मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
२७ जानेवारी २०२५
ठाणे, – घरफोडीच्या गुन्ह्यांतील रेकॉर्डवरील दुकलीस ठाणे गुन्हे शाखेच्या अधिकार्यांनी अटक केली. लतिफ आरिफ खान आणि संगप्पा नंदप्पा सिरमकोल अशी या दोघांची नावे असून ते दोघेही कर्नाटकचे रहिवाशी आहे. या दोघांच्या अटकेने चोरीसह घरफोडीच्या पाच गुन्ह्यांची उकल करण्यात पोलिसांना यश आले असून दोघांकडून पोलिसांनी २१ लाख ४५ हजार रुपयांचा चोरीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. अटकेनंतर त्यांना लोकल कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे.
कल्याणकडून भिवंडीकडे जाणार्या क्वि बाईक हॉटेलजवळ काहीजण चोरीच्या मालाची विक्रीसाठी येणार असल्याची माहिती पोलीस हवालदार शशिकांत यादव यांना मिळाली होती. या माहितीची शहानिशा करण्यासाठी पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे, सहपोलीस आयुक्त ज्ञानेश्वर चव्हाण, अतिरिक्त पोलीस आयुक्त पंजाबराव उगले, पोलीस उपायुक्त अमरसिंह जाधव, सहाय्यक पोलीस आयुक्त शेखर बागडे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक जनार्दन सोनवणे, सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीराज माळी, धनराज केदार, पोलीस उपनिरीक्षक रविंद्र पाटील, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक सुधाकर चौधरी, पोलीस हवालदार शशिकांत यादव, वामन भोईर, सचिन जाधव, सुनिल साळुंखे, प्रकाश पाटील, साबीर शेख, पोलीस शिपाई उमेश ठाकूर, अमोल इंगळे, विजय कुंभार, नितीन बैसाणे यांनी तिथे साध्या वेशात पाळत ठेवली होती. ठरल्याप्रमाणे तिथे आलेल्या लतिफ खान आणि संगप्पा सिरमकोल या दोघांनाही शिताफीने अटक केली.
या दोघांकडून पोलिसांनी २१ लाख ४५ हजार रुपयांचे चोरीचे तांब्याचे पाईप हस्तगत केले आहे. या दोघांविरुद्ध नारपोली आणि पडघा पोलीस ठाण्यात अनुक्रमे तीन आणि दोन चोरीसह घरफोडीचे गुन्हे दाखल आहेत. या गुन्ह्यांत त्यांना अमन खान आणि इतर सहकार्यांनी मदत केली होती. दोन्ही आरोपी कर्नाटक, विजयपूरचे रहिवाशी असून चोरीसह घरफोडीसाठी ही टोळी ठाण्यात येत ाहेती. त्यांच्या अटकेने अशाच इतर काही गुन्ह्यांची उकल होण्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे.