पोर्नोग्राफीसह मनी लॉड्रिंंगप्रकरणी गेहना वशिष्ठच्या अडचणीत वाढ
साडेसहा तासाच्या चौकशीसाठी मंगळवारी हजर राहण्याचे आदेश
मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
९ डिसेंबर २०२४
मुंबई, – पोर्नोग्राफीसह मनी लॉड्रिंगप्रकरणात सिनेअभिनेत्री गेहना वशिष्ठ हिच्या अडच्णीत चांगलीच वाढ झाली होती. याच गुन्ह्यांत सोमवारी साडेसहा तासाच्या चौकशीनंतर तिला मंगळवारी पुन्हा चौकशीसाठी हजर राहण्याचे समन्स ईडीकडून देण्यात आले आहे. याच गुन्ह्यांत राज कुंद्रा याचीही लवकरच ईडीकडून चौकशी होणार आहे. साडेसहाच्या चौकशीत गेहनाने अनेक धक्कादायक गोष्टींचा पर्दाफाश केल्याचे वृत्त आहे. मात्र या चौकशीचा तपशील समजू शकला नाही. गेहनाच्या चौकशीची शहानिशा सुरु असल्याचे सांगण्यात आले.
अश्लील चित्रपटांची निर्मिती केल्याप्रकरणी राज कुंद्रा याच्यासह इतर आरोपींविरुद्ध फेब्रुवारी २०२१ रोजी मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने गुन्हा दाखल केला होता. याच गुन्ह्यांत राजसह अकराजणांना पोलिसांनी अटक केली होती. याच दरम्यान गुन्हे शाखेच्या एका पथकाने मालाडच्या मालवणी-मढ परिसरातील एका बंगल्यावर छापा टाकला होता. तपासात तिथे काही अश्लील चित्रपटाचे शूटींग झाले होते. दोन महिने कारागृहात राहिल्यानंतर राजला विशेष सेशन कोर्टाने जामिन मंजूर केला होता. याच प्रकरणात अकरा आरोपीविरुद्ध पोलिसांनी आरोपपत्र सादर केले होते. त्यात या संपूर्ण कटात राज कुंद्रा हा मुख्य आरोपी दाखविण्यात आले होते. या संपूर्ण प्रकरणात मोठ्या प्रमाणात मनी लॉड्रिंग झाल्याचा आरोप झाला होता. त्यामुळे ईडीने स्वतंत्रपणे तपास सुरु केला होता. तपासादरम्यान आलेल्या माहितीनंतर या पथकने राज कुंद्रा, सिनेअभिनेत्री गेहना वशिष्ठ हिच्यासह इतरांच्या घरासह कार्यालयात एकाच वेळेस छापा टाकला होता. यावेळी या दोघांचे अनेक बँक खाती, डिमॅट खाती गोठविण्यात आले होते.
तपासाचा एक भाग म्हणून गेल्या आठवड्यात गेहना हिला ईडीकडून चौकशीसाठी हजर राहण्याचे समन्स बजाविण्यात आले होते. या समन्सनंतर गेहना ही सोमवारी फोर्ट येथील बॅलार्डपिअर येथील सक्तवसुली संचालनालयाच्या कार्यालयात हजर झाली होती. दुपारी बारा वाजता ती कार्यालयात गेल्यानंतर तिची सुमारे साडेसहा तास कसून चौकशी करुन जबानी नोंदविण्यात आली. त्यानंतर तिला सायंकाळी सोडून देण्यात आले. चौकशीनंतर तिने पत्रकारांशी बोलताना ईडीकडून तिच्या कार्यालयात कारवाई झाली होती. यावेळी तिच्या बँक खात्यासह इतर दस्तावेज ताब्यात घेतल्यानंतर म्युच्यअल फंडासह बँक खाते गोठविण्यात आले होते. राज कुंद्रासोबत काम केल्यानंतर त्यांच्यात कामासंदर्भात आर्थिक व्यवहार झाले होते. त्याच्यासोबत तिने अकराहून अधिक हॉटशॉटसाठी चित्रपट बनविले आहेत. त्यात २० ते २५ दिग्दर्शकांनी काम केले असून त्यासाठी तिला ३३ लाखांचे पेमेंट मिळाले होते. सर्वांचे पेमेंट दिल्यानंतर उर्वरित रक्कम तिने मोबदला म्हणून स्वतकडे ठेवल होता. या व्यवहाराची माहिती आपण ईडीला सांगून तपासात सहकार्य केल्याचे सांगितले.
राज कुंद्रा याचे काही विदेशी कंपन्यांशी आर्थिक व्यवहार झाले आहे. या व्यवहाराबाबत तिला काही प्रश्न विचारण्यात आल्याचे तिने सांगितले. याच गुन्ह्यांत राज कुंद्रा यालाही चौकशीसाठी समन्स पाठविण्यात आले होते. मात्र तो चौकशीसाठी हजर राहिला नाही. साडेसहा तासाच्या चौकशीनंतर गेहनाला मंगळवारी पुन्हा चौकशीसाठी हजर राहण्याचे समन्स बजाविण्यात आले आहे.