मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
25 फेब्रुवारी 2025
मुंबई, –
गुंतवणूक केल्यावर ५ ते ६ टक्के जास्त नफा देऊ असे सांगून २० गुंतवणूकदाराची १२ कोटी ७० लाखांची फसवणूक झाल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी दहिसर पोलिसांनी तिघा विरोधात गुन्हा नोंद केला आहे. त्याचा पुढील तपास आर्थिक गुन्हे शाखा करणार आहे.
कांदिवली येथे तक्रारदार राहत असून ते खासगी कंपनीत वरिष्ठ पदावर काम करतात. गेल्या वर्षी त्याचा मित्र त्याना भेटला होता. त्याने तक्रारदार यांच्याकडे ५ लाख रुपये गुंतवणुकीसाठी मागितले होते. तेव्हा पैसे नसल्याचे तक्रारदार याने त्याच्या मित्राला सांगितले. तेव्हा त्या मित्राने ज्याच्याकडे गुंतवणूक करतो, तो क्रेडिट कार्डवरून पैसे दिल्यावर तो ईएमआयचे पैसे भरतो असे त्याना सांगितले. गुंतवणूक केलेल्या रकमेवर तो ६ टक्के नफा देतो असे त्याना भासवले. तेव्हा तक्रारदार याने गुंतवणूक करण्यास नकार दिला. नकार दिल्यानंतर त्याने तक्रारदार याना पुन्हा संपर्क साधला. त्याना बोरिवली येथील कार्यालयात नेले. तेथे त्याना एक जण भेटला. त्याने २०१६ पासून आपण शेअर ट्रेडिंग मध्ये असल्याचे सांगितले. भेटी दरम्यान जर गुंतवणूक केल्यास सहा टक्के परतावा मिळेल असे त्याना सांगितले.
गेल्या वर्षी मे महिन्यात एकाने त्याना संपर्क केला. क्रेडिट कार्ड वरून ५ लाख रुपये रक्कम वापरण्यास दिल्याचे सांगितले. तेव्हा त्याच्या ओळखीचा एक जण असून त्याच्याकडे क्रेडिट कार्ड स्वॅप केल्यावर तो पैसे देईल, तसेच त्याना एकाने परतावा बाबत हमी देखील दिली. त्यावर विश्वास ठेऊन त्याने पैसे गुंतवणूक करण्यास होकार दिला. होकार दिल्यावर क्रेडिट कार्डवरून पैसे आल्याचा त्याना मेसेज आला. दुसऱ्या दिवशी त्याच्या कडून एक लाख रुपये काढून घेण्यात आले. तेव्हा त्याने पैशाबाबत विचारणा केली.
दुसऱ्या कार्डवरून पैसे जमा होतील असे त्याना सांगण्यात आले. एकाने त्याच्या क्रेडिट कार्डवरून ५ लाख रुपये काढले. पैसे काढल्यावर त्याना इन्व्हॉईस पाठवला. जून महिन्यात त्यांना एका फोन करून क्रेडिट कार्ड लिमिट बाबत विचारणा केली. जर २० लाख रुपये दिल्यास ती रक्कम परत करेन असे त्याना सांगितले. त्या पैशाबाबत तक्रारदार याने त्याला विचारणा केली तेव्हा, जुने शेअर सर्टिफिकेट विकत घेणार असून त्या द्वारे नफा कमावला जाईल असे त्याना भासवले. त्यावर विश्वास ठेवला. क्रेडिट कार्डचे लिमिट संपल्यावर त्याने सॅलरी खात्यावर कर्ज काढण्यास सांगितले. ऑगस्ट महिन्यात एकाने त्याच्याकडे ६० लाख रुपये गुंतवणुकीसाठी मागितले. त्या कर्जासाठी त्याने बँकेत अर्ज केला. एक जण त्याच्या खात्यात पैसे टाकून ते काढून घेत असायचा.
ठरल्यानुसार त्याने ऑगस्ट पासून पैसे देणे बंद केले होते. पैशाबाबत त्याने एकाला फोन केला, तेव्हा टाळाटाळ करू लागला. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्याने दहिसर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलीस ठाण्यात गेल्यावर अनेकाची फसवणूक झाल्याचे त्याच्या लक्षात आले. १२ कोटीची फसवणूक झाल्या प्रकरणी दहिसर पोलिसांनी गुन्हा नोंद केला.