प्रॉपटीच्या वादातून बहिणीची भावाकडून चाकूने भोसकून हत्या

हत्येच्या गुन्ह्यांत पळून गेलेल्या आरोपी भावाला अटक

0

मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
25 एपिल 2025
मुंबई, – प्रॉपटीवरुन सुरु असलेल्या वादातून अनैया किरण पेंगणकर या 46 वर्षांच्या महिलेची तिच्याच सख्ख्या भावाने चाकूने भोसकून हत्या केल्याची घटना शुक्रवारी सकाळी विलेपार्ले परिसरात घडली. याप्रकरणी जुहू पोलिसांनी हत्येचा गुन्हा नोंदवून पळून गेलेल्या आरोपी भावाला अटक केली आहे. आशिष रघुनाथ करंदीकर असे या 48 वर्षीय आरोपीचे नाव असून त्याला शनिवारी वांद्रे येथील लोकल कोर्टात हजर केले जाणार आहे. गेल्या काही वर्षांपासून या दोघांमध्ये प्रॉपटीवरुन वाद सुरु होता. अखेर याच वादातून भावाने बहिणीला संपविले. या वृत्ताला वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनिल जाधव यांनी दुजोरा दिला आहे.

अनैया आणि आशिष हे दोघेही सख्खे बहिण-भाऊ असून ते विलेपार्ले येथील लल्लूभाई पार्कमधील एका जुन्या चाळीत राहत होते. चाळीतील रुम त्यांच्या वडिलांच्या नावावर होता. वडिलांच्या निधनानंतर ती रुम त्यांच्या आईच्या नावावर झाली होती. ही चाळ जुनी असल्याने चाळीचा लवकरच पुर्नविकास होणार होता. त्यापूर्वीच अनैया आणि आशिष यांच्या प्रॉपटीच्या वाटणीवरुन वाद सुरु होता. त्यातून त्यांच्यात नेहमीच खटके उडत होते. शुक्रवारी सकाळी आठ ते सव्वााआठच्या सुमारास त्यांच्या पुन्हा प्रॉपटीवरुन भांडण झाले होते. यावेळी रागाच्या भरात आशिषने अनैयावर तिक्ष्ण हत्याराने वार केले होते.

पाच ते सहा वार केल्यानंतर अनैया ही गंभीररीत्या जखमी झाली होती. त्यामुळे तिला स्थानिक रहिवाशांनी तातडीने कूपर हॉस्पिटलमध्ये दाखल केले होते. तिथे उपचार सुरु असताना तिचा मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनिल जाधव यांच्यासह जुहू पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती. याप्रकरणी हत्येचा गुन्हा दाखल होताच पळून गेलेल्या आशिष करंदीकर याला पोलिसांनी अटक केली. त्याला शनिवारी लोकल कोर्टात हजर करण्यात येणार आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page