स्पामध्ये मसाजच्या नावाने चालणार्या सेक्स रॅकेटचा पर्दाफाश
स्पाच्या मॅनेजरला अटक तर सात तरुणीसह महिलांची सुटका
मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
13 सप्टेंबर 2025
मुंबई, – कांदिवलीतील स्पामध्ये मसाजच्या नावाने चालणार्या सेक्स रॅकेटचा गुन्हे शाखेच्या युनिट अकराच्या अधिकार्यांनी पर्दाफाश केला. या कारवाईत पोलिसांनी स्पाचा मॅनेजरला अटक केली तर सात तरुणीसह महिलांची सुटका केली. हबीबूर रेहमान नजीमद्दीन असे या मॅनेजरचे नाव असून अटकेनंतर त्याला लोकल कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे. या गुन्ह्यांत स्पाचा चालक आणि मालक मोहम्मद बद्रुरुद्दीन ऊर्फ सॅम आणि अफसररुद्दीन या दोघांना पाहिजे आरोपी दाखविण्यात आले असून त्यांचा पोलिसांकडून शोध सुरु आहे. सुटका केलेल्या सर्व तरुणीसह महिलांची मेडीकल करुन महिला सुधारगृहात पाठविण्यात आले आहे.
कांदिवलीतील महावीरनगर, पंचशील गार्डन, सी विंगच्या शॉप क्रमांक 23 मध्ये फिला नावाचे एक स्पा आहे. या स्पामध्ये मसाजसह इतर सर्व्हिसच्या नावाने तिथे काम करणार्या तरुणीसह महिलांना ग्राहकासोबत वेश्याव्यवसाय करण्यास प्रवृत्त केले जाते. स्पामधील मालक-चालक मॅनेजरच्या मदतीने सेक्स रॅकेट चालवत असल्याची माहिती युनिट अकराच्या अधिकार्यांना मिळाली होती. या माहितीची पोलिसांकडून एका बोगस ग्राहकाच्या मदतीने शहानिशा करण्यात आली होती. ठरल्याप्रमाणे बोगस ग्राहक स्पामध्ये गेल्यानंतर त्याला तिथे सेक्स रॅकेट सुरु असल्याचे दिसून आले.
बोगस ग्राहकाकडून सिग्नल प्राप्त होताच सहाय्यक पोलीस आयुक्त राजेंद्र शिरतोडे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक मनोहर आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक बाबासाहेक काकडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक निलोफर शेख, पोलीस उपनिरीक्षक बाळासाहेब शिंदे, पोलीस हवालदार हेमंत कांबळे, बळीराम गोवळकर, एकनाथ जाधव, पोलीस शिपाई लक्ष्मण जाधव, महिला पोलीस हवालदार रंजिता सावंत, महिला पोलीस शिपाई हिरा जाधव यांनी तिथे छापा टाकला होता. यावेळी स्पामध्ये असलेल्या मॅनेजर हबीबूर नजीमउद्दीन याच्यासह दोन ग्राहक आणि सात तरुणीसह महिलांना पोलिसांनी ताब्यात घेतले.
या तरुणीसह महिलांच्या चौकशीतून स्पाचा मालक व चालक मोहम्मद बद्रुरुद्दीन आणि अफसरउद्दीन असून ते दोघेही मॅनेजर हबीबूरच्या मदतीने स्पामध्ये मसाजसह इतर सर्व्हिसच्या नावाने सेक्स रॅकेट चालवतात. त्यांना मिळणार्या रक्कमेपैकी काही रक्कम त्यांना दिल्यानंतर उर्वरित रक्कम ते तिघेही घेत असल्याचे उघडकीस आले. हा प्रकार उघडकीस येताच हबीबूरला पोलिसांनी अटक केली. अटकेनंतर त्याच्यासह दोन ग्राहक आणि सातही महिलांना पुढील कारवाईसाठी कांदिवली पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले.
याप्रकरणी महिला पोलीस शिपाई हिरा जाधव यांच्या तक्रारीवरुन पोलिसांनी स्पाच्या मालक, चालक आणि मॅनेजरविरुद्ध भारतीय न्याय सहिता आणि पिटाच्या विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. अटकेनंतर हबीबूरला लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे.