मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
26 जून 2025
मुंबई, – हेव्ही डिपॉझिटच्या सुमारे साडेअकरा लाखांचा अपहार करुन एका व्यावसायिकासह दोघांची प्रॉपटी एजंटने फसवणुक केल्याचा प्रकार अंधेरी परिसरात उघडकीस आला आहे. याप्रकरणी अमीतकुमार रंजन या प्रॉपटी एजंटविरुद्ध वर्सोवा पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. अमीत हा बिहारला पळून गेला असून त्याच्या अटकेसाठी एक टिम लवकरच बिहारला जाणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.
70 वर्षांचे राजन रामलूभाया व्होरा हे वांद्रे परिसरात राहत असून त्यांचा डेअरी फार्मचा व्यवसाय आहे. त्यांची अंधेरीतील वर्सोवा गावात मोठी प्रॉपटी आहे. ती प्रॉपटी भाड्याने देण्यासाठी स्थानिक एजंट अमीतकुमारला सांगितले होते. त्यांचा परिचित असल्याने त्याच्यासोबत ते प्रॉपटी खरेदी विक्रीचा व्यवहार करत होते. त्यांना अंधेरीतील वर्सोवा गाव, खर्डे गल्ली, खर्डे हाऊसमध्ये चौथ्या मजल्यावरील एक फ्लॅट विकत घ्यायचा होता. तोपर्यंत तो फ्लॅट त्यांनी हेव्ही डिपॉझिटवर भाड्याने घ्यावा असा सल्ला दिला होता. त्यास त्यांनी होकार दिला होता. ठरल्याप्रमाणे त्यांच्यात सहा लाखांमध्ये हेव्ही डिपॉझिटचा एक करार झाला होता. जून 2023 रोजी त्यांच्यातील करारानंतर राजन व्होरा यांनी अमीतकुमारला सहा लाख रुपये दिले होते.
याच दरम्यान त्याने त्यांची विकास गुप्ताशी ओळख करुन दिली. तो फ्लॅट त्याला भाडेकरु म्हणून देण्यास सांगून त्यांच्यात 18 हजार भाडा आणि 36 हजार डिपॉझिट असा करार झाला होता. फेब्रुवारी 2024 पर्यंत अमीतकुमारने त्यांना 18 हजाराप्रमाणे भाडे दिले होते, मात्र नंतर त्याने भाडे देण्यास टाळाटाळ केली होती. तो त्यांचे कॉल घेत नव्हता, त्यांच्या कॉलला प्रतिसाद देत नव्हता. चौकशीनंतर त्यांना अमीतकुमार हा त्याच्या बिहारच्या पटना येथील गावी गेल्याचे समजले. त्यानंतर त्यांनी रुममध्ये जाऊन चौकशी केली. यावेळी फ्लॅटमध्ये मुकूंद सिंग नावाचा एक व्यक्ती राहत असल्याचे त्याने तो रुम अमीतकुमारकडून विकत घेतल्याचे सांगितले. हा प्रकार समजताच त्यांनी अमीतकुमारकडून हेव्ही डिपॉझिटसाठी दिलेल्या सहा लाखांची मागणी सुरु केली होती,
मात्र त्याने पैसे दिले नाही. याच दरम्यान त्यांना अमीतकुमारने सुरेंद्रप्रसाद परदेशीलाल पांडे या व्यक्तीकडून त्याच फ्लॅटसाठी हेव्ही डिपॉझिट म्हणून साडेपाच लाख रुपये घेतले होते. मात्र त्याला फ्लॅटचा ताबा दिला किंवा हेव्ही डिपॉझिटची रक्कम परत केली नव्हती. हेव्ही डिपॉझिटच्या फ्लॅट देण्याचे आमिष दाखवून अमीतकुमार त्यांच्यासह सुरेंद्रप्रसाद यांची साडेअकरा लाखांची फसवणुक केली होती. हा प्रकार लक्षात येताच त्यांनी अमीतकुमार रंजनविरुद्ध वर्सोवा पोलिसांत तक्रार केली होती. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर त्याच्याविरुद्ध पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. तो बिहारच्या गावी पळून गेल्याने त्याच्या पोलिसांनी शोध सुरु आहे.