मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
6 ऑक्टोंबर 2025
मुंबई, – पाच वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर तिच्याच परिचित बारा आणि चौदा वर्षांच्या दोन अल्पवयीन मुलांनी लैगिंक चाळे केल्याची धक्कादायक घटना घाटकोपर परिसरात उघडकीस आली आहे. याप्रकरणी विनयभंग, लैगिंक अत्याचारासह पोक्सो कलमांतर्गत गुन्हा दाखल होताच दोन्ही अल्पवयीन मुलांना पंतनगर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या दोघांनाही डोंगरीतील बालसुधारगृहात पाठविण्यात आले आहे. रविवारी घडलेल्या या घटनेने स्थानिक रहिवाशांमध्ये प्रचंड संतापाची लाट उसळली होती.
34 वर्षांची तक्रारदार महिला ही घाटकोपर येथे तिच्या कुटुंबियांसोबत राहते. पिडीत ही तिची पाच वर्षांची मुलगी आहे. रविवारी दुपारी एक वाजता तिच्याच शेजारी राहणार्या तरुणाकडे तिची मुलगी खेळण्यासाठी गेली होती. यावेळी आरोपीने तिच्याशी अश्लील चाळे करुन तिचा विनयभंग करुन नंतर तिच्यावर लैगिंक चाळे केले होते. हा प्रकार मुलीकडून तिच्या आईला समजताच तिने या दोन्ही मुलांना जाब विचारला होता. पिडीत मुलीशी या दोन्ही मुलांनी यापूर्वीही अशाच प्रकारे अश्लील चाळे करुन तिच्याशी लैगिंक चाळे केले होते. या प्रकारानंतर तिने घडलेला प्रकार पंतनगर पोलिसांना सांगितला.
दोन्ही अल्पवयीन मुलांविरुद्ध तक्रार करुन त्यांच्यावर कारवाई करण्याची विनंती केली होती. या तक्रारीची वरिष्ठ पोलीस अधिकार्यांनी गंभीर दखल घेत पोलिसांना तपासाचे आदेश दिले होते. या आदेशानंतर या महिलेच्या तक्रारीवरुन पोलिसांनी बारा आणि चौदा वर्षांच्या दोन्ही अल्पवयीन मुलांविरुद्ध विनयभंगासह लैगिंक अत्याचार तसेच पोक्सोच्या विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल केला होता. गुन्हा दाखल होताच या दोन्ही मुलांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले होते. ते दोघेही अल्पवयीन असल्याने त्यांना नंतर पुढील कारवाईसाठी डोंगरीतील बालसुधारगृहात पाठविण्यात आले होते.