सतरा वर्षांच्या अल्पवयीन कॉलेज तरुणीची आत्महत्या
इमारतीच्या 45 व्या मजल्यावरुन उडी घेऊन जीवन संपविले
मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
28 मे 2025
मुंबई, – सतरा वर्षांच्या अल्पवयीन कॉलेज तरुणीने बुधवारी आत्महत्या केल्याची घटना गोरेगाव परिसरात उघडकीस आली आहे. इमारतीच्या 45 व्या मजल्यावरुन उडी घेऊन तिने स्वतचे जीवन संपविले. ही तरुणी गेल्या काही वर्षांपासून मानसिक तणावात होती, तिच्यावर उपचार सुरु होते, तिने यापूर्वीही आत्महत्येचा प्रयत्न केल्याचे तपासात उघडकीस आले आहे. याप्रकरणी तिच्या वडिलांची पोलिसांनी जबानी नोंदवून घेतली असून त्यांनी कोणावरही संशय व्यक्त केला नाही. या जबानीनंतर आरे पोलिसांनी एडीआरची नोंद केली आहे.
17 वर्षांची ही मुलगी गोरेगाव येथील एका उच्चभू्र इमारतीमध्ये तिच्या पालकांसोबत राहत होती. वांद्रे येथील बीकेसी परिसरात असलेल्या एका नामांकित कॉलेजमध्ये अकरावीत शिकत होती. गेल्या अकरा वर्षांपासून तिला मानसिक आजार होता. त्यामुळे तिच्यावर उपचार सुरु होते. मात्र या उपचारातून तिला काही फरक जाणवत नव्हता. अनेकदा डॉक्टरांशी बोलताना ती सगळ्यांना मरायचे आहे, मग जगायचे कशाला असे सांगत होती. बुधवारी तिने तिच्या निवासी इमारतीच्या 45 व्या मजल्यावरुन उडी घेतली होती. यात तिचा जागीच मृत्यू झाला होता.
ही माहिती स्थानिक रहिवाशांकडून मिळताच आरे पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती. तिचा मृतदेह नंतर शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला होता. तिच्याकडे पोलिसांना एक सुसायट नोट सापडली आहे. त्यात तिने ती स्वत जग सोडते आहे, कुणाला दोष देऊ नका असे नमूद केले आहे. या घटनेनंतर तिच्या वडिलांची पोलिसांनी जबानी नोंदवून घेतली होती.
त्यात त्यांनी तिने यापूर्वीही आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याचे सांगितले आहे. तिला मानसिक आजार होता, त्यामुळे तिचे मेडिकेशन सुरु होते असेही जबानीत म्हटले आहे. तिच्या आत्महत्येबाबत त्यांनी कोणावरही संशय व्यक्त केला नाही किंवा कोणाविरुद्ध तक्रार केली नाही. या जबानीनंतर आरे पोलिसांनी एडीआरची नोंद केली आहे. या तरुणीच्या आत्महत्येने स्थानिक रहिवाशांमध्ये प्रचंड शोककळा पसरली होती.
विक्रोळी येथे तरुणीची आत्महत्या
यापूर्वी विक्रोळी येथे हर्षला प्रकाश चंदुरकर या 23 वर्षांच्या तरुणीने एका निवासी इमारतीच्या 23 वर्षांच्या मजल्यावरुन उडी घेत आत्महत्या केली होती. ही घटना सोमवारी सायंकाळी पावणेआठ वाजता विक्रोळीतील कन्नमवारनगर, इमारत क्रमांक 97 च्या इमारतीमध्ये घडली. हर्षला ही याच इमारतीच्या रुम क्रमांक 2023 मध्ये रहत होती. तिचे मानसिक संतुलन ठिक नव्हते. तिला सिझोफेर्निया हा आजार होता. त्यासाठी तिच्यावर केईएमसह ग्लोबन हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु होते.
मात्र या उपचारातून तिला काही फरक जाणवत नव्हता. त्यामुळे या आजाराला ती कंटाळून गेली होती. त्यातून आलेल्या नैराश्यातून तिने सोमवारी सायंकाळी पावणेआठ वाजता तिच्या इमारतीच्या 23 व्या मजल्यावरुन उडी घेत स्वतचे जीवन संपविले. याप्रकरणी तिच्या वडिलांसह भावाची जबानी नोंदविण्यात आली असून या जबानीत त्यांनी कोणावर संशय व्यक्त केला नाही किंवा तक्रार केली नव्हती. याप्रकरणी विक्रोळी पोलिसांनी एडीआरची नोंद केली असून पोलीस उपनिरीक्षक रुपेश पवार हे पुढील तपास करत आहेत.