मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
१६ फेब्रुवारी २०२५
मुंबई, – वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवर रात्रीच्या वेळेस भरवेगात बाईक चालवून रेसिंग लावणार्या बाईकस्वाराविरुद्ध वांद्रे आणि खेरवाडी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली होती. या मोहीमेतर्गत शनिवारी रात्री उशिरा ५२ बाईकस्वाराविरुद्ध विविध कलमांतर्गत गुन्हे दाखल करुन ५२ हून अधिक बाईक जप्त करण्यात आले आहेत.
गेल्या काही वर्षांत वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवर काहीजण बाईकस्वार रात्री उशिरा स्वतसह इतराच्या जिवाची पर्वा न करता भरवेगात बाईक चालवून रेसिंग करत असल्याच्या अनेक तक्रारी पोलिसांना प्राप्त झाल्या होत्या. शनिवारीही अशाच प्रकारे काही लोकांनी मुंबई पोलिसांच्या कंट्रोल रुमला प्रप्त झाली होती. या तक्रारीची वरिष्ठांनी गंभीर दखल घेत खेरवाडी आणि वांद्रे पोलिसांना अशा बाईकस्वाराविरुद्ध धडक मोहीम हाती घेण्याचे आदेश दिले होते. या आदेशानंतर खेरवाडी पोलिसांनी रात्री उशिरापर्यंत ३८ बाईकस्वारांना तर वांद्रे पोलिसांनी १४ बाईकस्वारांना चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. त्यांच्याविरुद्ध भारतीय न्याय सहिता आणि मोटार वाहन कायद्यांतर्गत गुन्हे दाखल करुन त्यांच्यावर कारवाई करण्यात आली होती.
या कारवाईत ५२ हून अधिक बाईक् पोलिसांनी जप्त केल्या आहेत. सर्व नागरिकांना मुंबई पोलिसंाकडून आवाहन करण्यात आले की, अशा प्रकारच्या बाईक रेसिंगबाबत काहीही माहिती मिळाल्यास त्याची मुंबई पोलिसांच्या कंट्रोल रुम १०० आणि ११२ या क्रमांकावर संपर्क साधावा. या माहितीनंतर संबंधित बाईकस्वाराविरुद्ध योग्य ती कायदेशीर कारवाई केली जाईल.