मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
१ फेब्रुवारी २०२५
भाईंदर – घरफोडीच्या गुन्ह्यांतील एका सराईत गुन्हेगारास ठाणे ग्रामीण गुन्हे शाखेच्या अधिकार्यांनी अटक केली. सुहेल जमील सिद्धीकी असे या २५ वर्षीय आरोपीचे नाव असून तो मूळचा उत्तरप्रदेशचा रहिवाशी आहे. त्याच्या अटकेने घरफोडीच्या चार गुन्ह्यांची उकल करण्यात पोलिसांना यश आले आहे. अटकेनंतर त्याला पुढील चौकशीसाठी उत्तन सागरी पोलिसांकडे सोपविण्यात आले आहे. त्याच्या अटकेने अशाच इतर काही गुन्ह्यांची उकल होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
हॅरल फ्रेंडी बुनकवली हे भाईंदरच्या उत्तन, भाटेबंदर लाईट हाऊसजवळील परिसरात राहतात. ४ डिसेंबर २०२४ रोजी त्यांच्या घरात कोणीही नव्हते. हीच संधी साधून अज्ञात व्यक्तीने त्यांच्या घरात प्रवेश करुन कपाटातील सोन्याचे दागिने चोरी करुन पलायन केले होते. हा प्रकार नंतर उघडकीस हॅरल बुनकवली यांनी येताच उत्तन सागरी पोलीस ठाण्यात तक्रार केली होती. या तक्रारीनंतर पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध घरफोडीचा गुन्हा दाखल केला होता. या गुन्ह्यांचा स्थानिक पोलिसांसह गुन्हे शाखेचे अधिकारी संमातर तपास करत होते.
आरोपीच्या अटकेसाठी पोलीस आयुक्त मधुकर पाण्डेय, अतिरिक्त पोलीस आयुक्त दत्तात्रय शिंदे, पोलीस उपायुक्त अविनाश अंबुरे, सहाय्यक पोलीस आयुक्त मन बल्लाळ, गुन्हे शाखेचे प्रभारी पोलीस निरीक्षक प्रमोद बडाख, सहाय्यक पोलीस निरीक्षक पुष्पराज सुर्वे, पोलीस उपनिरीक्षक संदीप शिंदे, सहाय्यक फौजदार अशोक पाटील, पोलीस हवालदार अविनाश गर्जे, पुष्पेंद्र थापा, संजय शिंदे, संतोष लांडगे, मनोज चव्हाण, सचिन हुले, सुधीर खोत, अश्विन पाटील, पोलीस शिपाई प्रशांत विसपुते, धिरज मेंगाणे, गौरव बारी, सौरभ इंगळे, मसुब किरण असवले, सायबर सेलचे सहाय्यक फौजदार संतोष चव्हाण यांनी विशेष मोहीम हाती घेतली होती.
परिसरातील सीसीटिव्ही फुटेज आणि तांत्रिक माहितीवरुन सुहेल सिद्धीकी या तरुणाला संशयित आरोपी म्हणून ताब्यात घेतले होते. तपासात त्यानेच ही घरफोडी केल्याची कबुली दिली. सुहेल हा मूळचा उत्तरप्रदेश, बहराईच, नानपाराचा रहिवाशी आहे. सध्या तो अंधेरीतील दादाभाई नौरोजी रोड, भवन्स कॉलेजवळ राहतो. तो घरफोडीच्या गुन्ह्यांतील रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे. त्याच्या अटकेने या गुन्ह्यांसह उत्तर सागरी पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या इतर तीन गुन्ह्यांची उकल करण्यात पोलिसांना यश आले आहे. अटकेनंतर त्याला पुढील चौकशीसाठी संंबंधित पोलिसांकडे सोपविण्यात आले. अटकेनंतर त्याला लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्याला पोलीस कोठडीत सुनावली आहे.