु आहे. बळीत मुलगी आणि डॉक्टर एकाच परिसरात राहत असून एकमेकांच्या परिचित असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.
गोवंडीतील अन्य एका घटनेत अकरा वर्षांच्या मुलीचा विनयभंग झाल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी हमालीचे काम करणार्या एका 27 वर्षांच्या तरुणाला शिवाजीनगर पोलिसांनी अटक केली. बळीत मुलगी ही गोवंडी येथे राहत असून आरोपी हा तिच्या मैत्रिणीचा काका आहे. सोमवारी सायंकाळी पावणेसात वाजता ती तिच्या घरी होती. यावेळी तिथे आरोपी आला आणि त्याने तिचा तोंड दाबून मारहाण करण्याची धमकी दिली. त्यानंतर तिच्या छातीला नकोसा स्पर्श करुन त्याने तिचा विनयभंग केला होता. हा प्रकार कोणालाही सांगू नकोस असे धमकावून तो पळून गेला होता. हा प्रकार तिने तिच्या नातेवाईकाला सांगितला. त्यानंतर त्यांनी शिवाजीनगर पोलिसांत आरोपीविरुद्ध तक्रार केली होती. याप्रकरणी विनयभंगासह पोक्सो कलमांतर्गत गुन्हा दाखल होताच आरोपीस काही तासांत पोलिसांनी अटक केली. याच गुन्ह्यांत तो सध्या पोलीस कोठडीत आहे.
मालाड येथील तिसर्या घटनेत एका अकरा वर्षांच्या मुलीचा अज्ञात व्यक्तीने विनयभंग केला. याप्रकरणी कुरार पोलिसांनी पळून गेलेल्या आरोपीविरुद्ध विनयभंगासह पोक्सो कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. त्याचा पोलिसांकडून शोध सुरु आहे. बळीत मुलगी सोमवारी सकाळी अकरा वाजता घराजवळ खेळत होती. यावेळी तिथे आलेल्या अज्ञात व्यक्तीने वाईट हेतूने तिला अश्लील स्पर्श करुन तिचा विनयभंग केला होता. हा प्रकार तिच्याकडून तिच्या आईला समजताच तिने कुरार पोलिसांना ही माहिती दिली होती. तिच्या तक्रारीनंतर पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल केला होता.
चौथ्या घटनेत पंधरा वर्षांच्या मुलीचा तिचयाच परिचित आरोपीने विनयभंग केला. तिने त्याच्याशी बोलण्यास नकार दिल्यास तिचा गळा कापून टाकण्याची धमकी दिली होती. याप्रकरणी 20 वर्षांच्या आरोपीविरुद्ध पोलिसांनी विनयभंगासह धमकी दिल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. बळीत मुलगी मालाडच्या मालवणी परिसरात राहते. आरोपी याच परिसरात राहत असून एकमेकांच्या परिचित आहेत. 14 मार्चला त्याने तिच्याशी अश्लील चाळे करुन तिचा विनयभंग केला होता. तो तिला सतत अश्लील मॅसेज पाठवत होता. तिने त्याला टाळण्याचा प्रयत्न केला, यावेळी त्याने तिला तिचा गळा कापण्याची धमकीचा मॅसेज पाठविला होता. या प्रकाराने ती प्रचंड घाबरली होती. त्यामुळे तिने तिच्या आईला हा प्रकार सांगितला. त्यानंतर तिने मालवणी पोलिसांत आरोपीविरुद्ध तक्रार केली होती. या तक्रारीनंतर त्याच्याविरुद्ध पोलिसांनी विनयभंगासह पोक्सो कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्यांत त्याला पाहिजे आरोपी दाखविण्यात आले आहे.