मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
२ जानेवारी २०२५
मुंबई, – चार वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर तिच्याच शेजारी राहणार्या एका २८ वर्षांच्या तरुणाने लैगिंक अत्याचार केल्याची घटना घाटकोपर परिसरात उघडकीस आली आहे. याप्रकरणी लैगिंक अत्याचारासह पोक्सो कलमांतर्गत गुन्हा दाखल होताच आरोपी तरुणाला घाटकोपर पोलिसांनी अटक केली आहे. याच गुन्ह्यांत त्याला विशेष पोक्सो कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे. थर्स्टी फर्स्टच्या सायंकाळी उघडकीस आलेल्या या घटनेने स्थानिक रहिवाशांमध्ये प्रचंड संतापाची लाट उसळली होती.
३५ वर्षांची तक्रारदार महिला ही घाटकोपर परिसरात राहत असून तिचा स्वतचा व्यवसाय आहे. चार वर्षांची पिडीत तिची मुलगी आहे तर आरोपी याच परिसरात राहतो. त्यामुळे ते दोघेही एकमेकांच्या परिचित आहेत. ३१ डिसेंबरला सायकाळी साडेसात वाजता तिची मुलगी घरात होती. यावेळी तिथे आरोपी आला आणि त्याने तिच्याशी खेळण्याचा बहाणा करुन जवळीक निर्माण करण्याचा प्रयत्न केला. काही वेळानंतर त्याने तिच्यावर लैगिंक चाळे करुन तिच्यावर अत्याचार केला होता. हा प्रकार मुलीकडून तिच्या तक्रारदार आईला समजताच तिने घाटकोपर पोलीस ठाण्यात आरोपीविरुद्ध तक्रार केली होती. या तक्रारीची घाटकोपर पोलिसांनी गंभीर दखल घेत तिच्या तक्रार अर्जावरुन आरोपीविरुद्ध लैगिंक अत्याचारासह पोक्सो कलमांतर्गत गुन्हा दाखल केला होता. गुन्हा दाखल होताच आरोपीला बुधवारी सकाळी पोलिसांनी अटक केली. अटकेनंतर त्याला पोक्सो कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे.