मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
३१ ऑगस्ट २०२४
मुंबई, – सुमारे २५ लाखांच्या हेव्ही डिपॉझिटचा अपहार करुन फसवणुक केल्याप्रकरणी जयप्रकाश रामदिन जैस्वार या आरोपीविरुद्ध वडाळा टी टी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. जयप्रकाशने विजयकुमार राममहेश जैस्वार याने बोगस नावाने करार करुन ही फसवणुक केल्याचे तपासात उघडकीस आले. या गुन्ह्यांचा तपास सुरु असून जयप्रकाश जैस्वार याची लवकरच पोलिसाकडून चौकशी होणार आहे.
दिनमोहम्मद नुरुद्दीन कुरेशी हे वडाळा येथे राहत असून ते ग्राहक सेवा केंद्र चालवितात. दोन वर्षांपूर्वी ते भाड्याच्या घरासाठी प्रयत्नशील होते. या प्रयत्नात असताना त्यांची नोव्हेबर २०२२ रोजी त्यांची विजयकुमार राममहेश जैस्वार याच्याशी ओळख झाली होती. या ओळखीनंतर त्यांनी त्याला भाड्याने एक रुम देण्याची विनंती केली होती. यावेळी त्याने त्यांना शांती एसआरए इमारतीमध्ये एक फ्लॅट असल्याचे सांगून त्याला तोच रुम भाड्याने देण्याचे आश्वासन दिले होते. यावेळी विजयकुमारने त्याला हेव्ही डिपॉझिटचा सल्ला दिला होता. त्यामुळे त्याचे दरमाह पंधरा हजार वाचणार होते. त्यामुळे त्यांनी ती रुम हेव्ही डिपॉझिटवर घेण्याचा निर्णय घेतला होता. चर्चेअंती त्यांच्यात २५ लाखांच्या हेव्ही डिपॉझिटवर रुम देण्याचे ठरले होते. डिसेंबर २०२२ रोजी त्याने जैस्वारला पंधरा लाख रुपये दिले होते. त्यांनतर त्यांच्यात पाच वर्षांचा लिव्ह ऍण्ड लायसन्स करार झाला होता. या करारानंतर त्याला आणखीन दहा लाख रुपये देण्यात आले होते. करारासोबत त्याने विजयकुमार राममहेश जैस्वार या नावाने अलोटमेंट लेटर, संमतीपत्र आणि विकास करारनामा कागदपत्रे जोडली होती. मे २०२३ रोजी त्यांना विजयकुमारचे खरे नाव जयप्रकाश रामदिन जैस्वार असून त्याला त्याच नावाने परिसरात ओळखले जाते. याबाबत त्याने त्याच्याकडे विचारणा केल्यानंतर त्याने त्याला याच नावाने लोक ओळखतात असे सांगितले. मात्र त्यांचे समाधान झाले होते. कारण लिव्ह ऍण्ड लायसन्समध्ये त्यांचे विजयकुमार जैस्वार या नावाने करार झाला होता. त्यामुळे त्यांनी वांद्रे येथील एसआरए कार्यालयात जाऊन चौकशी केली होती. यावेळी त्यांना ज्या १२२ सभासदांना घराचे वाटप पत्र देण्यात आले होते. त्यातही विजयकुमार जैस्वार या नावाने त्याने स्वाक्षरी केल्याचे दिसून आले. मात्र त्याच्या नावासमोर फोटो नव्हता. बाकीच्या सर्व सदस्यांचे फोटो होते.
यादीच्या शेवटच्या पानावर अध्यक्ष म्हणून जयप्रकाश जैस्वार या नावाने स्वाक्षरी करण्यात आली होती. अशा प्रकारे एसआरएच्या फ्लॅट मिळविण्यासाठी त्याने बोगस दस्तावेज बनवून मिळविण्याचा प्रयत्न केला होता. तसेच बोगस नावाने त्यांच्याशी लिव्ह ऍण्ड लायसन्सचा करार करुन त्यांच्याकडून घेतलेल्या सुमारे २५ लाखांचा अपहार केला होता. फ्लॅटचा ताबा तसेच हेव्ही डिपॉझिट म्हणून घेतलेली रक्कम परत न करता त्यांची फसवणुक केली होती. हा प्रकार उघडकीस येताच त्यांनी वडाळा टी टी पोलीस ठाण्यात जयप्रकाश जैस्वारविरुद्ध तक्रार केली होती. या तक्रारीनंतर पोलिसांनी त्याच्याविरुद्ध ४१९, ४२०, ४०६, ४७४, ४७१, ४६८, ४६५ भादवी कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्यांचा पोलिसाकडून तपास सुरु असून लवकरच जयप्रकाश जैस्वार याची पोलिसांकडून चौकशी होणार आहे.