दोन कोटीच्या एमडी ड्रग्जसहीत तिघांना अटक

घाटकोपर-अंधेरी परिसरात ड्रग्ज विक्री करत होते

0

मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
19 जून 2025
मुंबई, – सुमारे दोन कोटीच्या एमडी ड्रग्जसहीत तिघांना घाटकोपर युनिटच्या अ‍ॅण्टी नारकोटीक्स सेलच्या अधिकार्‍यांनी अटक केली. या तिघांकडून पोलिसांनी सव्वाकिलो वजनाचा एमडी ड्रग्जचा साठा जप्त केला आहे. एमडी ड्रग्ज विक्री करणारी ही एक सराईत टोळी असून ही टोळी प्रामुख्याने अंधेरी आणि घाटकोपर परिसरात एमडी ड्रग्जची विक्री करत असल्याचे तपासात उघडकीस आले आहे. त्यांच्याविरुद्ध एनडीपीएस कलमांतर्गत कारवाई करण्यात आली आहे.

31 मेला घाटकोपर परिसरात काहीजण एमडी ड्रग्ज विक्रीसाठी येणार असल्याची माहिती घाटकोपर युनिटला मिळाली होती. या माहितीची शहानिशा करण्यासाठी प्रभारी पोलीस निरीक्षक अनिल ढोले व त्यांच्या पथकाने घाटकोपर बसस्टॉपजवळ साध्या वेशात पाळत ठेवली होती. यावेळी तिथे आलेल्या एका संशयित तरुणाला पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. त्याच्या अंगझडतीत पोलिसांना 257 ग्रॅम वजनाचे एमडी ड्रग्ज सापडले होते. त्याच्या चौकशीनंतर त्याचा दुसर्‍या एका सहकार्‍याला पोलिसांनी अटक केली होती. त्याच्याकडून पोलिसांनी 156 ग्रॅम वजनाचे एमडी ड्रग्ज सापडले होते.

या दोघांच्या चौकशीत त्यांचा तिसरा सहकारी अंधेरी परिसरात राहत असून तोच त्यांना एमडी ड्रग्ज विक्रीसाठी देत असल्याचे उघडकीस आले होते. त्यांनतर या सहकार्‍याच्या अटकेसाठी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली होती. ही शोधमोहीम सुरु असताना त्यांच्या तिसर्‍या सहकार्‍याला अंधेरी येथून पोलिसांनी पोलिसांनी अटक केली. त्याच्याकडून पोलिसांनी 605 ग्रॅम वजनाचे एमडी ड्रग्ज जप्त केले.

या तिन्ही कारवाईत पोलिसांनी 1 किलो 280 ग्रॅम वजनाचे एमडी जप्त केले असून त्याची आंतरराष्ट्रीय बाजारात किंमत 2 कोटी 3 लाख रुपये इतकी किंमत आहेत. ही टोळी अंधेरी आणि घाटकोपर परिसरात एमडी ड्रग्ज विक्री करत असल्याचे तपासात उघडकीस आहे. या तिघांविरुद्ध एनडीपीएस कलमांतर्गत कारवाई करण्यात आली आहे. दोन आरोपी न्यायालयीन तर तिसरा सहकारी पोलीस कोठडीत असल्याचे पोलिसांनी सांगितले.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page