अश्लील व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देऊन खंडणीची मागणी

खंडणीसाठी धमकाविणार्‍या अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल

0

मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
18 जून 2025
मुंबई, – भावी पतीसोबत शारीरिक संबंधाचे खाजगी अश्लील व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देऊन एका 21 वर्षांच्या तरुणीकडे खंडणीची मागणी करण्यात आल्याचा ्रकार घाटकोपर परिसरात उघडकीस आला आहे. याप्रकरणी खंडणीसाठी धमकाविणार्‍या अज्ञात व्यक्तीविरुद्ध पंतनगर पोलिसांनी खंडणीसाठी धमकी देणे तसेच आयटीच्या विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. मोबाईल क्रमांकावरुन आरोपीचा पोलिसांकडून शोध सुरु असल्याचे पोलिसांनी सांगितले.

21 वर्षांची तक्रारदार तरुणी ही घाटकोपर परिसरात राहत असून एका खाजगी कंपनीत कामाला आहे. तिचे एका तरुणासोबत लग्न ठरले होते. त्यामुळे ती तिच्या भावी पतीच्या नियमित संपर्कात होती, ते दोघेही वेगवेगळ्या ठिकाणी भेटत होते. याच दरम्यान त्यांच्यात शारीरिक संबंध आले होते. या शारीरिक संबंधाचे एक व्हिडीओ अज्ञात व्यक्तीने तिच्या दोन मित्रांना पाठविले होते. तिचे अश्लील व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल करण्याची धमकी देऊन या व्यक्तीने तिच्याकडे आठ हजाराची मागणी केली होती.

ही रक्कम दिली नाहीतर तिचा व्हिडीओ व्हायरल करुन तिची बदनामीची धमकी दिली होती. या प्रकाराने तिला प्रचंड मानसिक धक्का बसला होता. त्यामुळे तिने पंतनगर पोलीस ठाण्यात धाव घेऊन तिथे उपस्थित पोलिसांना घडलेला प्रकार सांगितला. तिच्या तक्रारीची पोलिसांनी गंभीर दखल घेत तिच्या तक्रारीवरुन अज्ञात व्यक्तीविरुद्ध खंडणीसाठी धमकी देणे तसेच आयटीच्या विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

या व्यक्तीचा मोबाईल क्रमांक पोलिसांना प्राप्त झाला असून या मोबाईलचे सीडीआर काढण्याचे काम सुरु आहे. या गुन्ह्यांत लवकरच धमकी देणार्‍या आरोपीला अटक केली जाईल असे पोलिसांकडून सांगण्यात आले. आरोपी तिच्यासह तिच्या भावी पतीचा परिचित असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहेत. दुसरीकडे या दोघांच्या शारीरिक संबंधाचे व्हिडीओ आरोपीला कोणी दिले याचाही पोलिसांकडून तपास सुरु आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page