सेल्फीसाठी विदेशी पर्यटक महिलेचा पाठलाग करुन मानसिक छळ
गैरवर्तन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करुन आरोपी तरुणांचा शोध सुरु
मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
27 फेब्रुवारी 2026
मुंबई, – मुंबई शहरात आलेल्या एका विदेशी पर्यटक महिलेचा सेल्फीसाठी पाठलाग करुन तिचा मानसिक शोषण झाल्याचा धक्कादायक प्रकार आग्रीपाडा परिसरात उघडकीस आला आहे. याबाबत सोशल मिडीयावर एक व्हिडीओ व्हायरल होताच त्याची मुंबई पोलिसांनी गंभीर दखल घेतली आहे. याप्रकरणी आग्रीपाडा पोलिसांनी विदेशी महिलेशी गैरवर्तन केल्याप्रकरणी दोन अज्ञात तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल करुन त्यांचा शोध सुरु केला आहे. या घटनेने संबंधित विदेशी महिलेला प्रचंड मानसिक धक्का बसला होता.
यूट्यबर असलेली इनेस फारिया ही विदेशी महिला गेल्या दोन महिन्यांपासून भारतात वास्तव्यास आहे. काही दिवसांपूर्वी ती दक्षिण मुंबईत फिरण्यासाठी आली होती. यावेळी तिचा दोन तरुणांनी पाठलाग केला. तिच्यासोबत त्यांना एक सेल्फी काढायचा होता, मात्र तिने नकार देऊनही ते दोघेही तिचा पाठलाग करत होते. तिच्याशी गैरवर्तन करत होते. जवळपास पंधरा ते वीस मिनिटे ते दोघेही तिचा पाठलाग करुन तिच्यासोबत सेल्फी काढण्यासाठी दबाव आणत होते,
मात्र तिने त्यांच्यासोबत सेल्फी काढण्यास स्पष्टपणे नकार दिा होता. घडलेल्या प्रकाराने तिला प्रचंड मानसिक धक्का बसला होता. त्यामुळे तिने सोशल मिडीयावर तिच्यासोबत घडलेल्या प्रसंगाचा एक व्हिडीओ शेअर करताना एक मॅसेज दिला होता. त्यात तिने भारतात तिला दोन महिन्यांत अनेकदा चांगला अनुभव आला, मात्र दक्षिण मुंबईत घडलेल्या या प्रकाराने तिला प्रचंड मानसिक धक्का बसला होता. तो दिवस माझ्यासाठी वेगळा होता. ते दोन्ही तरुण तिच्यासोबत सेल्फीसाठी आग्रह करत होते, मात्र वारंवार नकार देऊन ते तिचा पाठलाग करत होते. अखेर त्यांना तिने दूर केले होते.
सोशल मिडीयावर हा व्हिडीओ व्हायरल होताच त्याची सहपोलीस आयुक्त सत्यनारायण चौधरी यांनी गंभीर दखल घेत झोन तीनच्या पोलीस उपायुक्तांना कारवाईचे आदेश दिले होते. या आदेशानंतर आग्रीपाडा पोलिसांनी संबंधित दोन्ही तरुणांविरुद्ध विविध भारतीय न्याय सहिता कायदा कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. सोशल मिडीयावर या दोन्ही तरुणांचा फोटो व्हायरल झाला असून त्यांचा पोलिसांकडून शोध सुरु आहे. त्यांच्यावर लवकरच कायदेशीर कारवाई केली जाणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.