मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
२५ डिसेंबर २०२४
मुंबई, – सिंगापूर येथील एका नामांकित खाजगी कंपनीत नोकरीची ऑफर देऊन एका इलेक्ट्रीकल इंजिनिअरची अज्ञात व्यक्तीने सुमारे दहा लाखांची ऑनलाईन फसवणुक केली. याप्रकरणी फसवणुकीसह आयटी कलमांतर्गत गुन्हा दाखल करुन अज्ञात व्यक्तीचा सांताक्रुज पोलिसांनी शोध सुरु आहे. या गुन्ह्यांत सायबर सेलचे अधिकारीही संमातर तपास करत आहेत.
श्रवण प्रसाद पोडुरी हे सांताक्रुज येथे राहत असून एका खाजगी कंपनीत इलेक्ट्रीकल इंजिनिअर म्हणून काम करतात. पगार कमी असल्याने त्यांना विदेशात काम करण्याची इच्छा होती. त्यासाठी त्यांचे प्रयत्न सुरु होते. विदेशात नोकरी करण्यासाठी त्यांना काही खाजगी वेवसाईटची त्यांचा बायोडाटा अपलोड केला होता. १८ नोव्हेंबर २०२४ ते त्यांच्या घरी होते. यावेळी त्यांना एका अज्ञात व्यक्तीने कॉल करुन तो एका खाजगी कंपनीतून बोलत असल्याचे सांगितले. ही कंपनीची सिंगापूरची असून तिथे त्याने त्यांना नोकरीची ऑफर दिली होती. त्यासाठी त्यांना रजिस्ट्रेशन फी आणि कागदपत्रांची पडताळणीसाठी पेसे जमा करावे लागतील असे सांगितले. त्यामुळे त्यांनी त्याला सुमारे दहा हजार रुपये ट्रान्स्फर केले होते.
काही दिवसांनी त्याने त्यांना पुन्हा कॉल करुन त्यांचे रजिस्टेशन आणि कागदपत्रांची पडताळणी झाली असल्याचे सांगितले. त्यांच्या नियुक्तीचे पत्र लवकरच पाठविण्यात येईल. त्यापूर्वी त्याने त्यांच्याकडे मेडीकलसह रेसीडन्सी परमीट, अकाऊंट ओपनिंग, वर्कर लायसन्ससह इतर कामासाठी पैशांची मागणी केली होती. विदेशात नोकरी करण्याची इच्छा असल्याने त्यांनी संबंधित व्यक्तीने दिलेल्या बँक खात्यात १८ नोव्हेंबर ते १८ डिसेंबर २०२४ या कालावधीत सुमारे दहा लाख रुपये ट्रान्स्फर केले होते. मात्र ही रक्कम ट्रान्स्फर करुनही त्यांना नोकरीचे नियुक्तीपत्र मिळाले नव्हते. त्यामुळे त्यांनी त्याला संपर्क साधला असता त्याच्याकडून त्यांना प्रतिसाद मिळाला नाही.
सिंगापूरच्या खाजगी कंपनीत नोकरीचे आमिष दाखवून या व्यक्तीने त्यांच्याकडून विविध कारणासाठी दहा लाख रुपये घेतले, मात्र नोकरी न देता त्यांची फसवणुक केली होती. फसवणुकीचा हा प्रकार लक्षात येताच त्यांनी सांताक्रुज पोलिसांना घडलेला प्रकार सांगून संबंधित व्यक्तीविरुद्ध तक्रार केली होती. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर या व्यक्तीविरुद्ध पोलिसांनी फसवणुकीसह आयटी कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्यांत सायबर सेलचे अधिकारी तपास करत आहे.