गणपती विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर शहरातील बंदोबस्तात वाढ
कुठेही अनुचित प्रकार घडू नये म्हणून मुंबई पोलीस सज्ज
मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
5 सप्टेंबर 2025
मुंबई, – गणपती विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर मुंबई शहरातील बदंदोबस्तात प्रचंड वाढ करण्यात आली आहे. शहरात कुठेही अनुचित प्रकार घडू नये किंवा विसर्जनाला कुठेही गालबोट लागू नये म्हणून पोलीस सज्ज झाले आहे. योग्य ती खबरदारी घेण्यात आल्याचे सहपोलीस आयुक्त सत्यनारायण चौधरी आणि अनिल कुंभारे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. संपूर्ण शहरात दहा अतिरिक्त पोलीस आयुक्त, 37 पोलीस उपायुक्त, 61 सहाय्यक पोलीस आयुक्त, 2990 पोलीस अधिकारी आणि 17 हजार 557 पोलीस अंमलदारांना तैनात करण्यात आले आहे. मुंबई पोलिसांच्या मदतीला एसआरपीएफ पथक, जलद प्रतिसाद पथक, दंगल नियंत्रण पथक, डेल्टा, कॉम्बॅक्ट, होमगार्ड,, महाराष्ट्र सुरक्षा बल, अॅण्टी ड्रोन पथक आदींची मदत घेण्यात आली आहे. दुसरीकडे गणेशोत्सावात वाहतूक सुरळीत व्हावी यासाठी वाहतूक पोलिसांनी विशेष नियोजन केले आहे. गणपती विसर्जनासाठी घेतलेल्या वाहनांची तपासणी करा तसेच वाहनचालकांना शक्यतो गाडी सोडून जाण्यास सांगू नये. त्यासाठी गणेश भक्तांनी मुंबई पोलिसांसह वाहतूक पोलिसांना सहकार्य करावे असे आवाहन वाहतूक पोलिसांकडून करण्यात आले आहे.
शुक्रवारी शहराचे कायदा व सुव्यवस्थेचे सहपोलीस आयुक्त सत्यनारायण चौधरी आणि वाहतूक विभागाचे सहपोलीस आयुक्त अनिल कुंभारे यांनी संयुक्त पत्रकार परिषेदत ही माहिती दिली. गणपतीला आराध्य दैवताचे स्थान असल्याने मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्र गणेशोत्सव मोठ्या आनंदात आणि उत्सावात साजरा केला जातो. 27 ऑगस्टला गणेशोत्सवाला सुरुवात झाली होती, त्यानंतर दिड, पाच, सात दिवसांच्या गणपतीसह गौरी विसर्जन कुठल्याही विर्घ्नाशिवाय पार पडले होते. शनिवारी 6 सप्टेंबरला अनंत चर्तुदशी असल्याने शहरातील बंदोबस्तात प्रचंड वाढ करण्यात आली आहे. गणपती विसर्जनानिमित्त मिरवणुकीत कायदा व सुव्यवस्था बिघडणार नाही याची योग्य ती खबदारी घेण्यात आली होती. विसर्जनाच्या मिरवणुकीत कुठेही गालबोट लागू नये म्हणून पोलीस सज्ज झाले आहे. संपूर्ण शहरात दहा अतिरिक्त पोलीस आयुक्त, 37 पोलीस उपायुक्त, 61 सहाय्यक पोलीस आयुक्त, 2990 पोलीस अधिकारी आणि 17 हजार 557 पोलीस कर्मचारी तैनात करण्यात आले आहे. मुंबई पोलिसांच्या मदतीला एसआरपीएफ पथक, जलद प्रतिसाद पथक, दंगल नियंत्रण पथक, डेल्टा, कॉम्बॅक्ट, होमगार्ड,, महाराष्ट्र सुरक्षा बल आदींची मदत घेण्यात आली आहे.
या सर्वांवर स्वत पोलीस आयुक्तासह पाच सहपोलीस आयुक्त हे जातीने लक्ष ठेवणार आहे. शहरात काही अतिसंदेवनशील ठिकाणे असून या ठिकाणी अतिरिक्त पोलीस बंदोबस्त ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. विर्सजनाच्या ठिकाणी अतिरिक्त बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. संभाव्य दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर क्युआरटीच्या पथकांसह मुंबई पोलिसांच्या दहशतवाद विरोधी कक्षाच्या कर्मचार्यांना तैनात ठेवण्यात आले आहेत. कुठल्याही अफवांवर मुंबईकरांनी विश्वास ठेवू नये. शांतता राखावी असे पोलिसांकडून आवाहन करण्यात आले आहे. गर्दीचे व्यवस्थापन, आपत्ती व्यवस्थापन, क्राईम फ्रन्ट अशा विविध कक्षांची स्थापना करण्यात आली आली आहे.
शनिवारी आपल्या लाडक्या गणरायाला निरोप देण्यासाठी मोठ्या प्रमाणात भाविक घराबाहेर पडतात. या भाविकांना विशेषता महिलांना त्रास होऊ नये यासाठी विशेष काळजी घ्या. छेडछाड करणार्यांविरुद्ध कठोर कारवाई करा, एकापेक्षा अधिक लैगिंक स्वरुपाचे गुन्हे असलेल्या आरोपींविरुद्ध प्रतिबंधात्मक कारवाई करण्याचे आदेश सर्वच पोलीस ठाण्याच्या अधिकार्यांना देण्यात आले आहे. छेडछाड करणार्या तरुणांविरुद्ध महिलांनी तिथे उपस्थित पोलिसांना अथवा स्थानिक पोलिसांत तक्रार करावी असेही आवाहन करण्यात आले आहे. मोबाईल आणि पाकिट चोरीच्या घटना घडू नये म्हणून पोलीस साध्या वेशात गस्त घालणार आहेत.
