पतीच्या अनैतिक संबंधाला कंटाळून महिलेची आत्महत्या
पोलीस पतीविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल
मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
28 ऑगस्ट 2025
मुंबई, – गेल्या दोन वर्षांपासून पतीचे एका तरुणीसोबत सुरु असलेल्या अनैतिक संबंधामुळे मानसिक नैराश्यात असलेल्या एका 28 वर्षांच्या महिलेने आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना गोरेगाव परिसरात उघडकीस आला आहे. सारिका अमोल राऊत असे या महिलेचे नाव असून तिच्या आत्महत्येप्रकरणी तिचा पोलीस पती अमोल भाऊलाल राऊत (34) याच्याविरुद्ध वनराई पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. गुन्हा दाखल होताच अमोल हा पळून गेला असून त्याच्या अटकेसाठी दोन टिम मुंबईबाहेर पाठविण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.
अमोल हा राज्य राखीव पोलीस दलात पोलीस नाईक असल्याचे पोलिसांनी सांगितले. ही घटना बुधवार 20 ऑगस्टला सकाळी गोरेगाव येथील एसआरपीएफ कॅम्प, गु्रप आठमध्ये घडली. समीर पांडुरंग सोनावणे हा 25 वर्षांचा तरुण मूळचा नाशिकच्या देवळा, दहिवडचा रहिवाशी असून तो शेती करतो. त्याला दोन बहिणी असून त्यापैकी सारिकाचे अमोलसोबत लग्न झाले असून ती सध्या गोरेगाव येथे तर दुसरी बहिण पूजा ही तिच नाशिकच्या मालेगाव येथील सासरी राहते. अमोल हा राज्य राखीव पोलीस दलात पोलीस र्नाक असून तो नाशिकच्या नांदगाव, वडाळीचा रहिवाशी आहे.
2017 साली सारिका आणि अमोल यांचे दोन्ही कुटुंबियांच्या संमतीने लग्न झाले होते. लग्नानंतर ती त्याच्यासोबत गोरेगाव येथील एसआरपीएफ कॅम्प, इमारत क्रमांक 29, फ्लॅट क्रमांक चारमध्ये राहत होती. 2017 ते 2024 या कालापर्यंत या दोघांचा संसार सुरळीत सुरु होता. मात्र ऑगस्ट 2024 पासून अमोलच्या आयुष्यात एक तरुणी आली होती. तिच्यासोबत त्याचे मैत्रीपूर्ण संबंध होते. ते दोघेही एकमेकांच्या संपर्कात होते, अनेका ती त्याच्या घरी येत होती. याच दरम्यान सारिकाला अमोलचे त्या तरुणीसोबत अफेसर असल्याचे समजले होते. ही बाब तिने तिचा भाऊ समीर सोनावणेला सांगितली होती. त्यामुळे त्याने अमोलकडे विचारणा केली असता त्याने त्यालाच पुरावे दाखव, तिची बहिण त्याच्यावर संशय घेत असल्याचा आरोप केला होता.
अनैतिक संबंधावरुन विचारणा केल्यानंतर अमोल हा मद्यप्राशन करुन तिला शिवीगाळ करुन मारहाण करत होता. गेल्या काही दिवसांपासून तो तिचा सतत मानसिक व शारीरिक शोषण करत होता. जुलै 2025 रोजी समीरला अमोलच्या व्हॉटअप स्टेटवर या मुलीसोबत एक फोटो दिसला होता. अमोलने त्याच्या मोबाईलमध्ये तिचे नाव हर्शी म्हणून सेव्ह केले होते. याच दरम्यान सारिकाने तिच्या घरी अमोलचे हर्शीसोबत प्रेमसंबंध असल्याचे, तो मद्यप्राशन करुन तिला शिवीगाळ करुन मारहाण करत असल्याचे सांगून ती मानसिक नैराश्यात असल्याचे सांगितले होते.
20 ऑगस्टला अमोल हा कामानिमित्त पुणे येथे होता. यावेळी घरात सारिका ही एकटीच होती. यावेळी तिने मानसिक नैराश्यातून घरात गळफास घेऊन आत्महत्या केली होती. ही माहिती समीरला समजताच ते सर्वजण मुंबईत आले होते. यावेळी त्यांना सारिकाला जोगेश्वरीतील ट्रॉमा केअर हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले असून तिथे तिला डॉक्टरांनी मृत घोषित केल्याचे सांगितले.
पतीच्या अनैतिक प्रेमसंबंधाला कंटाळून, दारुच्या नशेत होणार्या मानसिक व शारीरिक शोषणामुळे सारिका ही मानसिक तणावात होती. त्यातून आलेल्या नैराश्यातून तिने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा आरोप समीर सोनावणे याने करुन अमोल राऊतविरुद्ध तिच्या बहिणीला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याप्रकरणी तक्रार केली होती. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर अमोल राऊतविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. गुन्हा दाखल होताच अमोल पळून गेल्याने त्याच्या अटकेसाठी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे. या गुन्ह्यांत त्याला लवकरच अटक केली जाईल असे पोलिसांकडून सांगण्यात आले.