मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
२२ फेब्रुवारी २०२४
मुंबई, – रियल इस्टेट क्षेत्रातील एक नामांकित कंपनी म्हणून परिचित असलेल्या हिराानंदानी ग्रुपच्या मुंबईसह पाच ठिकाणी अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) छापेमारी केली. विदेशी चलन व्यवस्थापन कायद्याच्या (फेमा) उल्लघंन केल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आल्याचे बोलले जाते. दरम्यान या कारवाईत काही महत्त्वाचे दस्तावेज ताब्यात घेण्यात आले असून याबाबतचा अधिक तपशील समजू शकला नाही. या कारवाईमुळे रियल इस्टेट व्यावसायिकामध्ये प्रचंड भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.
हिरानंदानी ग्रुप भारतातील रियल इस्टेट क्षेत्राशी संबंधित एक मोठी कंपनी असून सुरेंद्र आणि निरंजन हिरानंदानी यांनी या कंपनीची स्थापना केली होती. दर्शन हिरानंदानी हे नामांकित व्यावसायिक असून त्यांचा मुलगा निरंजन हा मुलगा आहे. तो हिरानंदानी ग्रुपचा सीईओ आहे. मुंबई शहरात हिरानंदानीचे मुख्य कार्यालय असून बंगलोर, चेन्नई, हैद्राबाद येथे कंपनीचे अनेक रियल इस्टेटशी संबंधित प्रकल्प सुरु आहेत. इंटरनॅशनल कन्सेर्टिंग ऑफ इन्हेस्टिगेटिव्ह जर्नलिस्ट म्हणजे आयसीआयजेमध्ये जाहीर केलेल्या पॅडोरा पेपर्समध्ये भारतासह विविध देशातील बड्या गर्भश्रीमंत व्यक्तींनी, आजी-माजी राजकारणी, गुन्हेगारांची छुप्या मालमत्तेची माहिती समोर आली होती. यातील बहुतांश लोकांची त्यांची प्रॉपटी लपवून तर काहींनी कर चुकविल्याचे उघडकीस आले होते.
ही बाब उघड होऊ नये म्हणून कोट्यवधी रुपये देशाबाहेर गुंतवणुक केल होती. त्यातून अवैधरीत्या पैसा जमा केल्याचे उघडकीस आले होते. याच पॅडोरा पेपर्समध्ये हिरानंदानी ग्रुपचे नाव समोर आले होते. त्यानंतर त्याची केंद्रीय तपास यंत्रणेकडून चौकशी करण्यात आली होती. या चौकशीत टॅक्स हेवनवर आधारीत ट्रस्टमध्ये मोठ्या प्रमाणात गुंतवणुक झाली होती. चौकशीदरम्यान समोर आलेल्या कागदपत्रावरुन हिरानंदानी गु्रप आणि निरंजन हिरानंदानी यांच्या कुटुंबातील प्रमुखासह साठ दक्षलक्ष डॉलर मालमत्तेचे ट्रस्टचे लाभार्थी असल्याचे उघडकीस आले होते. त्यामुळे या संपूर्ण प्रकरणात आयकर विभागासह ईडीने स्वतंत्रपणे चौकशी सुरु केली होती.
या चौकशीचा एक भाग म्हणून काही महिन्यांपूर्वी आयकर विभागाने हिरानंदानी ग्रुपच्या कार्यालयात छापेमारी केली होती. या गु्रपच्या मुंबईसह देशभरातील विविध कार्यालयासह २५ ठिकाणी एकाच वेळेस ही कारवाई झाली होती. हिरानंदानी ग्रुपवर ईडीच्या कारवाईमुळे रियल इस्टेट क्षेत्राशी संबंधित व्यावसायिकामध्ये प्रचंड भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.