राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कंत्राटी कर्मचार्याची आत्महत्या
कर्जामुळे आलेल्या मानसिक नैराश्यातून आत्महत्या केल्याचे उघड
मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
२३ डिसेंबर २०२४
मुंबई, – राज्य उत्पादन शुल्क विभागातील कंत्राटी कर्मचारी शाहू सदाशिव माने (५७) यांनी शनिवारी जीटीबी रेल्वे स्थानकात रेल्वेखाली आत्महत्या केली. कर्जामुळे आलेल्या मानसिक नैराश्यातून त्यांनी आत्महत्या केल्याचे तपासात उघडकीस आले आहे. शाहू यांना आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याप्रकरणी दोन महिलांसह तिघांविरुद्ध वडाळा रेल्वे गुन्हा दाखल केला आहे. मनिषा सुधीर देठे, स ुधीर देठे आणि विद्या चतुर अशी या तिघांची नावे असून या तिघांची लवकरच रेल्वे पोलिसांकडून चौकशी होणार आहे.
विजय शाहू माने हा २३ वर्षांचा तरुण सायन-कोळीवाडा, प्रतिक्षानगरच्या सिंधुदुर्गचा रहिवाशी आहे. याच इमारतीमध्ये तो त्याची आई आणि वडिल शाहू आणि भावासोबत राहतो. तो सध्या एका खाजगी कंपनीत तर त्याचा भाऊ संकेत हा बंगलोर येथे नोकरीस आहे. त्याचे वडिल शाहू हे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथील राज्य उत्पादन शुल्क विभागात कंत्राटी कामगार म्हणून कामाला होते. शनिवारी रात्री उशिरापर्यंत शाहू हे घरी आले नव्हते. त्यामुळे त्याची आई शालिनीने त्यांना कॉल केला होता. यावेळी तो कॉल पोलिसांनी घेतला होता. यावेळी पोलिसांनी शाहू यांचा जीटीबी रेल्वे स्थानकात अपघात झाला असून त्यांना केईएम हॉस्पिटलमध्ये आणल्याचे सांगितले. तयामुळे ती विजयसोबत केईएम हॉस्पिटलमध्ये गेली होती. तिथे तिला शाहू यांना डॉक्टरांनी मृत घोषित केल्याचे सांगण्यात आले. त्यांच्याकडे पोलिसांना एक सुसायट नोट सापडली होती. या नोटमधील हस्ताक्षर शाहू माने यांचेच होते.
माने कुटुंबियांच्या चौकशीतून शाहू यांनी कोळीवाडी, सरदारनगर, रावळी कॅम्पची रहिवाशी असलेल्या मनिष देठे या महिलेकडून साडेतीन लाख रुपयांचे कर्ज घेतले होते. या कर्जावर ते तिला दरमाह नऊ टक्के व्याज म्हणून ३१ हजार ५०० रुपये देत होते. याच पैशांतून शाहू यांनी खाद्यपदार्थ आणि दूधाचा होलसेलचा व्यवसाय सुरु होता. मात्र कोरोनामुळे त्यांना व्यवसायात प्रचंड नुकसान झाले होते. त्यांचा व्यवसाय बंद पडला होता. त्यात सर्व माल खराब केल्याने त्यांना पाच लाखांचे नुकसान झाले होते. तरीही ते मनिषाला दरमाह व्याजाची रक्कम देत होते. मात्र दुसर्या लॉकडाऊननंतर त्यांना व्याजाची रक्कम परत करता आली नाही. त्यामुळे तिने साडेतीन लाखाची मूळ रक्कम आणि व्याजाची साडेतीन असे सात लाखासाठी त्याने तिला देणे असल्याचे सांगितले होते. या पैशांवरुन तिने त्यांच्या घरी येऊन शिवीगाळ करुन भांडण केले होते. व्याजाची रक्कम देणे शक्य नसल्याने त्यांनी इतर ठिकाणाहून तीन लाखांची व्यवस्था करुन मनिषाला दिले होते. तरीही ती उर्वरित रक्कमेसाठी त्यांचा सतत अपमान करत होती. मनिषामुळे त्यांच्यावर कर्जाचा डोंगर झाला होता.त्यामुळे त्यांनी त्यांचे घर विकले होते.
शनिवारी २१ डिसेंबरला मनिषा ही त्यांच्या घरी आली होती. कुठल्याही परिस्थितीत आज पैसे घेऊन जाणारच असा पवित्रा तिने घेतला होता. यावेळी तिने तिथे प्रचंड तमाशा केला होता. ही माहिती नंतर शाहू यांना त्यांच्या पत्नीने सांगितली होती. मनिषा घरी असल्याने ते घरी गेले नव्हते. त्यातून आलेल्या नैराश्यातून शाहू यांनी लोकलखाली आत्महत्या केली होती. त्यापूर्वी त्यांनी त्यांच्या सुसायट नोटमध्ये मनिषा, तिचा पती सुधीर देठे आणि विद्या चतुर यांच्यामुळे आपण आत्महत्या करत असल्याचे नमूद केले होते. रेल्वे पोलिसाकडून अपघाताची माहिती समजताच माने कुटुंबियांसोबत मनिषा हीदेखील जीबीटी रेल्वे स्थानकात शहानिशा करण्यासाठी आली होती. मनिषासह इतर दोघांनी त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणात व्याज घेतले होते. पैसे दिले नाही म्हणून त्यांच्यावर दबाब आणून त्यांना आत्महत्या करण्यास प्रवृत्त केले होते. या प्रकारानंतर विजय माने याच्या तक्रारीवरुन वडाळा रेल्वे पोलिसांनी तिन्ही आरोपीविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्यांचा पोलिसांकडून तपास सुरु आहे. त्यांची लवकरच पोलिसांकडून चौकशी करुन जबानी नोंदविण्यात येणार आहे.