मक्याच्या दाण्यांचा 27 लाखांच्या पेमेंटचा अपहार करुन फसवणुक

नागपूरच्या व्यापार्‍याला दोन महिन्यानंतर अटक व कोठडी

0

मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
8 मे 2025
मुंबई, – शंभर मेट्रीक टन मक्याच्या दाण्याचा सुमारे 27 लाखांच्या पेमेंटचा अपहार करुन दोन व्यापार्‍याच्या फसवणुक कटातील एका नागपूरच्या मुख्य वॉण्टेड व्यापार्‍याला दोन महिन्यानंतर कांदिवली पोलिसांनी अटक केली. राहुल रमेशचंद्र जैन असे या 39 व्यापार्‍याचे नाव असून फसवणुकीच्या याच गुन्ह्यांत तो सध्या पोलीस कोठडीत आहे. राहुल जैनने अशाच प्रकारे इतर काही फसवणुकीचे गुन्हे केले आहेत का याचा पोलिसांकडून तपास सुरु असल्याचे सांगण्यात आले.

हार्दिक भद्रेशकुमार शहा हे व्यापारी असून ते कांदिवली परिसरात राहतात. त्यांची बीडीएफ इंटरनॅशनल एलएलपी नावाची एक खाजगी कंपनी असून त्यात श्रेयाश चोप्रा हा त्यांचा पार्टनर आहेत. ही कंपनीत मार्केटमध्ये विविध व्यापार्‍यांना माल पुरविण्याचे काम करते. गेल्या वर्षी त्यांच्या कंपनीला पाच कोटी रुपयांच्या दोन हजार मेट्रीक टन मक्याचे दाणे पुरविण्याचे एक कंत्राट मिळाले होते. त्यासाठी त्यांनी मक्याच्या दाण्याची बाजारपेठ असलेल्या नागपूर शहरात चौकशी सुरु केली होती. याच दरम्यान त्यांची राहुल जैन या व्यापार्‍याशी ओळख झाली होती. त्याने त्यांना 52 लाखांमध्ये दोनशे मेट्रीक टन माल पुरविण्याचे आश्वासन दिले होते.

ठरल्याप्रमाणे ऑगस्ट महिन्यांत राहुलने त्यांना शंभर मेट्रीक टन मक्याच्या दाण्याची डिलीव्हरी केली होती. त्यानंतर त्यांनी त्याला 26 लाख 79 हजार रुपयांचे पेमेंट केले होते. उर्वरित मक्याच्या दाण्यासाठी त्याने त्यांच्याकडे आगाऊ पैशांची मागणी केली होती. त्याच्यावर विश्वास ठेवून त्यांनी त्याला सप्टेंबर महिन्यांत दोन टप्यात शंभर टन मक्याच्या दाण्यासाठी पेमेंट पाठवून दिले होते. दुसर्‍या दिवशी त्याने त्यांना कॉल करुन त्यांचा माल बिहारहून निघाला असून दोन दिवसांत त्यांना डिलीव्हरी मिळेल असे सांगितले. मात्र दिलेल्या वेळेत त्याने मालाची डिलीव्हरी केली नाही. त्यामुळे त्यांनी राहुलला संपर्क साधण्याचा प्रयत्न केला,

यावेळी तो विविध कारण सांगून त्यांना टाळण्याचा प्रयत्न करत होता. त्यामुळे त्यांनी मालाची डिलीव्हरी रद्द करण्यास सांगून त्याला पेमेंट परत करण्यास सांगितले होते. यावेळी त्याने त्यांना 25 लाखांचा पोस्ट डेटेड चेक दिला होता. मात्र हा धनादेश बँकेत न वटता परत आला होता. राहुल जैनकडून फसवणुक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी कांदिवली पोलिसांत तक्रार केली होती. या तक्रारीनंतर त्याच्याविरुद्ध पोलिसांनी अपहारासह फसवणुकीचा गुन्हा दाखल केला होता. गुन्हा दाखल होताच गेल्या दोन महिन्यांपासून फरार असलेल्या राहुल जैन या व्यापार्‍याला अटक केली. अटकेनंतर त्याला बोरिवलीतील लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page