गोविंदाच्या जबानीनंतर घातपात की अपघाताचा खुलासा होणार
मिसफायरनंतर अनेक तर्क-विर्तकाच्या चर्चेने पोलीसही संभ्रमात
मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
२ ऑक्टोंबर २०२४
मुंबई, – जुहू येथील राहत्या घरी रिव्हॉल्व्हरमधून मिसफायर होऊन सिनेअभिनेता गोविंदा जखमी झाला असला तरी त्याच्या प्राथमिक जबानीतून मुंबई पोलिसांचे समाधान झालेले नाही. त्यात मिसफायनंतर अनेक तर्क-वितर्काच्या चर्चेने मुंबई पोलीसही संभ्रमात आहे. त्यामुळे गोविंदाची पुन्हा एकदा जुहू पोलिसासह गुन्हे शाखेकडून चौकशी होणार आहे. या चौकशीनंतर यामागे घातपात की अपघात आहे याचा अधिकृत खुलासा होणार आहे. दरम्यान वरिष्ठांच्या आदेशामुळे याबाबत जुहू पोलिसांसह गुन्हे शाखेच्या अधिकार्यांनी काहीही माहिती देण्यास नकार दिला.
विरारसह जुहू परिसरात सिनेअभिनेता गोविंदाचा एक फ्लॅट आहे. अनेकदा तो मुंबईतील फ्लॅटमध्ये राहतो. मंगळवारी तो कोलकाता येथे जाणार होता. मात्र कोलकाता येथे जाण्यापूर्वी रिव्हॉल्व्हर हाताळताना त्यातून एक गोळी मिसफायर झाली होती. ही गोळी गोविंदाच्या पायाला लागली. त्यात त्याला गंभीर दुखापत झाली होती. त्यामुळे त्याला अंधेरीतील क्रिटीकेअर हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. तिथे त्याच्यावर उपचार सुरु असून त्याच्या पायावर शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. गोविंदावर तीन ते चार दिवस उपचार होणार असून नंतर त्याला डिस्चार्ज दिले जाणार आहे. या घटनेनंतर जुहू पोलिसांसह गुन्हे शाखेच्या अधिकार्यांनी गोविंदाची प्राथमिक चौकशी केली होती. मात्र या चौकशीतून गोविंदाकडून मिळालेल्या उत्तराने पोलिसांचे समाधान झाले नाही. त्यात या मिसफायरनंतर विविध तर्क-विर्तक लढविले जात आहे. या संपूर्ण घटनेची वरिष्ठांकडून गंभीर दखल घेण्यात आली होती. त्यामुळे गोविंदाची पुन्हा पोलिसांकडून जबानी नोंदविण्यात येणार आहे. जबाबानंतर ही घटना नेमकी कशी घडली याचा उलघडा होणार आहे. गोविंदासह त्याची पत्नी, मुलगी आणि तिथे कर्तव्यावर असलेल्या पोलीस कर्मचार्याचीही पोलिसांकडून जबानी नोंदविण्यात येणार आहे. या जबानीनतर या घटनेमागे घातपात की अपघात आहे याचा उलघडा होईल. रिव्हॉल्व्हरचा ट्रिगर गोविंदानेच दाबल्याची चर्चा सुरु असल्याने या संपूर्ण प्रकरणाची पोलिसाकडून चौकशी आहे. त्यात तथ्य असल्यास त्यामागील कारणाचा शोध घेतला जात आहे.