नऊ व अकरा वर्षांच्या मुलांवर अनैसगिंक लैगिंक अत्याचार
खाद्यपदार्थात गुंगीचे औषध टाकून अत्याचार केल्याचे उघड
मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
12 एपिल 2025
मुंबई, – नऊ व अकरा वर्षांच्या दोन अल्पवयीन मुलांवर त्यांच्याच परिचित दोन आरोपींनी अनैसगिंक लैगिंक अत्याचार केल्याची घटना धक्कादायक घटना विलेपार्ले परिसरात उघडकीस आली आहे. याप्रकरणी जुहू पोलिसांनी दोन स्वतंत्र अनैसगिंक लैगिंक अत्याचारासह पोक्सो कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. याच गुन्ह्यांत एका 19 वर्षांच्या आरोपी तरुणाला जुहू पोलिसांनी अटक केली. सतरा वर्षांच्या दुसर्या आरोपी अल्पवयीन असल्याने त्याला डोंगरीतील बालसुधारगृहात पाठविण्यात आले आहेत.
32 वर्षांची तक्रादार महिला ही विलेपार्ले परिसरात राहते. तिला नऊ वर्षांचा पिडीत मुलगा आहे. याच परिसरात दोन्ही आरोपी राहत असून ते एकमेकांच्या परिचित आहेत. 2 एप्रिल ते 5 एप्रिल या कालावधीत या दोघांनी तिच्या मुलाला विलेपार्ले येथील रुईया पार्क परिसरातील एका मैदानाजवळ आणले होते. तिथे आणल्यानंतर या दोघांनी पिडीत मुलाचे दोन्ही हातपाय बांधून त्याला गुंगीचे पदार्थ खाण्यास दिले होते. बेशुद्धावस्थेत असताना सतरा वर्षांच्या आरोपी मुलाने त्याच्यासोबत अनैसगिक लैगिंक अत्याचार केला होता.
अशाच प्रकारे या दोघांनी अन्य एका अकरा वर्षांच्या मुलाला त्याच ठिकाणी आणले होते. तिथे त्याला गुंगीचे खाद्यपदार्थ देऊन त्याच्यावर या दोघांनी आळीपाळीने अनैसगिक लैगिंक अत्याचार केला होता. या दोन्ही मुलांना आरोपींनी हा प्रकार कोणालाही सांगू नये म्हणून धमकी दिली होती. मात्र भीतीपोटी त्यांनी हा प्रकार कोणालाही सांगितला नव्हता. दोन दिवसांपूर्वी हा प्रकार पिडीत मुलांनी त्यांच्या आईला सांगितला होता. ही माहिती समजताच त्यांना मानसिक धक्का बसला होता. त्यानंतर या दोन्ही महिलांनी जुहू पोलीस ठाण्यात धाव घेऊन दोन्ही आरोपीविरुद्ध तक्रार केली होती.
या तक्रारीची वरिष्ठ पोलीस अधिकार्यांनी गंभीर दखल घेत दोन स्वतंत्र अनैसगिक लैगिंक अत्याचारासह पोक्सो कलमांतर्गत गुन्हा दाखल केला होता. याच गुन्ह्यांत 19 वर्षांच्या आरोपीस पोलिसांनी अटक केली तर दुसरा आरोपी सतरा वर्षांचा असल्याने त्याला डोंगरीतील बालसुधारगृहात पाठविण्यात आले होते. शुक्रवारी उघडकीस आलेल्या या दोन्ही घटनेने स्थानिक रहिवाशांमध्ये प्रचंड संतापाची लाट उसळली होती.