गेटवेच्या समुद्रात प्रवासी बोट बुडाली 

घटनेचे विडिओ सोशल मीडियावर व्हायरल 

0
मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
१८ डिसेंबर २०२४
मुंबई, – प्रवाशाना घेऊन निघालेली निलकमल बोट आज गेटवेच्या समुद्रात बोट बुडाल्याची घटना घडली. नौदल, जेएनपीटी, तटरक्षक दल, येलोगेट पोलीस आदींच्या बचाव पथकाने १०१ जणांना वाचवले. रात्री उशिरा मिळालेल्या माहितीनुसार आतापर्यंत १३ जणांचा मृत्यू झाला आहेत. मृतांमध्ये एक नौदलाच्या एक कर्मचाऱ्याचा समावेश आहे. रात्री उशिरा पर्यंत मृतांचा आकडा वाढण्याची भीती वर्तवली जात आहे. 
गेटवे ते एलिफंटा अशी खासगी प्रवासी बोट सेवा सुरु आहे. महाराष्ट्र सागरी मंडळ (मेरी टाइम बोर्ड) याच्या परवानगीने ही सेवा सुरु असते. सध्या बहुतांश पर्यटक हे मुंबईत दाखल झाले आहेत. आज दुपारी निलकमल ही खासगी बोट गेटवे ऑफ इंडिया येथून एलिफंटाच्या दिशेने निघाली. दुपारी साडेतीन ते पावणे चारच्या सुमारास बोट अरबी समुद्रात होती. बोटीत एकूण शंभरहून अधिक पर्यटक होते. काही पर्यटक हे बोटीच्या वरच्या टपावर बसले होते. तर काही पर्यटक खाली बसले होते. पर्यटक समुद्रात नांगरलेल्या बोटींचे व्हिडिओ आपल्या मोबाईल मध्ये कैद करत होते. समुद्रात बोट असताना नौदलाच्या स्पीड बोटने निलकमल बोटीला धडक दिली. त्या धडकेने निलकमल ही बोट बुडू लागली. या घटनेनंतर बोट अपघाताचा विडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला. या घटनेची माहिती समजताच नौदल, जेएनपीटी, तटरक्षक दल, येलोगेट पोलीस, स्थानिक मच्छिमार हे घटनास्थळी गेले. नौदलाचे आणि तटरक्षक दलाच्या हेलीकॉप्टरच्या माध्यमातून बेपत्ताचा शोध सुरु होता.
लाईफ जॅकेटकडे दुर्लक्ष 
महाराष्ट्र सागरी महामंडळाच्या (एम एम बी, महाराष्ट्र मेरी टाइम बोर्ड  ) परवानगीने खासगी प्रवासी बोट सेवा सुरु आहे. मंडळाच्या माध्यमातून बोटीतून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना लाईफ जॅकेट देणे सक्तीचे आहे. मात्र प्रवासी हे त्या लाईफ जॅकेटची मागणी करत नाही. तर बोट चालक मालक हे देखील प्रवाशांना लाईफ जॅकेट देण्यास टाळाटाळ करतात. गेटवे ते एलिफंटा हे अंतर कमी असल्याने बोटीतील कर्मचारी हे लाईफ देत नाहीत.
नौदल म्हणते नियंत्रण सुटल्याने अपघात 
आज सायंकाळी नौदलाच्या स्पीड बोटच्या इंजिन ची चाचणी सुरु होती. चाचणी सुरु असतानाच नियंत्रण सुटल्याने स्पीड बोट त्या बोटीला धडकली. तटरक्षक दल, सागरी पोलिसांच्या समनव्याने बचाव कार्य सुरु होते. नौदलाचे चार हेलिकॉप्टर, ११ नौदल क्राफ्ट, एक नौदलाची नौका, तीन सागरी पोलिसांची नौका बचाव कार्यात होती. या दुर्घटनेत १ नौदल कर्मचारी आणि नौदलाच्या क्राफ्ट मधील २ ओइएमचा मृत्यू झाला.
बचाव कार्य सुरु जखमींवर उपचार सुरु 
जे. एन. पी टी रुग्णालयात ५६ जण दाखल केले, त्या पैकी ५२ जनाची प्रकृती स्थिर असून ३ जनाची प्रकृती चिंताजनक आहे. तर एकाचा मृत्यू झाल्याची नोंद आहे.
नौदलाच्या डॉकयार्ड रुग्णालयात २१ जण दाखल असून २१ जनाची प्रकृती स्थिर
सेंट जॉर्ज रुग्णालयात ९ जखमींवर उपचार सुरु
कारंजे येथील रुग्णालयात १२ जनावर उपचार सुरु त्याची प्रकृती स्थिर
तर मोरा येथील एन डी. के. रुग्णालयात १० जण उपचार घेत असलेल्या दहा जणांचा मृत्यू झाल्याची नोंद आहे.
एकूण १०९ जखमी असून त्या पैकी ९४ जनाची प्रकृती स्थिर आहे. तर ४ जनाची प्रकृती चिंताजनक असून १२ जणांचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page