गणेश विसर्जनासह ईद-ए-मिलादनिमित्त कडेकोट बंदोबस्त
कुठेही अनुचित प्रकार घडू नये म्हणून मुंबई पोलीस सज्ज
मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
१६ सप्टेंबर २०२४
मुंबई, – आपल्या लाडक्या गणेशाच्या आगमनानंतर आता मंगळवारी १७ सप्टेंबरला होणार्या विसर्जनासह ईद-ए-मिलादनिमित्त मुंबई शहरात सर्वत्र कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. शहरात कुठेही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलीस सज्ज झाले असून संपूर्ण शहरात नऊ अतिरिक्त पोलीस आयुक्त, ४० पोलीस उपायुक्त, ५६ सहाय्यक पोलीस आयुक्त, ४०१३ पोलीस अधिकारी आणि २० हजार ५१० पोलीस अंमलदारांना तैनात करण्यात आले ाहे. मुंबई पोलिसांच्या मदतीला एसआरपीएफ पथक, जलद प्रतिसाद पथक, दंगल नियंत्रण पथक, डेल्टा, कॉम्बॅक्ट, होमगार्ड,, महाराष्ट्र सुरक्षा बल आदींची मदत घेण्यात आली आहे. विशेष म्हणजे यंदा मुंबई पोलिसाकडून नाविन्यपूर्ण कल्याणकारी योजना राखविण्यात येत आहे. दुसरीकडे गणेशोत्सावात वाहतूक सुरळीत व्हावी यासाठी वाहतूक पोलिसांनी विशेष नियोजन केले आहे. गणपती विसर्जनासाठी घेतलेल्या वाहनांची तपासणी करा तसेच वाहनचालकांना शक्यतो गाडी सोडून जाण्यास सांगू नये. त्यासाठी गणेश भक्तांनी मुंबई पोलिसांसह वाहतूक पोलिसांना सहकार्य करावे असे आवाहन वाहतूक पोलिसांकडून करण्यात आले आहे.
गणपतीला आराध्य दैवताचे स्थान असल्याने मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्र गणेशोत्सव मोठ्या आनंदात आणि उत्सावात साजरा केला जातो. ७ सप्टेंबरला गणेशोत्सवाला सुरुवात झाली होती, त्यानंतर दिड, पाच, सात दिवसांच्या गणपतीसह गौरी विसर्जन कुठल्याही विर्घ्नाशिवाय पार पडले होते. मंगळवारी १७ सप्टेंबरला अनंत चर्तुदशी आणि दुसर्या दिवशी ईद-ए-मिलादनिमित्त मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले होते. त्यामुळे मुंबई शहरात कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवला आहे. विर्सजनासह ईदच्या मिरवणुकीत कुठेही गालबोट लागू नये म्हणून पोलीस सज्ज झाले आहे. संपूर्ण शहरात नऊ अतिरिक्त पोलीस आयुक्त, ४० पोलीस उपायुक्त, ५६ सहाय्यक पोलीस आयुक्त, ४०१३ पोलीस अधिकारी आणि २० हजार ५१० पोलीस अंमलदारांना तैनात करण्यात आले ाहे. मुंबई पोलिसांच्या मदतीला एसआरपीएफ पथक, जलद प्रतिसाद पथक, दंगल नियंत्रण पथक, डेल्टा, कॉम्बॅक्ट, होमगार्ड,, महाराष्ट्र सुरक्षा बल आदींची मदत घेण्यात आली आहे. या सर्वांवर स्वत पोलीस आयुक्त, विशेष पोलीस आयुक्त, पाच सहपोलीस आयुक्त हे जातीने लक्ष ठेवणार आहे. शहरात काही अतिसंदेवनशील ठिकाणे असून या ठिकाणी अतिरिक्त पोलीस बंदोबस्त ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सव्वाशेहून अधिक विर्सजनाची ठिकाणी असून विर्सजनाच्या दिवशी या ठिकाणीही अतिरिक्त बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
संभाव्य दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर क्युआरटीच्या पथकांसह मुंबई पोलिसांच्या दहशतवाद विरोधी कक्षाच्या कर्मचार्यांना तैनात ठेवण्यात आले आहेत. कुठल्याही अफवांवर मुंबईकरांनी विश्वास ठेवू नये. शांतता राखावी असे पोलिसांकडून आवाहन करण्यात आले आहे. गर्दीचे व्यवस्थापन, आपत्ती व्यवस्थापन, क्राईम फ्रन्ट अशा विविध कक्षांची स्थापना करण्यात आली आली आहे. मंगळवारी आपल्या लाडक्या गणरायाला निरोप देण्यासाठी मोठ्या प्रमाणात भाविक घराबाहेर पडतात. या भाविकांना विशेषता महिलांना त्रास होऊ नये यासाठी विशेष काळजी घ्या. छेडछाड करणार्यांविरुद्ध कठोर कारवाई करा, एकापेक्षा अधिक लैगिंक स्वरुपाचे गुन्हे असलेल्या आरोपींविरुद्ध प्रतिबंधात्मक कारवाई करण्याचे आदेश सर्वच पोलीस ठाण्याच्या अधिकार्यांना देण्यात आले आहे. छेडछाड करणार्या तरुणांविरुद्ध महिलांनी तिथे उपस्थित पोलिसांना अथवा स्थानिक पोलिसांत तक्रार करावी असेही आवाहन करण्यात आले आहे. मोबाईल आणि पाकिट चोरीच्या घटना घडू नये म्हणून पोलीस साध्या वेशात गस्त घालणार आहेत. लालबागचा राजासह इतर मोठ्या मंडळाच्या गणेश विसर्जनादरम्यान पोलिसांना सतर्क राहण्याचे आदेश देण्यात आले आहे.
