कस्टमच्या ऑक्शनमधील सोने देण्याची बतावणी करुन फसवणुक
एक कोटीच्या फसवणुकीप्रकरणी पाचजणांविरुद्ध गुन्हा दाखल
मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
1 एप्रिल 2025
मुंबई, – कस्टम विभागाच्या ऑक्शनमधील सोने मार्केट रेटपेक्षा कमी किंमत मिळवून देण्याची बतावणी करुन एका व्यावसायिकाची पाचजणांच्या टोळीने सुमारे एक कोटीची फसवणुक केल्याची घटना सांताक्रुज परिसरात उघडकीस आली आहे. याप्रकरणी पाचही आरोपीविरुद्ध वाकोला पोलिसांनी अपहारासह फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. इलियास अजमेरी खान, अजमेरी सिराज खान, अनिस अब्दुल रज्जाक दावडा, गणेश देवेंद्र सिंग ऊर्फ रोहित आणि सुंदर सिंग अशी या पाचजणांची नावे आहेत. पाचही आरोपी पळून गेल्याने त्यांच्या अटकेसाठी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे.
इम्तियाज अहमद जमालुद्दीन शेख हे कुर्ला येथे राहत असून त्यांचा चिकन सप्लायचा व्यवसाय आहे. कुर्ला परिसरात त्यांच्या मालकीचे अल मोमीन चिकण सेंटर नावाचे एक शॉप आहे. सप्टेंबर 2023 त्यांची एका मित्रामार्फत अनिस आणि गणेश यांच्याशी ओळख झाली होती. त्यांनी त्यांचा कस्टम विभागातील ऑक्शनमधील सोने खरेदीचा व्यवसाय असल्याचे सांगितले. त्यांना मार्केट रेटपेक्षा कमी दरात सोने मिळत असल्याचे सांगून त्यांचा सहकारी इलियास हा त्यांचा बॉस आहे. तो अनेकांना कमी किंमतीत कस्टमने कारवाईत जप्त केलेले सोन्याचे बिस्कीट देत अस्याचे सांगितले. मुंबईसह महाराष्ट्र तसेच भारतातील अनेक व्यापारी त्याच्याकडून सोन्याचे बिस्कीट खरेदी करत असल्याचे सांगितले. त्यामुळे त्यांनी सोन्यांमध्ये गुंतवणुक केल्यास त्यांना भविष्यात चांगला फायदा होईल असे सांगून त्यांचा विश्वास संपादन करण्याचा प्रयत्न केला होता. त्यांच्याकडे दोन ते तीन कोटी रुपये असून एअरपोर्टवर एक पार्सल आहे. पैसे देऊन ते पार्सल सोडवून त्याला ऑक्शनमध्ये स्वस्तात सोन्याचे बिस्कीट खरेदी करायचे आहे असे सांगितले. त्यामुळे त्यांनी त्याला आर्थिक मदत करण्याची विनंती केली होती.
याच दरम्यान त्यांची इतर तीन आरोपींशी ओळख झाली होती. यावेळी त्यांनी त्यांना पाच ते सहा किलो सोन्याचे पार्सल आल्याचे सांगून जास्तीत जास्त पैसे जमा करुन ते पार्सल आपण सोडविण्याबाबत चर्चा करत होते. या पाचही आरोपींना त्यांना एक कोटीची मदत करण्यास सांगितले होते. त्यामोबदल्यात त्यांना स्वस्तात सोन्याचे बिस्कीट देण्याचे आश्वासन दिले होते. तयामुळे त्यांनी त्यांच्या चुलत भावासह ग्राहक आणि एका व्यावसायिक मित्राकडून 45 लाख आणि स्वतकडील 55 लाख असे एक कोटी रुपये पाचही आरोपींना दिले होते. मात्र दिलेल्या मुदतीत त्यांनी त्यांना सोन्याचे बिस्कीट किंवा सोन्यासाठी घेतलेले एक कोटी रुपये परत ेले नाही. वारंवार विचारणा करुनही ते सर्वजण त्यांना टाळण्याचा प्रयत्न करत होते. त्यांना विविध कारण सांगून पेमेंट मिळण्यास उशीर असल्याची बतावणी करत होते.
या पाचजणांकडून फसवणुक होत असल्याचे लक्षात येताच त्यांनी वाकोला पोलिसांना घडलेला प्रकार सांगून तक्रार केली होती. या तक्रारीची शहानिशा केलयानंतर इलियास खान, अजमेरी खान, अनिस दावडा, गणेश सिंग आणि सुंदर सिंग या पाचजणांविरुद्ध अपहारासह फसवणुकीचा गुन्हा दाखल केला होता. या घटनेनंतर ते सर्वजण पळून गेले असून त्यांचा पोलीस शोध घेत आहेत. या आरोपींनी अशाच प्रकारे इतर काही गुन्हे केले आहेत का याचा पोलीस तपास करत आहेत.