व्यावसायिकाची बदनामी केल्याप्रकरणी मैत्रिणीला अटक
तरुणीसोबत अश्लील व्हिडीओ व्हायरल करुन बदनामी केल्याचा आरोप
मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
८ एप्रिल २०२४
मुंबई, – गोरेगाव परिसरातील एका सिक्युरिटी एजन्सी असलेल्या व्यावसायिकाची बदनामी करुन खंडणीसाठी धमकी दिल्याप्रकरणी गुलप्सा खातून ऊर्फ मुस्कान खान या मैत्रिणीला गोरेगाव पोलिसांनी अटक केली. तक्रारदाराचे एका तरुणीसोबत अश्लील व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल करुन तिने त्यांची बदनामी केल्याचा आरोप आहे. याच गुन्ह्यांत मुस्कान ही सध्या पोलीस कोठडीत असून तिची पोलिसांकडून चौकशी सुरु आहे.
५४ वर्षांचे तक्रारदार गोरेगाव येथे राहत असून त्यांची स्वतची सिक्युरिटी एजन्सी आहे. गोरेगाव येथील लिंक रोड, हारमोनी मॉलमध्ये त्यांचे एक कार्यालय आहे. तीन वर्षांपूर्वी ते फॉरस रोडवरील बच्चू की वाडीतील एका कोठ्यावर गेले होते. तिथेच त्यांची मुस्कानशी ओळख झालीी होती. यावेळी या दोघांनी एकमेकांचे मोबाईल क्रमांक शेअर केले होते. त्यानंतर ते दोघेही मोबाईलवरुन एकमेकांच्या संपर्कात होते. त्यातून त्यांची चांगली मैत्री झाली होती. अनेकदा ते एकमेकांना भेटत होते. या भेटीदरम्यान मुस्कानने त्यांना तिची आर्थिक परिस्थिती ठिक नसल्याचे तिला पैशांची मदत करण्याची विनंती केली होती. त्यामुळे त्यांनी तिला अनेकदा आर्थिक मदत केली होती. काही दिवसांनी तिची मागणी जास्त वाढत केली. डिसेंबर २०२२ रोजी त्यांनी एका निवासी इमारतीमध्ये भाड्याने रुम घेतला होता. तिथेच ते मुस्कानसोबत जवळपास एक वर्षभर राहत होते. या दरम्यान त्यांनी तिला सुमारे सव्वाचार लाखांचे दागिने, कपडे, पैसे, मोबाईलसह इतर महागडया वस्तू दिल्या होत्या. एक वर्षांनंतर ती दुसरीकडे राहण्यासाठी गेली होती. १ मार्च २०२४ रोजी त्यांच्या घरी तिने पायल नावाच्या एका महिलेस पाठविले होते. तिने त्यांना खुश करण्यासाठी तिचे संपूर्ण कपडे काढून त्यांच्यासमोर डान्स केला होता. यावेळी तिने त्यांनाही कपडे काढण्यास प्रवृत्त केले होते. त्याचा त्यांनी मोबाईलवर एक व्हिडीओ बनविला होता. हा व्हिडीओ नंतर मुस्कानला मिळाला होता. हाच व्हिडीओ दाखवून मुस्कान त्यांना ब्लॅकमेल करुन पैशांची मागणी करत होती. मात्र त्यांनी तिला पैसे देण्यास नकार दिला होता.
३ मार्च २०२४ रोजी एका अज्ञात व्यक्तीने त्यांच्या नावाने सोशल मिडीयावर एक बोगस अकाऊंट ओपन करुन त्यांच्यासह पायलचे अश्लील व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल करुन त्यांची बदनामी करण्याचा प्रयत्न केला होता. हा व्हिडीओ तक्रारदाराच्या बहिणीसह तिचे मुले, काही मित्रांनी पाहिला होता. त्यामुळे त्यांनी तो व्हिडीओ काढण्याची विनंती केली होती. काही वेळानंतर संबंधित व्यक्तीने त्यांचा व्हिडीओ काढून टाकला होता. हा व्हिडीओ मुस्कानने अपलोड करुन तो व्हिडीओ तिच्या बहिणीसह तिच्या मुलांना तसेच त्यांच्या मित्रांना व्हॉटपवर पाठवून त्यांची बदनामी केली होती. त्यामुळे त्यांनी मुस्कानला जाब विचारला होता. यावेळी तिने त्यांच्याकडे दहा लाखांची मागणी केली होती. दहा लाख रुपये देणे शक्य नसेल तर आठ तोळे सोन्याचे दागिने द्यावे लागतील असे सांगितले. त्याने पैसे किंवाा दागिने दिले नाही त्याचे अश्लील व्हिडीओ पुन्हा सोशल मिडीयासह त्यांच्या कुटुंबिय, नातेवाईक तसेच मित्रांना पाठविण्याची धमकी दिली होती.
या धमकीनंतर तिने त्यांच्या इतर चार ते पाच मित्रांना त्यांचा अश्लील व्हिडीओ पाठवून त्यांना एक प्रकारे इशारा दिला होता. या प्रकारामुळे त्यांना प्रचंड मानसिक धक्का बसला होता. त्यामुळे त्यांनी गोरेगाव पोलीस ठाण्यात धाव घेऊन तिथे घडलेला प्रकार सांगून मुस्कानसह अज्ञात व्यक्तीविरुद्ध तक्रार केली होती. या तक्रारीनंतर मुस्कानसह दोघांविरुद्ध पोलिसांनी खंडणीसाठी ब्लॅकमेल करणे, अश्लील व्हिडीओ सोशल मिडीयावर अपलोड करुन बदनामी केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला होता. गुन्हा दाखल होताच मुस्कान खानला पोलिसांनी अटक केली. अटकेनंतर तिला बोरिवलीतील लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने तिला पोलीस कोठडी सुनावली आहे. तिच्याकडून पोलिसांनी तिचा मोबाईल जप्त केला आहे. या मोबाईलमध्ये तक्रारदाराचा अश्लील व्हिडीओ असून तो व्हिडीओ तिने त्यांच्या मित्रांना व्हॉटअपवर पाठविल्याचे उघडकीस आले आहे.