गिरगाव चौपाटी येथे मोठ्या संख्येने भाविक येतात. या गर्दीवर सीसीटिव्ही कॅमेर्याच्या मदतीने लक्ष ठेवले जाणार आहे. तिथेच एक मिनी कंट्रोल रुम उभारण्यात आला आहे. मंगळवारी पहाटेपर्यंत लोकल सुरु असल्याने प्रत्येक महिलांच्या डब्ब्यात रेल्वे पोलिसांना तैनात करण्यात आले आहे. कायदा व सुव्यवस्था बिघडणार नाही याची सर्वांनीच काळजी घ्यावी. शक्यतो पोलिसांना हस्तक्षेप करण्यास भाग पाडू नये असेही आवाहनही पोलिसांकडून करण्यात आले आहे. बंदोबस्तात कुठेही हलगर्जीपणा खपवून घेतला जाणार नाही अशी सक्त ताकिदच पोलिसांना देण्यात आली आहे. कोणत्याही प्रकारची समस्या असल्यास मुंबईकरांनी मुंबई पोलिसांच्या १०० व ११२ या क्रमांकावर कंट्रोल रुमशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.
विसर्जनासाठी वाहतूकीत मोठ्या प्रमाणात बदल
मंगळवारी गणपती विसर्जनानिमित्त वाहतूकीत मोठ्या प्रमाणात बदल करण्यात आले आहे. गिरगाव, शिवाजीपार्क, मालाडच्या मालवणी टी जंक्शन, जुहू चौपाटी आणि पवईतील गणेश घाट या महत्त्वाच्या विसर्जन ठिकाणी मुंबई शहर वाहतूक पोलिसांकडून नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आले आहे. काही मार्गात बदल करण्यात आले आहे. वाहतुकीसाठी काही रस्ते बंद ठेवण्यात आले तर काही ठिकाणी एक दिशा मार्ग, काही ठिकाणी अवजड वाहनांना बंदी घालण्यात आली तर गर्दीच्या ठिकाणी पार्किंगला बंदी घालण्यात आली आहे. संपूर्ण शहरात पाच हजार सीसीटिव्ही कॅमेरे बसविण्यात आले असून त्यांच्या मदतीने गर्दीच्या ठिकाणी लक्ष ठेवण्यात येणार आहे. रेतीत वाहने अडकू नये म्हणून प्लेट बसविण्यात आले आहे. वाहतूक पोलिसांचे साडेतीन ते चार हजार पोलीस कर्मचारी, सशस्त्र दलाचे जवान, होमगार्ड, वाहतुक रक्षक, जलसुरक्षा दलाचे जवान, नागरीक संरक्षण दलाचे जवान आणि स्वयंसेवक वाहतूक पोलिसांच्या मदतीसाठी तैनात करण्यात आले आहे. उत्तर मुंबईतून दक्षिण मुंबईत जाण्यासाठी धर्मवीर स्वराज्य रक्षक संभाजी महाराज रोडचा वापर करावा. अटल सेतूकडून दक्षिण मुंबई विलासराव देशमुख पूर्व मुक्त महामार्गांवर जाण्यासाठी पी. डिमेलो रोड, कल्पना जंक्शन येथून उजवे वळण घेऊन छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, महानगरपालिका मार्ग, मेट्रो येथून प्रिसेंस स्ट्रिट र्मो कोस्टल रोडचा वापर करावा.
विसर्जनासाठी रेल्वे पोलीस सज्ज
गणपती विसर्जनासाठी मुंबई रेल्वे पोलीस सज्ज झाले असून सर्व रेल्वे पोलीस ठाण्यातर्ंगत असणार्या प्रत्येक रेल्वे स्थानकावर विशेष पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. विशेषता चर्चगेट, चर्नीरोड, ग्रँटरोड, मरिनलाईन्स, भायखळा, चिंचपोकळी, करीरोड, दादर या रेल्वे स्थानकांवर गणेश विसर्जनाच्या अनुषगाने प्रचंड मोठ्या प्रमाणात गर्दी जमा होते% त्यामुळे या रेल्वे स्थानकात येण्या-जाण्याच्या मार्गावर गर्दीचे विभाजन करण्याच्या उद्देशाने दोरखंड आणि बॅरीकेट आदी साधनांचा वापर करण्यात येणार आहे. मेगाफोनद्वारे सर्व रेल्वे प्रवाशांना सुरक्षितेच्या दृष्टीने मार्गदर्शन करण्यात येणार आहे. मंगळवारी १७ सप्टेंबरला पोलीस आयुक्तांच्या मार्गदर्शनाखाली दोन पोलीस उपायुक्त, चार सहाय्यक पोलीस आयुक्त, ४६ पोलीस निरीक्षक, ३० सहाय्यक पोलीस निरीक्षक, ११४ पोलीस उपनिरीक्षक, २९५० पोलीस अंमलदार, दोन हजार होमगार्ड, १५० महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळाचे जवान, तीन दंगल नियंत्रण पथके, आरसीपी, चार जलद प्रतिसाद पथकाच्या हिट क्यूआरटी, बीडीडीएस आणि डॉग स्कॉंड यांच्यासह मुख्यालयातील दिडशेहून अधिक पोलीस अंमलदारांना बंदोबस्ताकामी तैनात करण्यात आले आहे.