कर्जाच्या नावाखाली व्यापार्‍याला घातला दहा लाखांचा चुना

कांदिवलीतील घटना; आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल

0

मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
२६ सप्टेंबर २०२४
मुंबई, – कर्जाच्या नावाखाली व्यापाऱ्याची १० लाख रुपयाची फसवणूक झाल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी चारकोप पोलिसांनी गुन्हा नोंद केला आहे.  

कांदिवली येथे व्यावसायिक राहतात. त्याचे किराणा मालाचे दुकान आहे. गेल्या वर्षी जून महिन्यात त्याना पैशाची गरज होती. त्याने काही ठिकाणी त्याचा नंबर दिला होता. त्यानंतर त्याना काही दिवसांनी एका नंबरवरून फोन आला. कर्ज हवे का अशी विचारणा केली. त्याने कर्जासाठी होकार दिला. कर्जासाठी लागणारी सर्व कागदपत्रे त्याने ऑनलाईन पाठवली. कागदपत्रे दिल्यावर एक जण त्याच्याकडे आला. त्याने तक्रारदार यांच्याकडून कोरे धनादेश घेतले. लवकरच १० लाखांचे कर्ज मंजूर होईल असे त्याना सांगितले. तक्रारदार याना २५ लाखांची गरज असल्याने त्याने एकाला पुन्हा फोन केला. तेव्हा त्याने मोठे कर्ज मिळणार नाही असे त्याना सांगितले.  त्याने तक्रारदार याना एक कंपनी सहा लाखांचे कर्ज देते, कर्ज लगेच फेडल्यावर कंपनी नवीन कर्ज पुन्हा देते असे त्याना सांगण्यात आले. कर्ज मंजुरीसाठी त्या कंपनीच्या कर्मचाऱ्यांना पैसे द्यावे लागतील असे सांगितले. त्यावर विश्वास ठेऊन त्याने पैसे दिले. पैसे दिल्यावर त्याच्या खात्यात पैसे जमा झाले. मोठे कर्ज हवे असल्यास छोट्या कर्जाची रक्कम भरावी लागेल असे त्याना सांगण्यात आले. जर खातेदाराच्या खात्यातून कर्जाची रक्कम भरल्यास जास्त दंड भरावा लागेल. जर आपल्या खात्यातून पैसे भरल्यास दंड भरावा लागणार नाही अशा त्याने तक्रारदार याना सांगितले. त्यावर विश्वास ठेऊन तक्रारदार याने काही रक्कम त्याला दिली.

२५ ते ३० लाखांचे कर्ज उपलब्ध करून देतो असे सांगून तो निघून गेला. त्याने तक्रारदार याना फॉर्म पाठवला. तो फॉर्म भरून तक्रारदार याने पुन्हा त्याला पाठवला. कर्ज फेडले नसल्याने तक्रारदार याच्या खात्यातून पैसे जात होते. त्या कर्जाबाबत त्याने एकाला विचारणा केली. त्यानंतर त्याने बँकेचा कर्मचारी आला आहे, कर्ज मंजुरी साठी ३० हजार रुपये द्यावे लागतील असे त्याना सांगितले. पैसे देऊन देखील त्याना कर्ज मंजूर झाले नाही. कर्जाबाबत विचारणा केली असता तो उडवा उडवीची उत्तरे देत होता. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्याने चारकोप पोलीस ठाण्यात धाव घेतली. पोलिसांनी गुन्हा नोंद करून तपास सुरु केला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page