लालबागचा राजासह इतर मोठ्या मंडळाच्या गणेश विसर्जनादरम्यान पोलिसांना सतर्क राहण्याचे आदेश देण्यात आले आहे. गिरगाव चौपाटी येथे मोठ्या संख्येने भाविक येतात. या गर्दीवर सीसीटिव्ही कॅमेर्याच्या मदतीने लक्ष ठेवले जाणार आहे. तिथेच एक मिनी कंट्रोल रुम उभारण्यात आला आहे. कायदा व सुव्यवस्था बिघडणार नाही याची सर्वांनीच काळजी घ्यावी. शक्यतो पोलिसांना हस्तक्षेप करण्यास भाग पाडू नये असेही आवाहनही पोलिसांकडून करण्यात आले आहे. बंदोबस्तात कुठेही हलगर्जीपणा खपवून घेतला जाणार नाही अशी सक्त ताकिदच पोलिसांना देण्यात आली आहे. कोणत्याही प्रकारची समस्या असल्यास मुंबईकरांनी मुंबई पोलिसांच्या 100 व 112 या क्रमांकावर कंट्रोल रुमशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.
विसर्जनासाठी वाहतूकीत मोठ्या प्रमाणात बदल
मंगळवारी गणपती विसर्जनानिमित्त वाहतूकीत मोठ्या प्रमाणात बदल करण्यात आले आहे. गिरगाव, शिवाजीपार्क, मालाडच्या मालवणी टी जंक्शन, जुहू चौपाटी आणि पवईतील गणेश घाट या महत्त्वाच्या विसर्जन ठिकाणी मुंबई शहर वाहतूक पोलिसांकडून नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आले आहे. काही मार्गात बदल करण्यात आले आहे. वाहतुकीसाठी काही रस्ते बंद ठेवण्यात आले तर काही ठिकाणी एक दिशा मार्ग, काही ठिकाणी अवजड वाहनांना बंदी घालण्यात आली तर गर्दीच्या ठिकाणी पार्किंगला बंदी घालण्यात आली आहे. संपूर्ण शहरात पाच हजार सीसीटिव्ही कॅमेरे बसविण्यात आले असून त्यांच्या मदतीने गर्दीच्या ठिकाणी लक्ष ठेवण्यात येणार आहे. रेतीत वाहने अडकू नये म्हणून प्लेट बसविण्यात आले आहे. वाहतूक पोलिसांचे साडेतीन ते चार हजार पोलीस कर्मचारी, सशस्त्र दलाचे जवान, होमगार्ड, वाहतुक रक्षक, जलसुरक्षा दलाचे जवान, नागरीक संरक्षण दलाचे जवान आणि स्वयंसेवक वाहतूक पोलिसांच्या मदतीसाठी तैनात करण्यात आले आहे.
विसर्जनासाठी रेल्वे पोलीस सज्ज
गणपती विसर्जनासाठी मुंबई रेल्वे पोलीस सज्ज झाले असून सर्व रेल्वे पोलीस ठाण्यातंर्गत असणार्या प्रत्येक रेल्वे स्थानकावर विशेष पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. विशेषता चर्चगेट, चर्नीरोड, ग्रँटरोड, मरिनलाईन्स, भायखळा, चिंचपोकळी, करीरोड, दादर या रेल्वे स्थानकांवर गणेश विसर्जनाच्या अनुषगाने प्रचंड मोठ्या प्रमाणात गर्दी जमा होते. त्यामुळे या रेल्वे स्थानकात येण्या-जाण्याच्या मार्गावर गर्दीचे विभाजन करण्याच्या उद्देशाने दोरखंड आणि बॅरीकेट आदी साधनांचा वापर करण्यात येणार आहे. मेगाफोनद्वारे सर्व रेल्वे प्रवाशांना सुरक्षितेच्या दृष्टीने मार्गदर्शन करण्यात येणार आहे. रेल्वेचे पोलीस आयुक्त एम. के कलासागर यांनी बंदोबस्ताबाबत एक बैठकीत घेतली होती. या बैठकीत विसर्जन बंदोबस्ताचे नियोजन करण्यत आले होते. दोन पोलीस उपायुक्त, सहाय्यक पोलीस आयुक्त, पोलीस निरीक्षक, सहाय्यक पोलीस निरीक्षक, पोलीस उपनिरीक्षक, पोलीस अंमलदार असा सुमारे तीन ते साडेतीन रेल्वे पोलिसांसह दोन हजार होमगार्ड, महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळाचे जवान, दंगल नियंत्रण पथके, आरसीपी, जलद प्रतिसाद पथकाच्या हिट क्यूआरटी, बीडीडीएस आणि डॉग स्काँड यांच्यासह मुख्यालयातील तीनशेहून अधिक पोलीस अंमलदारांना बंदोबस्ताकामी तैनात करण्यात आले आहे.