3.31 कोटीच्या शुद्ध सोन्यासह दागिन्यांचा अपहारासह फसवणुक
ज्वेलर्स व्यापार्याच्या तक्रारीवरुन दोन स्वतंत्र गुन्ह्यांची नोंद
मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
26 जुलै 2025
मुंबई, – सोन्याच्या दागिने बनविण्यासाठी दिलेल्या शुद्ध सोन्यासह सोन्याच्या दागिन्यांचा अपहार करुन दोन ज्वेलर्स व्यापार्यांची फसवणुक झाल्याचा प्रकार काळबादेवी आणि धनजी स्ट्रिट परिसरात उघडकीस आली आहे. याप्रकरणी एका व्यापार्यासह कारागिरासह एल. टी मार्ग पोलिसांनी दोन स्वतंत्र अपहारासह फसवणुकीच्या गुन्ह्यांची नोंद केली आहे. गोविंद ओमप्रकाश सोनी आणि लॅच्यू जेम्स अशी या दोघांची नावे आहेत. गुन्हा दाखल होण्यापूर्वीच ते दोघेही पळून गेल्याने त्यांचा पोलिसांकडून शोध सुरु आहे.
महेंद्रकुमार बाबूलाल जैन हे ज्वेलर्स व्यापारी असून ते सध्या सायन परिसरात राहतात. त्यांचा काळबादेवी येथे एक ज्वेलर्स शॉप आहे. गोविंद हा त्यांचा परिचित कारागिर असून ते नेहमीच त्याच्याकडून सोन्याचे दागिने बनवून घेत होते. एप्रिल महिन्यांत त्यांनी गोविंदला सुमारे अडीच कोटीचे 2720 ग्रॅम वजनाचे शुद्ध सोने दागिने बनविण्यासाठी दिले होते. मात्र तीन महिने उलटूनही त्याने त्यांना सोन्याचे दागिने बनवून दिले होते. दागिने बनविण्यासाठी दिलेले शुद्ध सोने घेऊन पळून गेला होता.
हा प्रकार लक्षात येताच त्यांनी गोविंदला संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, मात्र त्याचा मोबाईल बंद येत होता. तो पळून गेल्याची खात्री होताच त्यांनी गोविंद सोनीविरुद्ध एल. टी मार्ग पोलिसांत तक्रार केली होती. या तक्रारीनंतर त्याच्याविरुद्ध पोलिसांनी शुद्ध सोन्याचा अपहार करुन महेंद्रकुमार जैन यांची फसवणुक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. त्याचा पोलिसांकडून शोध सुरु आहे.
दुसर्या गुन्ह्यांतील तक्रारदार चेतन मोतीलाल जैन हे लालबाग परिसरात राहतात. तंचा धनजी स्ट्रिट परिसरात सोन्याचे दागिने विक्रीचा व्यवसाय आहे. तिथे त्यांच्या मालकीचे एक दुकान आहे. लॅच्यू जेम्स हा त्यांचा परिचित व्यापारी असून तो मूळचा केरळख्या थिरुनाकाकरा मैदानम कोथ्टयमचा रहिवाशी आहे. त्यांच्यात अनेकदा सोन्याच्या दागिन्यांचा खरेदी-विक्रीचा व्यवहार झाला आहे. गेल्या वर्षी जेम्सने चेतन जैन यांच्याकडे काही दागिन्यांची ऑर्डर दिली होती. यावेळी त्याने त्यांना 1 कोटी 36 लाख 60 हजार रुपयांचे पेमेंट केले होते. या पेमेंटनंतर त्यांनी त्याला 2 कोटी 67 लाख रुपयांचे 3662 ग्रॅम वजनाचे विविध सोन्याचे दागिने पाठविले होते. या दागिन्यानंतर त्याने त्यांना आतापर्यंत 1 कोटी 86 लाख 60 हजार रुपये दिले होते.
मात्र उर्वरित 84 लाख 50 हजार रुपयांचे पेमेंट न करता त्यांची फसवणुक केली होती. गेल्या अठरा महिन्यांपासून ते लॅच्यू जेम्सकडून पेमेंटसाठी पाठपुरावा करत होते, मात्र त्याच्याकडून पेमेंट आले नाही. फसवणुकीचा हा प्रकार निदर्शनास त्यांनी एल. टी मार्ग पोलिनसांत तक्रार केली होती. या दोन्ही तक्रारीनंतर एल. टी मार्ग पोलिसांनी दोन स्वतंत्र अपहारासह फसवणुकीच्या गुन्ह्यांची नोंद केली आहे. गुन्हा दाखल होण्यापूर्वी दोन्ही आरोपी पळून गेले आहे. त्यामुळे त्यांच्या अटकेसाठी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे.