मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
२२ ऑक्टोंबर २०२४
मुंबई, – स्वतच्या सख्ख्या बहिणीशी अश्लील चाळे करुन तिच्याच २४ वर्षांच्या भावाने विनयभंग केल्याचा धक्कादायक प्रकार कांदिवली परिसरात उघडकीस आला आहे. विशेष म्हणजे तक्रार केल्यानंतर या मुलीच्या आईसह भाऊ आणि वहिनीने शिवीगाळ करुन मारहाण केली, तिचा मानसिक व शारीरिक शोषण केला होता. अखेर सहा वर्षांनी पिडीत मुलीच्या तक्रारीवरुन या तिघांविरुद्ध कांदिवली पोलिसांनी विनयभंगासह पोक्सो कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्यांत अद्याप कोणालाही अटक झाली नसून चौकशी सुरु असल्याचे पोलिसांनी सांगितले.
२२ वर्षांची तक्रारदार तरुणी ही कांदिवली परिसरात राहत असून खाजगी नोकरी करते. ऑक्टोंबर २०१८ साली ती सतरा वर्षांची होती, यावेळी घरात झोपली असता तिथे तिचा भाऊ आला आणि त्याने घरातील लाईट बंद करुन तिच्याशी अश्लील चाळे करुन तिचा विनयभंग केला होता. याबाबत तिने तिच्या आईकडे तक्रार केल्यानंतर तिच्यासह आरोपी भाऊ, त्याच्या पत्नीने तिला शिवीगाळ करुन मारहाण केली होती. तिचा सतत मानसिक व शारीरिक शोषण केलाद होता. गेल्या सहा वर्षांपासून तिचा तिच्याच कुटुंबियांकडून शोषण सुरु होता. त्याला ती कंटाळून गेली होती. त्यामुळे तिने त्यांच्याविरुद्ध पोलिसांत तक्रार करण्याचा निर्णय घेतला होता. सोमवारी तिने कांदिवली पोलीस ठाण्यात धाव घेऊन तिथे उपस्थित पोलिसांना घडलेला प्रकार सांगून तिच्या आई, भाऊ आणि वहिणीविरुद्ध तक्रार केली होती. या तक्रारीनंतर त्यांच्याविरुद्ध पोसिंनी ७५, ७६, ७९ ११५ (२), ३ (५) भारतीय न्याय सहिता सहकलम ८, १२ पोक्सो कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्यांचा तपास सुरु असून तिन्ही आरोपींची पोलिसांकडून चौकशी होणार आहे. या चौकशीनंतर त्यांच्यावर अटकेची कारवाई केली जाणार आहे.