मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
27 जानेवारी 2026
मुंबई, – अंधेरीतील ओशिवरा परिसरात असलेल्या एका निवासी सोसायटीमध्ये झालेल्या फायरिंगप्रकरणी अभिनेता-निर्माता कमाल रशीद खान याचा पिस्तूलचा परवाना लवकरच रद्द होणार आहे. त्यासाठी वर्सोवा पोलिसांनी कारवाई करण्यास सुरुवात केली असून त्याचाच एक भाग म्हणून कमाल खानचा पिस्तूल रद्द करण्याासाठी वर्सोवा पोलिसांकडून पोलीस आयुक्त देवेन भारती यांच्याकडे एक अर्ज सादर करण्यात आला आहे. पोलीस आयुक्तांच्या आदेशानंतर कमाल खानचा पिस्तूलचा रद्द होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. दरम्यान फायरिंगच्या गुन्ह्यांत पोलीस कोठडीत असलेल्या कमालला पुन्हा लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्याची पोलीस कोठडीतून चौदा दिवसांच्या न्यायालयीन कोठडीत रवानगी केली आहे. त्यानंतर त्याच्या वकिलांनी कमालच्या जामिनासाठी अर्ज केला होता.
ओशिवरा येथील नालंदा सोसायटीमध्ये कमाल खान हा राहतो. तिथेच पटकथा आणि लेखक नीरज मिश्रा आणि मॉर्डल प्रतिक वैद हे राहतात. रविवारी 18 जानेवारीला कमाल हा त्याच्या घरी त्याच्या परवाना असलेली पिस्तूलची सफाई करत होता. यावेळी त्याच्या पिस्तूलमधून दोन गोळ्या फायर झाल्या होत्या. या दोन गोळ्या नीरज मिश्रा आणि प्रतिक वेद यांच्या घराजवळील भिंतीसह कपाटाला लागल्या होत्या. या गोळीबारात कोणीही जखमी झाले नव्हते. मात्र अचानक झालेल्या गोळीबाराने स्थानिक रहिवाशांमध्ये प्रचंड तणावाचे वातावरण झाले होते. ही माहिती प्राप्त होताच ओशिवरा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन या गोळीबाराची चौकशी सुरु केली होती.
चौकशीत कमालच्या पिस्तूलमधून या गोळ्या फायर झाल्याचे उघडकीस आले होते. त्यामुळे त्याला याच गुन्ह्यांत पोलिसांनी अटक केली होती. अटकेनंतर त्याला वांद्रे येथील लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्याला 27 जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली होती. त्याच्या पोलीस कोठडीची मुदत संपत असल्याने त्याला मंगळवारी पुन्हा अंधेरीतील लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते.
यावेळी कोर्टाने त्याला चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. त्यानंतर त्याच्या वतीने त्याच्या वकिलांनी जामिनासाठी अर्ज केला होता. या अर्जावर बुधवारी सुनावणी होणार आहे. कमालकडे एक पिस्तूल आणि तीस जिवंत काडतुसे होते. तशी नोंद त्याने पोलिसांकडे केली होती. त्यापैकी दोन गोळ्या पिस्तूलची सफाई करताना फायर झाल्या.
सात गोळ्या मिसिंग आहेत. त्या गोळ्या त्याने त्याच्या उत्तरप्रदेशात राहणार्या भावाकडे ठेवल्याचे बोलले जाते. त्यामुळे त्याच्याकडील पिस्तूल आणि जिवंत काडतुसे पोलिसांनी ताब्यात घेतले आहेत. त्याचा पिस्तूलचा परवाना रद्द करण्यासाठी आता वर्सोवा पोलिसांनी प्रयत्न सुरु केले आहे. याबाबत काही कागदपत्रे पोलीस आयुक्तांना सादर करण्यात आले आहे. त्यावर लवकरच निर्णय अपेक्षित आहे.