अल्पवयीन प्रेयसीचे अश्लील फोटो मित्राला पाठविले
कांदिवलीतील घटना अल्पवयीन मित्रासह दोघांविरुद्ध गुन्हा दाखल
मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
२२ सप्टेंबर २०२४
मुंबई, – सतरा वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर तिच्याच सोळा वर्षांच्या अल्पवयीन मुलाने लैगिंक अत्याचार करुन तिचे अश्लील फोटो त्याच्या २१ वर्षांच्या मित्राला पाठविल्याची घटना कांदिवली परिसरात उघडकीस आली आहे. याप्रकरणी सोळा अणि एकवीस वर्षांच्या दोन्ही आरोपी तरुणांविरुद्ध चारकोप पोलिसांनी लैगिंक अत्याचारासह पोक्सो आणि आयटी कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. याच गुन्ह्यांत सोळा वर्षांच्या आरोपी मुलाला ताब्यात घेऊन डोंगरीतील बालसुधारगृहात पाठविण्यात आले तर त्याच्या मित्राचा पोलिसांकडून शोध सुरु आहे.
३६ वर्षांची तक्रारदार महिला कांदिवली परिसरात राहत असून खाजगी नोकरी करते. तिला सतरा वर्षांची मुलगी असून ती सध्या शिक्षण घेते. तिचा सोळा वर्षांचा आरोपी मित्र असून त्यांची मैत्री शाळेत असताना तिच्या एका मित्राने करुन दिली होती. या मुलासोबत तिचे प्रेमसंबंध निर्माण झाले आणि त्यांच्यात शारीरिक संबंध आले होते. यावेळी त्याने तिचे काही अश्लील फोटो त्याला पाठविण्यास प्रवृत्त केले होते. तिनेही तिचे खाजगी फोटो त्याला विश्वासाने पाठवून दिले होते. मात्र त्याने तिचा विश्वासघात करुन तिचे त्याच्या मित्राला पाठविले होते. हा प्रकार नंतर पिडीत मुलीच्या निदर्शनास येताच ती प्रचंड मानसिक तणावात होती. घडलेला प्रकार तिने तिच्या आईला सांगितला. त्यानंतर तिने तिला चारकोप पोलीस ठाण्यात आणून तिथे उपस्थित पोलिसांना घडलेला प्रकार सांगितला. तिच्या तक्रार अर्जावरुन पोलिसांनी पिडीत मुलीच्या सोळा वर्षांच्या अल्पवयीन मुलासह त्याच्या २१ वर्षांच्या मित्राविरुद्ध लैगिंक अत्याचारासह पोक्सो आणि आयटी कलमांतर्गत गुन्हा दाखल केला होता. गुन्हा दाखल होताच सोळा वर्षांच्या अल्पवयीन मुलाला पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. तो अल्पवयीन असल्याने त्याला डोंगरीतील बालसुधारगृहात पाठविण्यात आले आहे. दुसर्या मित्राला पाहिजे आरोपी दाखविण्यात आले असून त्याचा पोलिसांकडून शोध सुरु आहे.