डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाच्या सब-कॉन्ट्रॅक्टर कंपनीची फसवणुक
जीएसटीच्या ४० लाखांचा अपहारप्रकरणी कंपनीच्या सीएविरुद्ध गुन्हा दाखल
मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
३ मे २०२४
मुंबई, – दादर येथे उभारण्यात येणार्या भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाच्या कारपेंटरचे काम करणार्या सब कॉन्ट्रॅक्टर असलेल्या खाजगी कंपनीची फसवणुक झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी कंपनीचा चार्टर्ंड अकाऊंटट प्रितम दिपक मिश्रा याच्याविरुद्ध शिवाजी पार्क पोलिसांनी बोगस दस्तावेज बनवून कंपनीची फसवणुक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. प्रितमवर सुमारे ४० लाखांच्या जीएसटी करचा परस्पर अपहार करुन कंपनीची फसवणुक केल्याचा आरोप आहे.
बलीराम ईश्वरधनसिंह मौर्या हे व्यावसायिक असून त्यांच्या मालकीची बलिरामसिंह मौर्या नावाची एक खाजगी कंपनी आहे. ही कंपनी शापूरजी पालनजी कंपनीची सब कॉन्ट्रक्टर कंपनी असून त्यांच्या कंपनीला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाचे कारपेंटरचे काम सोपविण्यात आले होते. या कंपनीचे शापूरजी पालनजी कंपनीच्या कार्यालयातून चालते. कारपेंटरचे काम करण्यासाठी मिळणार्या रक्कमेवर वेळेवर जीएसटी भरण्यासाठी कंपनीने २०१८ ते २०२३ या कालावधीत प्रितम मिश्रा या सीएची नियुक्ती केली होती. मार्च २०२३ पर्यंत बलिराम मौर्या यांनी त्याला जीएसटीची रक्कम जमा करण्यासाठी ५० लाख ४४ हजार २२१ रुपये पाठविले होते. ही रक्कम जमा केल्यानंतर तो जीएसटी जमा केल्याचे त्यांा रिसीट पाठवत होता. काही दिवसांपूर्वी त्यांना जीएसटी अधिकार्यांकडून एक कॉल आला होता. त्यात त्यांच्या कंपनीचा सुमारे ३६ लाखांचा जीएसटी भरणे बाकी असल्याचे नमूद करुन ती रक्कम तातडीने जमा करण्यास सांगण्यात आले होते. त्यांनी जीएसटी रक्कम वेळेआधी भरल्याने त्यांना या कॉलनंतर शंका आली होती. त्यामुळे त्यांनी बँकेचे स्टेटमेंट प्राप्त करुन पाहणी केली होती. त्यात प्रितम मिश्राने २०१८ ते २०२३ या कालावधीत १४ लाख ४७ हजार २९१ रुपयांची जीएसटीची रक्कम जमा केल्याचे दिसून आले. उर्वरित पैशांचा प्रितमने परस्पर अपहार करुन कंपनीची फसवणुक केली होती. त्यांच्या पत्नीची के. एम नितू नावाची कंपनी असून तिने प्रितमला जीएसटीसाठी १० लाख ८२ हजार रुपये दिले होते. त्यापैकी ६ लाख ८२ हजार ८४० रुपयांचा जीएसटी त्याने जमा केला होता. मात्र उर्वरित सुमारे चार लाखांची रक्कम जमा न करता त्या पैशांचा अपहार केला होता.
अशा प्रकारे बलीरामसिंह मौर्या आणि त्यांची पत्नी नितू मौर्या यांनी त्याला जीएसटीसाठी ६१ लाख २६ हजार ९१२ रुपये दिले होते. त्यापैकी २१ लाख ३० हजार ३२४ रुपयांची जीएसटीची रक्कम त्याने जमा केली, मात्र उर्वरित सुमारे ४० लाखांचा परस्पर अपहार करुन कंपनीची फसवणुक केली होती. हा प्रकार लक्षात येताच बलीरामसिंह मौर्या यांनी शिवाजी पार्क पोलिसांत तक्रार केली होती. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर कंपनीचा चार्टर्ंड अकाऊंटट प्रितम मिश्राविरुद्ध ४०६, ४२०, ४६७ख ४६८, ४७१ भादवी कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्यांचा तपास सुरु असून लवकरच प्रितमची पोलिसांकडून चौकशी होणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.