कांदिवलीत बारा वर्षाच्या दोन अल्पवयीन मुलींचा विनयभंग
परिचित महिलेनेच दोघींची मुलांसोबत ओळख करुन दिली
मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
२८ ऑगस्ट २०२४
मुंबई, – कांदिवलीतील बारा वर्षाच्या दोन अल्पवयीन मुलींची सोशल मिडीयावर ओळख झालेल्या अज्ञात तरुणाने विनयभंग केल्याची घटना उघडकीस आली आहे. विशेष म्हणजे या दोन्ही मुलींना तिच्याच परिचित एका महिलेने आरोपीशी सोशल मिडीयावर ओळख करुन त्यांच्याशी चॅट करण्यास प्रवृत्त केल्याची ध क्कादायक माहिती उघडकीस आली आहे. याप्रकरणी चारकोप पोलिसांनी दोन स्वतंत्र विनयभंगासह खंडणी आणि पोक्सो कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
पहिल्या गुन्ह्यांतील तक्रारदार महिला ३२ वर्षाची असून तिची पिडीत मुलगी आहे. तिच्याच परिचित महिला माला हिने मुलीला जय नावाच्या एका तरुणासह इतर तरुणांसोबत सोशल मिडीयाच्या माध्यमातून ओळख करुन दिली होती. त्यांच्याशी चॅट करण्यास प्रवृत्त करुन या तरुणांना गार्डनमध्ये भेटण्यास पाठविले. गार्डनमध्ये गेल्यानंतर तिला शीतपेयातून गुंगीचे औषध देऊन जयने तिच्याशी अश्लील चाळे करुन तिचा विनयभंग केला होता. अशीच दुसरी घटना अन्य एका बारा वर्षाच्या मुलीसोबत घडली. या मुलीला मालाने सोशल मिडीयावर मितेश शेट्टी नावाच्या एका तरुणासोबत इतरांशी सोशल मिडीयावर ओळख करुन त्यांच्याशी तिला चॅट करण्यास प्रवृत्त केले. तिलाही मितेशला भेटण्यासाठी पाठविले होते. तिथे गेल्यानंतर त्याने तिला शीतपेयातून गुंगीचे औषध देण्यात आले होते. यावेळी मितेशने तिच्याशी अश्लील चाळे करुन तिचा विनयभंग केला होता. तिचे मोबाईलवर अश्लील फोटो काढले होते. ते फोटो आई-वडिलांना दाखविण्याची धमकी देऊन तिच्याकडून दोन हजार रुपयांची खंडणी वसुली केली होती. घडलेला प्रकार दोन्ही मुलींनी तिच्या पालकांना सांगितल्यानंतर हा प्रकार उउघडकीस आला होता. त्यानंतर पिडीत मुलींच्या वतीने चारकोप पोलीस ठाण्यात तक्रार करण्यात आली होती. या तक्रारीनंतर चारकोप पोलिसांनी दोन स्वतंत्र विनयभंगासह खंडणी आणि पो३सो कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
प्राथमिक तपासात या दोन्ही गुन्ह्यांतील मुख्य आरोपी माला असून तिनेच या दोन्ही मुलींची सोशल मिडीयावर काही तरुणांशी ओळख करुन दिली होती. त्यांना त्यांच्याशी चॅट करण्यास प्रवृत्त करुन त्यांना त्यांच्यासोबत गार्डनमध्ये पाठविले होते. त्यानंतर या दोन्ही तरुणांनी दोन्ही मुलींना शीतपेयातून गुंगीचे औषध देऊन त्यांच्याशी अश्लील चाळे करुन विनयभंग केला होता. या दोन्ही घटनेची चारकोप पोलिसांकडून गंभीर दखल घेण्यात आली असून संबंधित महिलेची लवकरच चौकशी केली जाणार आहे. या चौकशीतून अनेक ध क्कादायक खुलासे होण्याची श३यता वर्तविण्यात येत आहे. दोन्ही मुलींना इतर तरुणांशी मैत्री करण्यामागे तिचा काय उद्देश होता, आरोपी तिच्या परिचित आहेत का याचा पोलीस तपास करत आहेत.