मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
४ एप्रिल २०२४
मुंबई, – मिसिंग तक्रार प्राप्त झालेल्या सुमारे दहा लाखांचे ५४ मोबाईल तक्रारदारांना परत करण्यात आले आहे. मोबाईल परत मिळाल्याने तक्रारदारांनी वरिष्ठ पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर गणोरे व त्यांच्या पथकाने आभार व्यक्त केले आहेत.
गेल्या काही दिवसांत कांदिवली पोलीस ठाण्यात मिसिंग मोबाईलच्या तक्रारीत लक्षणीय वाढ झाली होती. याबाबत काही तक्रार नोंद होताच कांदिवली पोलिसांनी मिसिंग झालेल्या मोबाईलचा शोध सुरु केला होता. पोलीस उपायुक्त आनंद भोईटे, सहाय्यक पोलीस आयुक्त शैलेंद्र धिवार, वरिष्ठ पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर गणोरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक आनंद कांबळे, पोलीस उपनिरीक्षक नितीन साटम, पोलीस शिपाई परमेश्वर चव्हाण, महिला पोलीस नाईक अंजना यादव यांनी हरविलेल्या मोबाईलचा सीईआयआर या पोर्टलच्या माध्यमातून माहिती काढण्यास सुरुवात केली होती. या माहितीच्या आधारे संबंधित पथकाला मुंबईसह गुजरात, उत्तरप्रदेश, झारखंड, कोलकाता आणि बिहार येथे पाठविण्यात आले होते. काही दिवसांत या पथकाने ५४ मिसिंगचा शोध घेत ते मोबाईल ताब्यात घेतले होते. या मोबाईलची किंमत दहा लाख सतरा हजार इतकी आहे. एका कार्यक्रमांत ते मोबाईल तक्रारदारांना परत करण्यात आले. तक्रारदारांना त्यांचा मोबाईल मिळण्याची शाश्वती नव्हती, मात्र कांदिवली पोलिसांनी निरंतर पाठपुरावा करुन विविध राज्यातून हरविलेले मोबाईल हस्तगत करुन ते तक्रारदारांना परत केले होते. त्यामुळे या तक्रारदारांनी कांदिवली पोलिसांचे आभार व्यक्त केले आहे.