दोन वेगवेगळ्या घटनेत दोन तरुणांवर प्राणघातक हल्ला

घाटकोपर-धारावीतील घटना; दोन स्वतंत्र गुन्हे दाखल

0

मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
२९ ऑक्टोंबर २०२४
मुंबई, – दोन वेगवेगळ्या घटनेत दोन तरुणांवर त्यांच्याच परिचित आरोपींनी प्राणघातक हल्ला केल्याची घटना घाटकोपर आणि धारावी परिसरात घडली. या हल्ल्यात मोहम्मद लियाकतअली गेहलोत आणि जयेश चंद्रकांत कारेक हे दोघेही गंभीररीत्या जखमी झाले. याप्रकरणी घाटकोपर आणि शाहूनगर पोलिसांनी दोन स्वतंत्र हत्येच्या प्रयत्नाच्या गुन्ह्यांची नोंद करुन एका आरोपीस अटक केली तर पळून गेलेल्या दुसर्‍या आरोपीचा पोलीस शोध घेत आहेत. चहाचे पैसे मागितले तसेच पूर्ववैमस्नातून दोन्ही हल्ले झाल्याचे प्राथमिक तपासात उघडकीस आले आहे.

पहिली घटना घटना सोमवारी दुपारी दोन वाजता धारावीतील कमलानगर, जास्मिन मिल रोडसमोर घडली. याच परिसरात मोहम्मद लियाकतअली हा २६ वर्षांचा तरुण राहत असून त्याचा तिथेच चहा विक्रीचा व्यवसाय आहे. रेहान ऊर्फ रजा इलियास शेख हा हा त्याच्या परिचित असून तो गेल्या तीन वर्षांपासून त्याच्या टपरीवर चहा पिण्यासाठी येत होता. मात्र चहा प्यायल्यानंतर तो त्याला पैसे देत नव्हता. सोमवारी दुपारी दोन वाजता रेहान हा नेहमीप्रमाणे तिथे आला आणि त्याने चहा घेतली होती. यावेळी मोहम्मद लियाकतअलीने त्याच्याकडे चहाचे पैसे मागितले. पैसे मागितले म्हणून रेहानला राग आला आणि त्याने कोयत्याने त्याच्यावर वार करण्याचा प्रयत्न केला. यावेळी त्याने त्याचा वार चुकवून त्याचा हात पुढे केला होता. त्यात त्याच्या हाताला गंभीर दुखापत झाली होती. या हल्ल्यानंतर तो तेथून पळून गेला होता. जखमी झालेल्या मोहम्मद लियाकतअलीला स्थानिक रहिवाशांनी तातडीने जवळच्या सायन रुग्णालयात दाखल केले. तिथे त्याच्यावर प्राथमिक औषधोपचार करण्यात आले होते. हल्ल्यानंतर रेहान हा पळून गेला असून त्याचा शाहूनगर पोलिसाकडून शोध सुरु आहे.

दुसरी घटना शनिवारी रात्री आठ वाजता घाटकोपर येथील जय भवानी जागृर्ती, खंडोबा टेकडीजवळ घडली. विनायक चंद्रकांत कारेक हा सुरक्षारक्षक म्हणून काम करत असून तो त्याच्या कुटुंबियांसोबत घाटकोपर परिसरात राहतो. जयेशचा ऋषिकेश संदीप नाटकर ऊर्फ दादूस भाई हा मित्र असून तोदेखील त्याच परिसरात राहतो. या दोघांमध्ये पूर्वीचा एक वाद झाला होता. या वादातून त्यांच्यात नेहमीच खटके उडत होते. शनिवारी रात्री जयेश आणि दादूसभाई यांच्यात पूर्ववैमस्नातून पुन्हा वाद झाला होता. यावेळी त्याने त्याच्यावर लोखंडी रॉडने प्राणघातक हल्ला केला होता. त्यात त्याच्या डोक्याला तोंडाला, भुवई, डोळ्यावर गंभीर दुखापत झाली आहे. मी माझ्या बदला पूर्ण केला, आता दुसर्‍यांची पाळी आहे असे बोलून दादूस भाई तेथून पळून गेला. हल्ल्यात जखमी झालेल्या जयेशला स्थानिक रहिवाशांनी तातडीने सायन रुग्णालयात दाखल केले. तिथेच त्याच्यावर उपचार सुरु आहे. ही माहिती मिळताच घाटकोपर पोलिसांन घटनास्थळी धाव घेतली होती. याप्रकणी हत्येचा प्रयत्नाचा गुन्हा दाखल होताच पळून गेलेल्या दादूसभाई याला पोलिसांनी अटक केली. याच गुन्ह्यांत तो सध्या पोलीस कोठडीत असून त्याची पोलिसाकडून चौकशी सुरु आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page