मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
5 जून 2025
मुंबई, – भरवेगात जाणार्या एका डंपरच्या धडकेने 35 वर्षांच्या व्यक्तीचा मृत्यू झाला. या व्यक्तीची ओळख पटली नाही. त्याची ओळख पटावी यासाठी पोलिसांनी प्रयत्न सुरु केला आहे. अपघताानंतर डंपरचालक पळून गेल्याने त्याच्याविरुद्ध काळाचौकी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. डंपरचा क्रमांक पोलिसांना प्राप्त झाला असून या क्रमांकावरुन त्याचा शोध सुरु असल्याचे पोलिसांनी सांगितले.
हा अपघात बुधवारी सकाळी दहा वाजता लालबाग येथील गरमखाडा जंक्शन परिसरात झाला. महेंद्र रघुनाथ उत्तेकर हे भायखळा पोलीस वसाहतीत राहत असून सध्या भोईवाडा पोलीस ठाण्यात सहाय्यक फौजदार म्हणून कार्यरत आहेत. बुधवारी सकाळी कंट्रोल रुममधून लालबाग सिग्नलजवळ अपघात झाल्याची माहिती पोलिसांना प्राप्त झाली होती. या माहितीनंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती. घटनास्थळी गेलेल्या पोलिसांना दादरकडे ाजणार्या उत्तर वाहिनीवर एक व्यक्ती जखमी अवस्थेत पडल्याचे दिसून आले. या व्यक्तीच्या कचरा वाहून नेणार्या एका डंपरने धडक दिली होती.
अपघातानंतर डंपरचालक त्याला कुठलीही वैद्यकीय मदत किंवा अपघाताची माहिती पोलिसांना न देता पळून गेला होता. त्यामुळे जखमी व्यक्तीला पोलिसांनी तातडीने जवळच्या केईम हॉस्पिटलमध्ये दाखल केले. तिथे त्याला डॉक्टरांनी मृत घोषित केले. मृत व्यक्तीचे वय 35 वर्ष असून त्याची ओळख पटेल अशी कुठलेही दस्तावेज त्याच्याकडे सापडले नव्हते. त्यामुळे त्याचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला होता. याप्रकरणी महेंद्र उत्तेकर यांच्या तक्रारीवरुन पोलिसांनी डंपरचालकाविरुद्ध हलगर्जीपणाने डंपर चालवून एका पादचार्याच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला होता. अपघातानंतर तो पळून गेल्याने त्याचा पोलिसाकडून शोध सुरु आहे.