होळी-रंगपंचमीनिमित्त स्थानिक पोलिसांसह वाहतूक पोलिसांची मोहीम
१२४ मद्यपी, ४५९३ विनाहेल्मेट तर ४२८ ट्रिपल सीट चालकांवर कारवाई
मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
२५ मार्च २०२४
मुंबई, – होळी आणि रंगपंचमीनिमित्त शहरात कुठेही अनुचित प्रकार घडू नये म्हणून मुंबई पोलिीसांनी सर्वत्र कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवला असतानाच स्थानिक पोलिसांसह वाहतूक पोलिसांनी वाहतूक नियमांचे उल्लघंन करणार्या वाहनचालकांना चांगलाच दणका दिला. दोन दिवसांत १२४ मद्यपी, ४ हजार ५९३ विनाहेल्मेट तर ४२८ ट्रिपल सीट चालकावर पोलिसांनी कारवाई केली. यावेळी विविध वाहतूक नियमांचे उल्लघंन केल्याप्रकरणी ५ हजार ४१६ चालकाविरुद्धही कारवाई करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.
होळी आणि रंगपंचमीनिमित्त शहरात कुठेही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिसांनी सर्वत्र कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात केला होता. कुठेही अनुचित घटना घडणार नाही याची योग्य ती काळजी घेण्यात आली होती. अनेकदा होळी आणि रंगपंचमीला काही वाहनचालक मद्यप्राशन करुन वाहन चालवतात. जेणेकरुन अपघाताच्या घटना घडतात. अशा घटनांना रोखण्यासाठी तसेच वाहतूक नियमांचे उल्लघंन करणार्या वाहनचालकाविरुद्ध स्थानिक पोलिसांसह वाहतूक पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली होती. या मोहीमेतर्ंगत या अधिकार्यांनी दोन दिवसांत ड्रंक ऍण्ड ड्राईव्ह मोहीमेतर्गत १२४ वाहनचालकाविरुद्ध कारवाई केली. ही कारवाई सुरु असताना विना हेल्मेट वाहन चालविणार्या ४ हजार ५९३ तर ४२८ ट्रिपल सीट चालकावर कारवाई करण्यात आली होती. त्यांच्याविरुद्ध विविध वाहतूक कायदा कलमांतर्गत कारवाई करण्यात आली आहे. खबरदारी म्हणून काही ठिकाणी नाकाबंदी लावण्यात आली होती तर काही ठिकाणी पोलीस गस्तवर अधिक भर देण्यात आला होता. यावेळी वाहतूक नियमांचे उल्लघंन करणार्या ५ हजार १४६ जणांवर विविध कलमांतर्गत कारवाई केल्याचे पोलिसंनी सांगितले.