पुर्नविकासाचा प्रकल्प पूर्ण न करता झोपडीधारकासह एसआरएची फसवणुक

फसवणुकीच्या गुंन्ह्यांतील वॉण्टेड बिल्डरला एक वर्षांनी अटक

0

मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
21 जून 2025
मुंबई, – 2021 ते 2024 या कालावधीत कांदिवलीतील साई-श्रद्धा गृहनिर्माण सहकारी संस्थेच्या पुर्नविकास इमारतीचे बांधकाम पूर्ण न करता विक्री इमारतीचे काम पूर्ण करण्यास प्राधान्य देऊन, झोपडीधारकांना भाडे न देता झोपडपट्टी पुर्नविकास प्राधिकरणाने दिलेल्या अटी आणि नियमांचे उल्लघंन करुन फसवणुक केल्याप्रकरणी चंद्रेश रमणिकलाल गाला या विकासकाला एक वर्षांनी कांदिवली पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्यावर एसआरएसह झोपडीधारकांच्या विश्वासाचा भंग करुन फसवणुक केल्याचा आरोप आहे.

रसीक अशोक दुबळे हे कुर्ला येथील नेहरुनगरचे रहिवाशी असून सध्या झोपडपट्टी पुनवर्सन प्राधिकरण विभागात दुय्यम अभियंता म्हणून कार्यरत आहेत. त्यांच्यावर एसआरए योजनेतील इमारतींना परवानगीसाठी येणार्‍या प्रस्तावाची छाननी करणे, त्या प्रस्तावाला मंजुरीसाठी वरिष्ठांना सादर करणे आदी कामाची जबाबदारी आहे. जानेवारी 2012 साली पूजा डेव्हलोपर्सच्या वतीने वास्तुविशारद प्रिझम आर्किटेक्ट आणि इंटेरियर डिझायनरचे निखील महाजन यांनी कांदिवलीतील मयुर सिनेमाजवळील राम भरोसेवाडीख साई-श्रद्धा गृहनिर्माण सहकारी संस्थेच्या एसआरए प्रस्तावाचा अर्ज संबंधित विभागात सादर केला होता.

मे 2015 साली या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली होती. जुलै महिन्यांत त्यांना ओसी प्राप्त होताच इमारतीच्या बांधकामाला परवानगी देण्यात आली होती. काही वर्षांनंतर एसआरकडून सुधारीत आशयपत्र मंजुर करण्यात आले होते. त्यात चंद्रेश गाला याच्या सी. जी इन्फ्रा प्रायव्हेट लिमिटेड यांची विकासक म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. या विकासकाला 23 मजल्यापर्यंत बांधकाम करण्यास परवानगी मिळाली होती. त्यात दोन विंग होते. त्यात ए विंगमध्ये पुर्नवसन घटकातील झोपडीधारकासाठी तसेच विंग बी विक्री घटकातील धारकासाठी प्रस्तावित करण्यात आले होते. इमारतीचे बांधकाम सुरु असताना ऑगस्ट 2023 साली साईश्रद्धा गृहनिर्माण सहकारी संस्थेच्या झोपडीधारकांना भाडे देण्यात आले होते,

तसेच पुर्नविकास इमारतीचे दिर्घकाळापासून प्रलंबित असल्याच्या काही तक्रारी त्याच्या कार्यालयात प्राप्त झाले होते. त्यामुळे या तक्रारीची एसआरए कार्यालयातून गंभीर दखल घेण्यात आली होती. त्यामुळे या विभागाने संबंधित विकासकाला पुर्नविकास काम पूर्ण होईपर्यंंत झोपडीधारकांना थकीत भाडे अदा करेपर्यंत विक्री घटकाच्यास इमारतीचे बांधकाम थांबविण्याचे आदेश देण्यात आले होते. इतकेच नव्हे तर नोंदणी महानिरीक्षक व मुद्रांक नियंत्रक, महाराष्ट्र राज्य यांना संबंधित प्रकल्पाच्या नाहरकत प्रमाणपत्राशिवाय विक्री घटकातील सदनिकांची खरेदी-विक्रीची नोंदणी न करण्याचे सांगण्यात आले होते.

मात्र विकासकाने पुर्नविकास इमारतीचे बांधकाम पूर्ण न करता विक्री इमातरीच्या काम पूर्ण करण्यावर भर दिला होता. ही बाब विश्वासाचा भंग आणि झोपडीधारक तसेच झोपडपट्टी पुर्नविकास प्राधिकरणची फसवणुक असल्याचे उघडकीस आले होते. त्यामुळे संबंधित विकासकाविरुद्ध कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले होते. या आदेशांनतर रसीक दुबळे यांनी एसआरएच्या वतीने कांदिवली पोलिसांत चंद्रेश गाला यांच्याविरुद्ध तक्रार केली होती.

या तक्रारीनंतर चंद्रेश गालाविरुद्ध जून 2024 रोजी कांदिवली पोलिसांत अपहारासह फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. याच गुन्ह्यांत तो गेल्या एक वर्षांपासून वॉण्टेड होता. अटक टाळण्यासाठी विशेष सेशन कोर्टात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला होता. मात्र त्याचा हा अर्ज कोर्टाने फेटाळून लावला होता. त्यानंतर एक वर्षांनंतर चंद्रेश गाला याला पोलिसांनी अटक केली. अटकेनंतर त्याला बोरिवलीतील लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page